मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

T20 World Cup IND vs PAK : अरे हे काय? अंपायर झोपा काढतात का? या Photo मुळे नवा वाद

T20 World Cup IND vs PAK : अरे हे काय? अंपायर झोपा काढतात का? या Photo मुळे नवा वाद

टी-20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) भारताविरुद्धच्या महामुकाबल्यात पाकिस्तानने (India vs Pakistan) धमाकेदार सुरुवात केली, डावखुरा फास्ट बॉलर शाहिन आफ्रिदी (Shaheen Afridi) याने पहिल्या दोन ओव्हरमध्येच भारताला दोन धक्के दिले.

  • Published by:  Shreyas

दुबई, 24 ऑक्टोबर : टी-20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) भारताविरुद्धच्या महामुकाबल्यात पाकिस्तानने (India vs Pakistan) धमाकेदार सुरुवात केली, डावखुरा फास्ट बॉलर शाहिन आफ्रिदी (Shaheen Afridi) याने पहिल्या दोन ओव्हरमध्येच भारताला दोन धक्के दिले. शाहिनच्या बॉलिंगवर रोहित शर्मा (Rohit Sharma) पहिल्याच बॉलला शून्य रनवर आऊट झाला. यानंतर शाहिन आफ्रिदीने केएल राहुलला (KL Rahul) 3 रनवर आऊट केलं. शाहिन आफ्रिदीला केएल राहुलची विकेट मिळाली असली तरी या विकेटमुळे नव्या वादाला तोंड फुटलं आहे.

शाहिन आफ्रिदीने केएल राहुलला टाकलेला बॉल नो बॉल (Shaheen Afridi No Ball) असल्याचा आरोप होऊ लागला आहे. ट्वीटरवर शाहिन आफ्रिदीने टाकलेल्या या बॉलचे फोटो व्हायरल होत आहेत. तसंच अंपायर झोपा काढत होते का? असा सवाल यूजर्स विचारत आहेत.

सुरुवातीच्या तीन विकेट लवकर गेल्यानंतर विराट कोहलीने ऋषभ पंतच्या साथीने भारताच्या बॅटिंगला आकार दिला. विराटने 49 बॉलमध्ये 57 रनची खेळी केली. यामध्ये 5 फोर आणि एक सिक्सचा समावेश होता. विराट कोहली आणि ऋषभ पंत यांच्यामध्ये 53 रनची पार्टनरशीप झाली. ऋषभ पंत 30 बॉलमध्ये 39 रन करून आऊट झाला. विराट कोहलीच्या या खेळीमुळे भारताने पाकिस्तानला विजयासाठी 152 रनचं आव्हान दिलं.

शाहिन आफ्रिदीने या मॅचमध्ये रोहित आणि राहुलसह विराट कोहलीचीही विकेट घेतली. याशिवाय हसन अलीला 2 आणि शादाब खान, हारिस राऊफला प्रत्येकी 1-1 विकेट मिळाली.

First published:

Tags: India vs Pakistan, T20 world cup