मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

T20 World Cup : पाकिस्तानी महिलेचं धोनीला साकडं, माही बघून हसला आणि..., VIDEO

T20 World Cup : पाकिस्तानी महिलेचं धोनीला साकडं, माही बघून हसला आणि..., VIDEO

टी-20 वर्ल्ड कपच्या (T20 World Cup) पहिल्याच सामन्यात पाकिस्तानने भारताचा (India vs Pakistan) 10 विकेटने दारूण पराभव केला.

टी-20 वर्ल्ड कपच्या (T20 World Cup) पहिल्याच सामन्यात पाकिस्तानने भारताचा (India vs Pakistan) 10 विकेटने दारूण पराभव केला.

टी-20 वर्ल्ड कपच्या (T20 World Cup) पहिल्याच सामन्यात पाकिस्तानने भारताचा (India vs Pakistan) 10 विकेटने दारूण पराभव केला.

  • Published by:  Shreyas

दुबई, 27 ऑक्टोबर : टी-20 वर्ल्ड कपच्या (T20 World Cup) पहिल्याच सामन्यात पाकिस्तानने भारताचा (India vs Pakistan) 10 विकेटने दारूण पराभव केला. वर्ल्ड कपमध्ये पहिल्यांदाच पाकिस्तानला भारताचा पराभव करता आला. याआधी 5 टी-20 वर्ल्ड कपचे सामने आणि 7 वनडे वर्ल्ड कपच्या मॅचमध्ये भारताने विजय मिळवला होता. भारत आणि पाकिस्तानमधले क्रिकेट चाहते या सामन्याची आतुरतेने वाट पाहत होते. भारतीय चाहत्यांची मात्र या सामन्यानंतर निराशा झाली. भारत आणि पाकिस्तान यांच्यातल्या हाय व्होल्टेज मॅचआधीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या व्हिडिओमध्ये पाकिस्तानची महिला अँकर सराव करत असलेल्या भारतीय टीममधल्या केएल राहुल (KL Rahul) आणि एमएस धोनी (MS Dhoni) याला साकडं घालत आहे. पाकिस्तानची अँकर सवेरा पाशाने (Sawera Pasha) तिच्या ट्विटर अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेयर केला आहे. हा व्हिडिओ टीम इंडियाच्या पहिल्या दिवसाच्या सरावावेळचा आहे.

या व्हिडिओमध्ये सवेरा पाशा पहिले केएल राहुलला पाकिस्तानविरुद्ध चांगला खेळू नकोस, अशी विनंती करते. केएल राहुल सवेराचं हे बोलणं ऐकून हसतो आणि तिकडून निघून जातो. यानंतर सवेरा पाशाला तिकडून येणारा एमएस धोनी दिसतो. धोनीला पाहून सवेरा म्हणाली, ही मॅच सोडून दे, पुढच्या मॅचपासून मेंटरशीप करायला सुरुवात कर. सवेराच्या या वक्तव्यावर धोनी हसला आणि त्याने आमचं कामच हे आहे, असं उत्तर दिलं. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

भारत आणि पाकिस्तान यांच्यातल्या तणावपूर्ण संबंधांमुळे दोन्ही देशांमध्ये क्रिकेट खेळवलं जात नाही. या दोन्ही टीम फक्त आयसीसी स्पर्धा आणि आशिया कपमध्येच एकमेकांविरुद्ध खेळतात. वर्ल्ड कपमध्ये कायमच पाकिस्तानविरुद्ध विजय मिळवणाऱ्या टीम इंडियाचा इतिहास दुबईमध्ये बदलला गेला.

29 वर्षांनंतर पाकिस्तानने भारताला वर्ल्ड कपच्या सामन्यात पराभूत केलं. 1992 नंतर टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीच्या नावावर नकोसं रेकॉर्ड झालं. पाकिस्तानविरुद्धच्या पराभवानंतर आता टी-20 वर्ल्ड कपमध्ये भारताचा पुढचा सामना 31 ऑक्टोबरला न्यूझीलंडविरुद्ध होणार आहे.

First published:

Tags: India vs Pakistan, Kl rahul, MS Dhoni, T20 world cup