दुबई, 26 ऑक्टोबर : टी-20 वर्ल्ड कपच्या (T20 World Cup) पहिल्याच सामन्यात पाकिस्तानने भारताचा (India vs Pakistan) 10 विकेटने दारूण पराभव केला, यानंतर आता पाकिस्तानी खेळाडूंकडून टीम इंडियाच्या खेळाडूंवर निशाणा साधण्यात येत आहे. वरुण चक्रवर्तीसारखे (Varun Chakravarthy) बॉलर आमच्याइकडे गल्ली-बोळात सापडतात, असं वक्तव्य पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू सलमान बट (Salman Butt) याने केलं आहे. टी-20 वर्ल्ड कपमध्ये भारताचा मिस्ट्री स्पिनर वरुण चक्रवर्तीला एक्स-फॅक्टर मानलं जात होतं, पण पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात वरुण अपयशी ठरला.
'पाकिस्तानमध्ये प्रत्येक मुलाला गल्लीमध्ये अशा बॉलिंगचा सामना करावा लागतो. तो मिस्ट्री स्पिनर असला तरी आमच्यासाठी मात्र अजिबात सरप्राईज नव्हता. पाकिस्तानची मुलं टेप बॉल क्रिकेट खूप खेळतात. पाकिस्तानमधला प्रत्येक मुलगा गल्लीमध्ये अशी बॉलिंग खेळतो, जिकडे बोटांची ट्रिक आणि वेगवेगळ्या पद्धतीने बॉलिंग केली जाते,' असं सलमान बट त्याच्या युट्यूब चॅनलवर म्हणाला. तसंच सलमान बटने वरुण चक्रवर्तीला टीममध्ये घेण्यावरही आक्षेप घेतले.
T20 World Cup : 'त्याला टीम इंडियात घेऊन चूक केली', इंझमामचे विराटच्या कॅप्टन्सीवरच प्रश्नचिन्ह
वरुण चक्रवर्तीने 4 ओव्हरमध्ये 8.25 च्या सरासरीने 33 रन दिले. अनुभवी अश्विनऐवजी विराट कोहलीने वरुण चक्रवर्तीवर विश्वास दाखवला. सलमान बटला वरुण चक्रवर्ती श्रीलंकेच्या अजंता मेंडिससारखा (Ajantha Mendis) वाटला. 'आपल्या सुरुवातीच्या करियरमध्ये श्रीलंकेच्या अजंता मेंडिसनेही आपल्या मिस्ट्री बॉलिंगने अनेक टीमना त्रास दिला. काही काळानंतर श्रीलंकने त्याला खेळवणंच बंद केलं. मिस्ट्री बॉलिंगमध्ये आम्हाला कोणतीही मिस्ट्री आढळली नाही, कारण आम्ही अशीच बॉलिग खेळाडू लहानाचे मोठे झालो,' अशी प्रतिक्रिया सलमान बटने दिली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: India vs Pakistan, T20 world cup