मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

T20 World Cup : IND vs PAK सामना बघितला असेल, पण टीम इंडियाने केलेल्या या 5 चुका लक्षात आल्या का?

T20 World Cup : IND vs PAK सामना बघितला असेल, पण टीम इंडियाने केलेल्या या 5 चुका लक्षात आल्या का?

टी-20 वर्ल्ड कपच्या (T20 World Cup) पहिल्याच सामन्यात टीम इंडियाला पाकिस्तानने (India vs Pakistan) जोरदार धक्का दिला आहे. भारताने दिलेल्या 152 रनच्या आव्हानाचा पाठलाग पाकिस्तानने एकही विकेट न गमावता पार केलं.

  • Published by:  Shreyas

दुबई, 24 ऑक्टोबर : टी-20 वर्ल्ड कपच्या (T20 World Cup) पहिल्याच सामन्यात टीम इंडियाला पाकिस्तानने (India vs Pakistan) जोरदार धक्का दिला आहे. भारताने दिलेल्या 152 रनच्या आव्हानाचा पाठलाग पाकिस्तानने एकही विकेट न गमावता पार केलं. बाबर आझमने (Babar Azam) 51 बॉलमध्ये नाबाद 66 रन आणि मोहम्मद रिझवानने (Mohammad Rizwan) 55 बॉलमध्ये नाबाद 79 रन केले. या मॅचमध्ये टीम इंडियाने केलेल्या चुकाच त्यांना महागात पडल्या.

बॉलिंग सपशेल फेल

टी-20 क्रिकेटमधला टीम इंडियाचा हा सगळ्यात मोठा पराभव आहे. याआधी कधीही टीम इंडियाचा टी-20 वर्ल्ड कपमध्ये 10 विकेटने पराभव झाला नव्हता. तसंच पाकिस्तानचाही टी-20 क्रिकेटमधला हा पहिलाच 10 विकेटने मिळवलेला विजय आहे.

स्विंग बॉलिंगने पुन्हा दिला त्रास

पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला. यानंतर शाहिन आफ्रिदी (Shaheen Afridi) याने सुरुवातीलाच भारताला दोन धक्के दिले. रोहित शर्मा (Rohit Sharma) पहिल्याच बॉलला शून्यवर आऊट झाला, तर केएल राहुलही (KL Rahul) स्वस्तात परतला. आयसीसी स्पर्धांमध्ये पुन्हा एकदा स्विंग बॉलिंगने भारताला त्रास दिला आहे. याआधी 2017 चॅम्पियन्स ट्रॉफी फायनल, 2019 वनडे वर्ल्ड कप फायनल आणि जून महिन्यात झालेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलमध्येही स्विंग बॉलिंगसमोर टीम इंडियाच्या बॅटिंगने लोटांगण घातलं.

हार्दिकसाठी विराटचा हट्टीपणा

हार्दिक पांड्या (Hardik Pandya) फिट आणि फॉर्ममध्ये नसूनही विराट कोहलीने त्याला टीममध्ये ठेवण्याचा हट्ट धरला. पाकिस्तानविरुद्धच्या मॅचमध्येही हार्दिकला बॅटिंगमध्ये चमकदार कामगिरी करता आली नाही, तसंच तो फिल्डिंगसाठीही मैदानात आला नाही. बॅटिंग करत असताना हार्दिकच्या खांद्याला दुखापत झाली, त्यामुळे तो स्कॅनिंगसाठी गेला होता.

अश्विन अजूनही बाहेर

2016 टी-20 वर्ल्ड कपनंतर आर.अश्विनचं (R Ashwin) भारताच्या मर्यादित ओव्हरच्या टीममध्ये पुनरागमन झालं, पण पहिल्या सामन्यात अश्विनला खेळण्याची संधी मिळाली नाही. टी-20 वर्ल्ड कपच्या दोन्ही सराव सामन्यांमध्ये अश्विनने उत्कृष्ट बॉलिंग केली, पण त्याला या सामन्यात प्लेयिंग इलेव्हनमध्ये संधी देण्यात आली नाही. याआधी इंग्लंड दौऱ्यात झालेल्या चार टेस्ट मॅचमध्येही अश्विन बेंचवरच बसून होता. यानंतर विराट कोहलीच्या टीम निवडीवरही बरीच टीका झाली होती.

फॉर्ममध्ये नसलेल्या भुवनेश्वरला संधी

हार्दिक पांड्याप्रमाणेच भुवनेश्वर कुमारही (Bhuvneshwar Kumar) आयपीएलमध्ये संघर्ष करत होता, तरीही त्याला पहिल्या सामन्यात खेळवण्यात आलं. शार्दुल ठाकूरने (Shardul Thakur) आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्सकडून धमाकेदार कामगिरी केली होती. यानंतर टी-20 वर्ल्ड कप टीममध्ये राखीव खेळाडूंमध्ये असलेला शार्दुल 15 जणांच्या टीममध्ये आला, पण पाकिस्तानविरुद्ध त्याला खेळायला मिळालं नाही.

First published:

Tags: India vs Pakistan, T20 world cup, Virat kohli