मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

T20 World Cup Team ची घोषणा, टीम इंडियाची पुन्हा 'लाज' गेली!

T20 World Cup Team ची घोषणा, टीम इंडियाची पुन्हा 'लाज' गेली!

Team India

Team India

टी-20 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये (T20 World Cup Final) ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडला (Australia vs New Zealand) धूळ चारली. स्पर्धा संपल्यानंतर आता आयसीसीने टी-20 वर्ल्ड कपच्या सर्वोत्तम 11 खेळाडूंच्या टीमची (ICC T20 World Cup Team) घोषणा केली आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  Shreyas

दुबई, 15 नोव्हेंबर : टी-20 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये (T20 World Cup Final) ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडला (Australia vs New Zealand) धूळ चारली. पाच वर्ल्ड कप जिंकणाऱ्या ऑस्ट्रेलियाला पहिल्यांदाच टी-20 ट्रॉफीवर आपलं नाव कोरता आलं. स्पर्धा संपल्यानंतर आता आयसीसीने टी-20 वर्ल्ड कपच्या सर्वोत्तम 11 खेळाडूंच्या टीमची (ICC T20 World Cup Team) घोषणा केली आहे. आयसीसीने जाहीर केलेल्या या टीममध्ये एकाही भारतीय खेळाडूचा समावेश नाही. आयसीसीच्या टीममध्ये डेव्हिड वॉर्नर आणि जॉस बटलर ओपनर आहेत, तर वानिंदु हसरंगा आणि एडम झम्पा हे दोन स्पिनर आहेत. ट्रेन्ट बोल्ट, एनरिच नॉर्किया आणि जॉश हेजलवूड यांची फास्ट बॉलर म्हणून निवड करण्यात आली आहे. मोईन अली हा एकमेव ऑलराऊंडर असून श्रीलंकेचा चरिथ असलंका आणि दक्षिण आफ्रिकेचा एडन मार्करम चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर आहेत. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमला तिसऱ्या क्रमांकावर बॅटिंग देण्यात आली आहे.

27 वर्षांच्या बाबर आझमने या स्पर्धेत 303 रन केल्या. बाबर आझमचा हा पहिलाच टी-20 वर्ल्ड कप होता. बाबरच्या नेतृत्वात पाकिस्तानने सुपर-12 चे सगळे सामने जिंकले, पण सेमी फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने त्यांचा पराभव केला. बाबरशिवाय पाकिस्तानचा डावखुरा फास्ट बॉलर शाहिन आफ्रिदी या टीममध्ये 12 वा खेळाडू आहे. भारताविरुद्धच्या सामन्यात शाहिन आफ्रिदीने रोहित शर्मा, केएल राहुल आणि विराट कोहली या महत्त्वाच्या विकेट घेतल्या.

आयसीसीची ही टीम कॉमेंटेटर इयन बिशप, नताली जर्मनोस आणि शेन वॉटसन तसंच पत्रकार लॉरेन्स बूथ आणि शाहिद हाश्मी यांनी निवडली आहे. आयसीसीच्या या टीममध्ये एकाही भारतीयाचा समावेश करण्यात आलेला नाही. यंदाच्या स्पर्धेत टीम इंडियाची कामगिरी निराशाजन झाली. पाकिस्तान आणि न्यूझीलंडविरुद्ध दारूण पराभव झाल्यानंतर भारताने अफगाणिस्तान, स्कॉटलंड आणि नामिबियाविरुद्ध विजय मिळवला, पण तरीही टीमला सेमी फायनलमध्ये प्रवेश करता आला नाही.

आयसीसीची टी-20 वर्ल्ड कप टीम

डेव्हिड वॉर्नर, जॉस बटलर, बाबर आझम (कर्णधार), चरिथ असलंका, एडन मार्करम, मोईन अली, वानिंदु हसरंगा, एडम झम्पा, ट्रेन्ट बोल्ट, एनरिच नॉर्किया, जॉश हेजलवूड

शाहिन आफ्रिदी (बारावा खेळाडू)

First published:

Tags: T20 world cup, Team india