• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • T20 World Cup : हे 'फिक्सिंग' नाही खरं आहे, अफगाणिस्तान टॉस जिंकल्यानंतर टीम इंडियासाठी Good News

T20 World Cup : हे 'फिक्सिंग' नाही खरं आहे, अफगाणिस्तान टॉस जिंकल्यानंतर टीम इंडियासाठी Good News

टी-20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) टीम इंडियासाठी (Team India) आजचा दिवस महत्त्वाचा आहे. अफगाणिस्तान आणि न्यूझीलंड (Afghanistan vs New Zealand) यांच्यातल्या सामन्यावर टीम इंडियाचं सेमी फायनलचं भवितव्य ठरणार आहे.

 • Share this:
  अबु धाबी, 7 नोव्हेंबर : टी-20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) टीम इंडियासाठी (Team India) आजचा दिवस महत्त्वाचा आहे. अफगाणिस्तान आणि न्यूझीलंड (Afghanistan vs New Zealand) यांच्यातल्या सामन्यावर टीम इंडियाचं सेमी फायनलचं भवितव्य ठरणार आहे. या सामन्याच्या सुरुवातीलाच टीम इंडियासाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. अफगाणिस्तानचा कर्णधार मोहम्मद नाबी (Mohammad Nabi) याने टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला आहे. अफगाणिस्तानचं दुपारच्या सामन्यांमधलं रेकॉर्ड धमाकेदार आहे. 2016 टी-20 वर्ल्ड कपनंतर अफगाणिस्तानने दुपारी 19 मॅच खेळल्या, यातल्या 18 मॅचमध्ये त्यांचा विजय झाला, तर एक सामना त्यांना सुपर ओव्हरमध्ये गमवावा लागला. यातल्या 13 सामन्यांमध्ये त्यांनी पहिले बॅटिंग केली आणि सगळ्या 13 मॅचमध्ये त्यांचा विजय झाला. टीम इंडियासाठी अफगाणिस्तानचं हे रेकॉर्ड नक्कीच दिलासादायक म्हणावं लागेल. सेमी फायनलचं गणित सुपर-12 राऊंडचा शेवटचे दोन दिवस शिल्लक असताना सेमी फायनलच्या तीन टीम ठरल्या आहेत. इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांनी सेमी फायनलमध्ये प्रवेश केला आहे, तर चौथ्या स्थानासाठी भारत, न्यूझीलंड आणि अफगाणिस्तान यांच्यात रेस आहे. या सामन्यात अफगाणिस्तानचा विजय झाला आणि सोमवारी भारताने नामिबियाला हरवलं तर टीम इंडिया सेमी फायनलमध्ये प्रवेश करणारी चौथी टीम ठरेल. दुसरीकडे न्यूझीलंडला या सामन्यात विजय मिळाला तर ते थेट सेमी फायनलला पोहोचतील. अफगाणिस्तानची टीम हजरतुल्लाह झझई, मोहम्मद शहजाद, रहमतुल्लाह गुरबाझ, नजीबुल्लाह झादरान, गुलबदीन नाईब, मोहम्मद नबी, करीम जन्नत, राशिद खान, नवीन उल हक, हमीद हसन मुजीब उर रहमान न्यूझीलंडची टीम मार्टिन गप्टील, डॅरेल मिचेल, केन विलियमसन, डेवॉन कॉनवे, ग्लेन फिलिप्स, जेम्स नीशम, मिचेल सॅन्टनर, एडम मिल्ने, टीम साऊदी, ईश सोढी, ट्रेन्ट बोल्ट
  Published by:Shreyas
  First published: