• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • T20 World Cup : खेळाडू आणि कोच, इतिहासाची पुनरावृत्ती रवी शास्त्रींच्या नावावर नकोसा विक्रम

T20 World Cup : खेळाडू आणि कोच, इतिहासाची पुनरावृत्ती रवी शास्त्रींच्या नावावर नकोसा विक्रम

टी-20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) टीम इंडियाची (Team India) कामगिरी निराशाजनक झाली आहे. विराट कोहलीची (Virat Kohli) कॅप्टन म्हणून ही अखेरची टी-20 स्पर्धा आहे. याचसह टीम इंडियाचे मुख्य कोच रवी शास्त्री (Ravi Shastri) यांच्यासाठीही ही शेवटची सीरिज आहे.

 • Share this:
  दुबई, 7 नोव्हेंबर : टी-20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) टीम इंडियाची (Team India) कामगिरी निराशाजनक झाली आहे. पाकिस्तान आणि न्यूझीलंडविरुद्ध टीम इंडियाचा दारूण पराभव झाला, यानंतर विराटच्या टीमने जोरदार पुनरागमन करत अफगाणिस्तान आणि स्कॉटलंडला धूळ चारली, पण तरीही भारताचं सेमी फायनलला पोहोचण्याचं स्वप्न भंगलं. रविवारी झालेल्या अफगाणिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यातल्या सामन्यावर टीम इंडियाचं भवितव्य अवलंबून होतं. या मॅचमध्ये अफगाणिस्तानचा विजय झाला असता आणि सोमवारी भारताने नामिबियाचा पराभव केला असता तर टीम इंडिया सेमी फायनलला पोहचली असती. विराट कोहलीची (Virat Kohli) कॅप्टन म्हणून ही अखेरची टी-20 स्पर्धा आहे. या वर्ल्ड कपनंतर आपण टी-20 फॉरमॅटचं नेतृत्व सोडणार असल्याचं विराटने आधीच जाहीर केलं आहे. विराटसोबतच टीम इंडियाचे मुख्य कोच रवी शास्त्री (Ravi Shastri) यांचीही ही अखेरची स्पर्धा आहे. टी-20 वर्ल्ड कपनंतर रवी शास्त्री यांचा कार्यकाळ संपत आहे. रवी शास्त्री यांच्यानंतर राहुल द्रविडची टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. टी-20 वर्ल्ड कपमधून टीम इंडियाची एक्झिट झाल्यानंतर रवी शास्त्री यांच्या करियरमध्ये इतिहासाची पुनरावृत्ती झाली आहे. खेळाडू असतानाही रवी शास्त्री यांच्या कारकिर्दीचा शेवट असाच झाला होता. 1992 साली टीमच्या अखेरच्या मॅचचा निकाल लागण्याआधीच भारतीय टीम स्पर्धेतून बाद झाली होती. आता परत प्रशिक्षक म्हणूनही नामिबियाविरुद्धच्या अखेरच्या मॅचआधी टीम इंडिया स्पर्धेतून बाद झाली आहे. रवी शास्त्री कोच असताना भारतीय टीमने ऐतिहासिक कामगिरी केली. भारताने ऑस्ट्रेलियाचा त्यांच्याच मायभूमीत दोनदा टेस्ट सीरिजमध्ये पराभव केला. तर इंग्लंड दौऱ्यात टेस्ट सीरिजमध्ये 2-1 ने आघाडी घेतली. शास्त्रींच्या कार्यकाळात टीमच्या पदरी निराशाही आली. एकाही आयसीसी ट्रॉफीमध्ये टीम इंडियाचा विजय झाला नाही, तसंच ऑस्ट्रेलिया दौऱ्यात मेलबर्न टेस्टमध्ये भारताचा 36 रनवर ऑल आऊट झाला. टेस्ट इतिहासातला टीम इंडियाचा हा निच्चांकी स्कोअर आहे.
  Published by:Shreyas
  First published: