Home /News /sport /

T20 World Cup : हर्षा भोगलेंनी निवडली टीम इंडिया, 'कॅप्टन'लाच दिला डच्चू

T20 World Cup : हर्षा भोगलेंनी निवडली टीम इंडिया, 'कॅप्टन'लाच दिला डच्चू

श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 सीरिजमध्ये भारताचा (India vs Sri Lanka) 2-1 ने पराभव झाला, यानंतर आता टीम इंडिया थेट टी-20 वर्ल्ड कपमध्येच (T20 World Cup) खेळणार आहे. लोकप्रिय कॉमेंटेटर हर्षा भोगले (Harsha Bhogle) यांनी वर्ल्ड कपसाठीच्या टीममध्ये कोणाला संधी मिळेल, याबाबतचं भाकीत वर्तवलं.

पुढे वाचा ...
    मुंबई, 31 जुलै : श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 सीरिजमध्ये भारताचा (India vs Sri Lanka) 2-1 ने पराभव झाला, यानंतर आता टीम इंडिया थेट टी-20 वर्ल्ड कपमध्येच (T20 World Cup) खेळणार आहे. तीन महिन्यांवर आलेल्या या स्पर्धेसाठी कोणाला संधी द्यायची यासाठी विराट कोहली (Virat Kohli), रवी शास्त्री (Ravi Shastri) आणि टीम इंडियाला डोकेफोड करावी लागणार आहे. लोकप्रिय कॉमेंटेटर हर्षा भोगले (Harsha Bhogle) यांनी क्रिकबझशी बोलताना वर्ल्ड कपसाठीच्या टीममध्ये कोणाला संधी मिळेल, याबाबतचं भाकीत वर्तवलं. धक्कादायक म्हणजे श्रीलंका दौऱ्यावर कर्णधार असलेल्या शिखर धवन (Shikhar Dhawan) याला हर्षा भोगलेंनी त्यांच्या टीममध्ये जागा दिली नाही. रोहित शर्मा, केएल राहुल, विराट कोहली आणि सूर्यकुमार यादव यांचं टीममधलं स्थान निश्चित झालं आहे, तर पाचव्या क्रमांकासाठी श्रेयस अय्यर आणि इशान किशन यांच्यात स्पर्धा असल्याचं हर्षा भोगले म्हणाले. ऑलराऊंडर म्हणून हर्षा भोगले यांनी हार्दिक पांड्या, वॉशिंग्टन सुंदर आणि रविंद्र जडेजा यांना संधी दिली आहे. तसंच विकेट कीपिंगची जबाबदारी त्यांनी ऋषभ पंतवर सोपवली आहे. पुन्हा 'मौका मौका', T20 World Cup मध्ये भारत-पाकिस्तान लढत स्पिनर म्हणून त्यांनी युझवेंद्र चहल आणि वरुण चक्रवर्तीला निवडलं आहे, तसंच फास्ट बॉलर म्हणून भुवनेश्वर कुमार, दीपक चहर आणि जसप्रीत बुमराह यांचं नाव भोगलेंनी घेतलं आहे. चौथ्या फास्ट बॉलरसाठी मोहम्मद शमी आणि टी नटराजन यांच्यात स्पर्धा असेल, असंही त्यांना वाटतं. गेल्या काही काळापासून संघर्ष करत असलेला स्पिनर कुलदीप यादवला हर्षा भोगलेंनी टीममधून वगळलं आहे. श्रीलंकेविरुद्धच्या 3 टी-20 मॅचच्या सीरिजमध्ये कुलदीपला फक्त 2 विकेटच घेता आल्या. याशिवाय टीम इंडियाला वर्ल्ड कपमध्ये ऑफ स्पिनरची कमी जाणवू शकते, असं हर्षा भोगलेंना वाटतं. वेस्ट इंडिजच्या टीममध्ये गेल, लुईस, हेटमायर, पूरन यांच्यासारखे डावखुरे बॅट्समन आहेत, त्यामुळे टीमला अश्विनसारख्या डावखुऱ्या बॅट्समनपासून बॉल बाहेर नेणाऱ्या खेळाडूची गरज असल्याचं मत हर्षा भोगलेंनी व्यक्त केलं आहे. हर्षा भोगलेंची वर्ल्ड कपसाठीची टीम इंडिया रोहित शर्मा, केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर/इशान किशन, ऋषभ पंत, हार्दिक पांड्या, वरुण चक्रवर्ती, वॉशिंग्टन सुंदर, रविंद्र जडेजा, दीपक चहर, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी/टी नटराजन, युझवेंद्र चहल
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Kuldeep yadav, Shikhar dhawan, T20 world cup, Team india

    पुढील बातम्या