दुबई, 20 ऑक्टोबर : टी-20 वर्ल्ड कपच्या (T20 World Cup) सराव सामन्यांमध्ये टीम इंडियाने धमाकेदार कामगिरी केली आहे. पहिले इंग्लंडचा पराभव केल्यानंतर आता टीम इंडियाने ऑस्ट्रेलियालाही (India vs Australia Practice Match) धूळ चारली आहे. कांगारूंनी दिलेलं 153 रनचं आव्हान भारताने 9 विकेट राखून पार केलं. रोहित शर्मा 41 बॉलमध्ये 60 रन करून रिटायर्ड हर्ट झाला, तर केएल राहुलने 39 रन केले. सूर्यकुमार यादव 38 रनवर आणि हार्दिक पांड्या 14 रनवर नाबाद राहिले. ऑस्ट्रेलियाकडून फक्त एश्टन अगरला एक विकेट मिळाली. ऑस्ट्रेलियाच्या आव्हानाचा पाठलाग भारताने 17.5 ओव्हरमध्येच केला.
भारताविरुद्धच्या सराव सामन्यात सुरुवातीला धक्के बसल्यानंतर ऑस्ट्रेलियाची (India vs Australia Practice Match) बॅटिंग सावरली. ऑस्ट्रेलियाने 20 ओव्हरमध्ये 5 विकेट गमावून 152 रन केले, त्यामुळे भारताला विजयासाठी 153 रनचं आव्हान मिळालं. आर.अश्विन (R Ashwin) आणि रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) यांनी पॉवर प्लेमध्येच ऑस्ट्रेलियाला तीन धक्के दिले, पण यानंतर स्मिथ आणि मॅक्सवेलने कांगारूंचा डाव सावरला. स्मिथने 57 तर मॅक्सवेलने 37 रन केले. मार्कस स्टॉयनिस 41 रनवर नाबाद राहिला. भारताकडून अश्विनने दोन तर रविंद्र जडेजा आणि राहुल चहरला एक विकेट मिळाली.
भारताविरुद्धच्या सराव सामन्यात ऑस्ट्रेलियाचा (India vs Australia Practice Match) कर्णधार एरॉन फिंच याने टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला. या सामन्यात भारतीय टीम रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वात मैदानात उतरली. विराट कोहलीला (Virat Kohli rested) या सामन्यासाठी विश्रांती देण्यात आली आहे. विराटसोबतच बुमराह आणि मोहम्मद शमीदेखील हा सामना खेळले नाहीत. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांनी त्यांच्या पहिल्या सराव सामन्यात विजय मिळवला होता. भारताने इंग्लंडचा तर ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडचा पराभव केला.
याआधीच्या सराव सामन्यात भारताने इंग्लंडचा 7 विकेट आणि एक ओव्हर राखून पराभव केला होता. इंग्लंडने दिलेलं 189 रनचं मोठं आव्हान भारताने अगदी सहज 19 ओव्हरमध्ये 3 विकेट गमावून पूर्ण केलं होतं. केएल राहुल (KL Rahul) आणि इशान किशन (Ishan Kishan) या दोन्ही ओपनरनी धमाकेदार अर्धशतकं करत भारताच्या विजयात मोलाचं योगदान दिलं होतं.
इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध दणदणीत विजय मिळवल्यामुळे टीम इंडियाचा आत्मविश्वास आणखी वाढला असेल. या टी-20 वर्ल्ड कपमधला भारताचा हा अखेरचा सराव सामना होता. या मॅचनंतर 24 ऑक्टोबर म्हणजेच रविवारी भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यात पहिली मॅच होणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: India vs Australia, T20 world cup