मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

कॅप्टन्सी सोडल्यानंतर Virat Kohli भावूक, सोशल मीडियावर पोस्ट करत म्हणाला...

कॅप्टन्सी सोडल्यानंतर Virat Kohli भावूक, सोशल मीडियावर पोस्ट करत म्हणाला...

Virat Kohli

Virat Kohli

नामिबियाविरुद्ध झालेल्या मॅचनंतर विराट कोहलीने (Virat Kohli) आपली भावना सोशल मिडियावर पोस्ट करत व्यक्त केली आहे.

  • Published by:  Dhanshri Otari

नवी दिल्ली, 9 नोव्हेंबर: विराट कोहलीने (Virat Kohli) काल नामिबियाविरुद्ध टीम इंडियाचा कॅप्टन म्हणून अखेरची मॅच खेळला. नामिबियाचा पराभव (IND vs NAM) करत टीम इंडियाचा टी 20 वर्ल्ड कपमधील (T20 Worl Cup) शेवट हा गोड झाला असला तरी कॅप्टन म्हणून विराटच्या पदरी निराशा पडली. कारण, यंदाच्या टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेत टीम इंडियाची कामगिरी अतिशय निराशनक ठरली. अशातच टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेतील टीम इंडियाचा प्रवास आणि विराट कोहलीचा कॅप्टन्सी प्रवास अखेर थांबला. या मॅचनंतर विराट भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. त्याने आपली भावना सोशल मिडियावर पोस्ट करत व्यक्त केली आहे.

नामिबियाविरुद्धच्या सामन्यानंतर आणि टी-२० कप्तान म्हणून विराटने शेवटची पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली. 'एकत्रितपणे आम्ही आमचे ध्येय साध्य करण्यासाठी निघालो. दुर्दैवाने आम्ही कमी पडलो आणि आमच्यापेक्षा कोणीही जास्त निराश झालेले नाही. तुम्हा सर्वांचा पाठिंबा अप्रतिम होता आणि आम्ही त्याबद्दल सर्वांचे आभारी आहोत. आम्ही दमदार पुनरागमनासाठी पुन्हा एकदा सज्ज होऊ आणि आमचे सर्वोत्तम पाऊल पुढे टाकण्याचे ध्येय समोर ठेऊ. जय हिंद.' आशा आशयाचा मेसेज विराटने पोस्टमध्ये दिला आहे.

तसेच त्याने या मेसेजसह आपल्या सहकाऱ्यांसोबतचे काही फोटो शेअर केले आहेत.

टी-20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) टीम इंडियाने अखेरच्या सामन्यात नामिबियाचा (India vs Namibia) पराभव केला. नामिबायने दिलेल्या 133 रनच्या आव्हानाचा पाठलाग टीम इंडियाने 15.2 ओव्हरमध्ये एक विकेट गमावून केला.

विराट कोहलीने 2017 साली पहिल्यांदा भारताच्या टी-20 टीमची कॅप्टन्सी केली होती. नामिबियाविरुद्ध कर्णधार म्हणून विराटचा हा 50 वा आंतरराष्ट्रीय टी-20 सामना असेल. विराटच्या नेतृत्वात भारताने 29 मॅच जिंकल्या आहेत. विराटच्या नेतृत्वात भारताला एकही आयसीसी ट्रॉफी जिंकता आली नाही. रोहित शर्माने आपल्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सना सर्वाधिक 5 वेळा आयसीसी ट्रॉफी जिंकवून दिल्या आहेत.

First published:

Tags: T20 league, Team india, Virat kohli