• Home
  • »
  • News
  • »
  • sport
  • »
  • T20 World Cup IND vs PAK : पाकिस्तानच्या विजयानंतर बाबरचे वडील ढसाढसा रडले, VIRAL VIDEO

T20 World Cup IND vs PAK : पाकिस्तानच्या विजयानंतर बाबरचे वडील ढसाढसा रडले, VIRAL VIDEO

टी-20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) भारताविरुद्ध विजय मिळवल्यानंतर पाकिस्तानमध्ये (India vs Pakistan) जल्लोष साजरा केला गेला. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम (Babar Azam) याचं सगळीकडे कौतुक होत आहे. मॅचनंतर बाबर आझमच्या वडिलांचा (Babar Azam Father) एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

  • Share this:
    दुबई, 25 ऑक्टोबर : टी-20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) भारताविरुद्ध विजय मिळवल्यानंतर पाकिस्तानमध्ये (India vs Pakistan) जल्लोष साजरा केला गेला. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम (Babar Azam) याचं सगळीकडे कौतुक होत आहे, कारण त्याने पहिल्यांदाच पाकिस्तानला वर्ल्ड कपमध्ये भारताविरुद्ध विजय मिळवून दिला. याआधी टी-20 वर्ल्ड कपच्या 5 आणि वनडे वर्ल्ड कपच्या 7 मॅचमध्ये भारताने पाकिस्तानचा पराभव केला होता. बाबर आझमने फक्त कॅप्टन्सीमध्येच नाही तर बॅटिंगमध्येही उत्कृष्ट कामगिरी केली. बाबरने मोहम्मद रिझवानसोबत (Mohammad Rizwan) नाबाद दीड शतकी पार्टनरशीप केली, त्यामुळे पाकिस्तानने हा सामना एकही विकेट न गमावता जिंकला. पाकिस्तानचा टी-20 क्रिकेटच्या इतिहासातला हा सगळ्यात मोठा विजय आहे, तर भारताने पहिल्यांदाच टी-20 सामना 10 विकेटने गमावला. बाबर आझमने या सामन्यात नाबाद 68 रन केले. मॅचनंतर बाबर आझमच्या वडिलांचा (Babar Azam Father) एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये बाबर आझमचे वडील रडत आहेत. स्टेडियममध्ये बसून मॅच बघणाऱ्या बाबरच्या वडिलांना पाकिस्तानच्या विजयानंतर अश्रू अनावर झाले. बाबरच्या वडिलांच्या डोळ्यात अश्रू बघून शेजारी असलेले पाकिस्तानी समर्थकही त्यांच्या शेजारी गेले. पाकिस्तानी चाहत्यांनी बाबरच्या वडिलांचं अभिनंदन केलं. बाबरचा छोटा भाऊदेखील त्याच्या वडिलांसोबत स्टेडियममध्ये होता. 1992 वर्ल्ड कपमध्ये भारत-पाकिस्तान पहिल्यांदा आमने-सामने होते. तेव्हापासून एकदाही भारताचा पाकिस्तानविरुद्ध वर्ल्ड कपमध्ये पराभव झाला नव्हता. टॉस जिंकून पहिले फिल्डिंगचा निर्णय घेतल्यानंतर पाकिस्तानचा डावखुरा फास्ट बॉलर शाहिन आफ्रिदीने सुरुवातीपासूनच टीम इंडियाला धक्के दिले. रोहित शर्मा (Rohit Sharma) पहिल्याच बॉलला आऊट झाला, यानंतर आफ्रिदीने केएल राहुलला (KL Rahul) बोल्ड केलं. India vs Pakistan: संतापजनक! टीम इंडियाच्या पराभवानंतर शमीवर झाले फिक्सिंगचे आरोप राहुलची विकेट गेल्यानंतर सूर्यकुमार यादवही (Suryakumar Yadav) स्वस्तात आऊट झाला. यानंतर विराट कोहलीने (Virat Kohli) ऋषभ पंतच्या (Rishabh Pant) मदतीने भारताच्या इनिंगला आकार दिला. ऋषभ पंतने 30 बॉलमध्ये 39 रन केले, तर विराट कोहली 49 बॉलमध्ये 57 रन करून आऊट झाला. पाकिस्तानविरुद्धच्या पराभवानंतर आता भारताचा पुढचा सामना न्यूझीलंडविरुद्ध रविवार 31 ऑक्टोबरला होणार आहे. भारताच्या ग्रुपमध्ये पाकिस्तान आणि न्यूझीलंडसह अफगाणिस्तान, नामिबिया आणि स्कॉटलंड आहे. या ग्रुपमधल्या टॉप-2 टीम सेमी फायनलमध्ये प्रवेश करतील. IND vs Pak सामन्यानंतर भारतात फटाके फुटले, सेहवागचा खळबळजनक दावा
    Published by:Shreyas
    First published: