दुबई, 26 ऑक्टोबर : टी-20 वर्ल्ड कपच्या (T20 World Cup) पहिल्याच सामन्यात पाकिस्तानने टीम इंडियाला (India vs Pakistan) जोरदार धक्का दिला आहे. भारताने दिलेलं 152 रनचं आव्हान पाकिस्तानने 17.5 ओव्हरमध्ये एकही विकेट न गमावता पूर्ण केलं. बाबर आझमने (Babar Azam) 51 बॉलमध्ये नाबाद 66 रन आणि मोहम्मद रिझवानने (Mohammad Rizwan) 55 बॉलमध्ये नाबाद 79 रन केले.
पाकिस्तानच्या या विजयावर बोलताना त्यांचा माजी फास्ट बॉलर वकार युनूसची (Waqar Younis) जीभ घसरली आहे. या विजयाचा विश्लेषण करताना वकारने धर्म मध्ये आणला. 'भारत पाकिस्तान मॅचदरम्यान हिंदूंच्या मध्ये मोहम्मद रिझवानने नमाझ पठण केलं. त्याच्या बॅटिंगपेक्षा हे जास्त आनंद देणारं होतं,' असं वकार युनूस म्हणाला.
"Rizwan offered Namaz during #INDvPAK match in middle of Hindus was most satisfying thing Mashallah, even more than his batting" - Waqar Younis & Shoaib Akhtar discusspic.twitter.com/ELTVJSTqh4
— Pakistan Untold (@pakistan_untold) October 26, 2021
View this post on Instagram
वकार युनूसच्या या वक्तव्यावर लोकप्रिय कॉमेंटेटर हर्षा भोगले (Harsha Bhogle) यांनी टीका केली आहे. 'वकार युनूससारख्या माणसाने असं वक्तव्य केल्यामुळे मी निराश झालो आहे. अशा वक्तव्यांवर न बोलता आम्ही खेळाविषयी बोलतो, पण अशी वक्तव्यं ऐकणं भयानक आहे. पाकिस्तानमधल्या खऱ्या क्रिकेट प्रेमींना या वक्तव्यामधला धोका कळेल आणि तेदेखील निराशा व्यक्त करतील, अशी माझी अपेक्षा आहे. अशा वक्तव्यांमुळे क्रिकेट हा फक्त खेळ आहे आणि ही फक्त क्रिकेट मॅच आहे, असं सांगणं आमच्यासारख्या क्रीडाप्रेमींना कठीण जातं,' असं हर्षा भोगले त्यांच्या ट्वीटमध्ये म्हणाले.
For a person of Waqar Younis' stature to say that watching Rizwan offering namaz in front of Hindus was very special to him, is one of the most disappointing things I have heard. A lot of us try hard to play such things down and talk up sport and to hear this is terrible.
— Harsha Bhogle (@bhogleharsha) October 26, 2021
You would think that cricketers, as ambassadors of our game, would be a little more responsible. I am sure there will be an apology on the way from Waqar. We need to unite the cricket world, not divide it by religion
— Harsha Bhogle (@bhogleharsha) October 26, 2021
'क्रिकेटपटू हे खेळाचे प्रतिनिधी आहेत, त्यामुळे त्यांनी जास्त जबाबदारीन वागावं. वकार युनूस या प्रकरणी माफी मागेल, असा विश्वास मला आहे. क्रिकेटविश्वाने याबाबत एकत्र यायला पाहिजे, धर्मामुळे आपल्यात फूट पडू नये,' अशी प्रतिक्रिया हर्षा भोगले यांनी दिली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: India vs Pakistan, T20 world cup