मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

T20 World Cup : 'तो तर टीम इंडियासाठी ओझं', गंभीरचा मुंबई इंडियन्सच्या स्टारवर निशाणा

T20 World Cup : 'तो तर टीम इंडियासाठी ओझं', गंभीरचा मुंबई इंडियन्सच्या स्टारवर निशाणा

आयपीएल 2021 (IPL 2021) संपल्यानंतर लगेच टी-20 वर्ल्ड कपला (T20 World Cup) सुरुवात होणार आहे. भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर (Gautam Gambhir) यानेही मुंबई इंडियन्सच्या (Mumbai Indians) स्टार खेळाडूच्या निवडीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  Shreyas

दुबई, 6 ऑक्टोबर : आयपीएल 2021 (IPL 2021) संपल्यानंतर लगेच टी-20 वर्ल्ड कपला (T20 World Cup) सुरुवात होणार आहे. या स्पर्धेत टीम इंडियामध्ये मुंबई इंडियन्सचे (Mumbai Indians) तब्बल 6 खेळाडू आहेत. रोहित शर्मा, इशान किशन, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, राहुल चहर आणि जसप्रीत बुमराह या मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंची भारताच्या वर्ल्ड कप टीममध्येही निवड झाली आहे, पण मुंबईच्या खेळाडूंचा फॉर्म टीम इंडिया आणि कर्णधार विराट कोहलीसाठी चिंतेचा विषय बनला आहे. भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर (Gautam Gambhir) यानेही मुंबई इंडियन्सचा स्टार खेळाडू हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) निवडीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.

हार्दिक पांड्या हा आता एका फॉरमॅटचा खेळाडू आहे आणि टीम इंडियासाठी ओझं आहे, अशी प्रतिक्रिया गौतम गंभीर याने इएसपीएन क्रिकइन्फोशी बोलताना दिली. 'सगळ्यात मोठी निराशा हार्दिक पांड्याने केली आहे. तो आता फक्त एका फॉरमॅटचा खेळाडू आहे. तो फक्त पांढऱ्या बॉलनेच खेळत आहे. या वर्षी त्याने अजिबात चांगली कामगिरी केली नाही. बॉलिंग न करताही त्याची टी-20 वर्ल्ड कपसाठी निवड झाली, माझ्यासाठी हे धक्कादायक आहे,' असं वक्तव्य गंभीरने केलं.

'वर्ल्ड कपमध्ये हार्दिक 4 ओव्हर बॉलिंग करणार आहे का? करणार असेल तर त्याने इतके दिवस बॉलिंगचा सराव केलेला नाही. जर त्याला वर्ल्ड कपमध्ये बॉलिंग करायची असेल तर त्याला आतापासूनच मॅचमध्ये बॉलिंग करायला सुरुवात करावी लागेल. निवड समितीने याबाबतची उत्तरं दिली पाहिजेत,' असं गंभीर म्हणाला.

हार्दिक पांड्याने आयपीएलच्या या मोसमात अजूनपर्यंत एकदाही बॉलिंग केलेली नाही. राजस्थान रॉयल्सविरुद्ध तो मंगळवारी अखेरची मॅच खेळला, तर मुंबईचा पुढचा सामना 8 ऑक्टोबरला हैदराबादविरुद्ध आहे. आयपीएलच्या लीग स्टेजचा मुंबईचा हा अखेरचा सामना असेल. मुंबईची टीम प्ले-ऑफमध्ये पोहोचली नाही, तर आता हार्दिकला बॉलिंग करण्यासाठी केवळ एकच मॅच उपलब्ध आहे.

मुंबई इंडियन्सचे मुख्य प्रशिक्षक महेला जयवर्धने यांनाही हार्दिकच्या फिटनेसबाबत आणि तो बॉलिंग का करत नाही, याबाबत प्रश्न विचारण्यात आला. हार्दिकला बॉलिंग दिली तर त्याला त्रास होऊ शकतो, असं वक्तव्य महेला जयवर्धने यांनी केलं. जयवर्धने यांच्या या वक्तव्यानंतरही हार्दिक जर फिट नव्हता, तर मग त्याची टी-20 वर्ल्ड कपसाठी निवड कशी झाली, असा सवाल उपस्थित करण्यात आला. वर्ल्ड कपसाठी जेव्हा टीम निवडण्यात आली तेव्हा निवड समिती अध्यक्षांनी हार्दिकची ऑलराऊंडर म्हणून निवड झाली आहे आणि तो बॉलिंग करणार आहे, असं वक्तव्य केलं होतं.

First published:

Tags: Gautam gambhir, Hardik pandya, IPL 2021, Mumbai Indians, T20 world cup