Home /News /sport /

T20 World Cup आधी ICC ने दाखवली टीम इंडियाची जर्सी, Official Merchandise लॉन्च!

T20 World Cup आधी ICC ने दाखवली टीम इंडियाची जर्सी, Official Merchandise लॉन्च!

टी-20 वर्ल्ड कप (T20 World Cup) सुरू व्हायला आता आठवड्यापेक्षा कमी कालावधी शिल्लक आहे. याआधी आयसीसीने (ICC) सगळ्या 16 टीमच्या खेळाडूंची यादी जाहीर केली आहे, यामध्ये टीम इंडियाचे 15 खेळाडूही आहेत.

    दुबई, 11 ऑक्टोबर : टी-20 वर्ल्ड कप (T20 World Cup) सुरू व्हायला आता आठवड्यापेक्षा कमी कालावधी शिल्लक आहे. याआधी आयसीसीने (ICC) सगळ्या 16 टीमच्या खेळाडूंची यादी जाहीर केली आहे, यामध्ये टीम इंडियाचे 15 खेळाडूही आहेत. मागच्या महिन्यात जाहीर झालेलेच हे खेळाडू असले तरी माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार सुपर-12 मध्ये खेळणाऱ्या टीम 15 ऑक्टोबरपर्यंत टीममध्ये बदल करू शकतात. आयसीसीने याशिवाय आयसीसीने टीम इंडियाची जर्सी (Team India Jersey) विकत घ्यायचं आवाहनही चाहत्यांना केलं. बीसीसीआय (BCCI) मात्र 13 ऑक्टोबरला टीम इंडियाची जर्सी लॉन्च करणार असल्याचं बोललं जातंय. आयसीसीने लॉन्च केलेली ही जर्सी घालून टीम इंडिया मैदानात उतरणार नाही, तर ती फक्त चाहत्यांसाठीच असणार आहे. या जर्सीवर इंडिया लिहिलेलं नाही, तसंच भारताचा झेंडाही नाही. निळ्या रंगाच्या या टी-शर्टवर एका बाजूला बीसीसीआयचा लोगो आहे, तर दुसरीकडे टी-20 वर्ल्ड कपचा लोगो लावण्यात आला आहे. आयपीएल 2021 ची फायनल 15 ऑक्टोबरला होणार आहे, म्हणजेच टीममध्ये काही बदल करायचे असतील तर कर्णधार विराट कोहली आणि निवड समिती त्यादिवसापर्यंत वाट पाहू शकतात. भारतासाठी सगळ्यात मोठी समस्या हार्दिक पांड्याचा फिटनेस आहे. आयपीएलच्या या मोसमात हार्दिक पांड्याने बॉलिंग केली नाही, त्यामुळे वर्ल्ड कपमध्ये तरी तो बॉलिंगसाठी फिट आहे का? हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. हार्दिक फिट नसेल तर त्याच्याऐवजी आणखी एखाद्या फास्ट बॉलरला खेळवण्याबाबतही चर्चा सुरू आहे. 24 ऑक्टोबरला पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यापासून भारतीय टीम टी-20 वर्ल्ड कपच्या मोहिमेला सुरुवात करेल. याआधी 2007 साली भारताने टी-20 वर्ल्ड कप जिंकला होता, यानंतर 14 वर्षांपासून टीम इंडियाची प्रतिक्षा कायम आहे. या स्पर्धेनंतर विराट टी-20 फॉरमॅटची कॅप्टन्सी सोडणार आहे, त्यामुळे शेवट गोड करून एक तरी आयसीसी ट्रॉफी जिंकण्याचा त्याचा प्रयत्न असेल. टी-20 वर्ल्ड कपसाठी भारतीय टीम विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, ईशान किशन, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, राहुल चाहर, आर अश्विन, अक्षर पटेल, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी राखीव खेळाडू श्रेयस अय्यर, दीपक चाहर, शार्दुल ठाकूर भारताचे टी-20 वर्ल्ड कपमधले सामने 24 ऑक्टोबर: भारत विरुद्ध पाकिस्तान 31 ऑक्टोबर: भारत विरुद्ध न्यूजीलैंड 3 नोव्हेंबर: भारत विरुद्ध अफगानिस्तान 5 नोव्हेंबर: भारत विरुद्ध बी1 8 नवंबर: भारत बनाम ए2
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: T20 world cup, Team india

    पुढील बातम्या