• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • T20 World Cup : धवनसह 3 दिग्गजांना माजी सिलेक्टरने केलं बाहेर, या 15 खेळाडूंना संधी

T20 World Cup : धवनसह 3 दिग्गजांना माजी सिलेक्टरने केलं बाहेर, या 15 खेळाडूंना संधी

यंदाच्या वर्षाचा टी-20 वर्ल्ड कप (T20 World Cup) युएई आणि ओमानमध्ये होणार आहे. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आपल्या नेतृत्वात पहिली आयसीसी ट्रॉफी जिंकू इच्छित आहे. टी-20 वर्ल्ड कपसाठी टीमची निवड करणं निवड समितीसाठी डोकेदुखी ठरणार आहे.

 • Share this:
  मुंबई, 1 ऑगस्ट : टीम इंडियाला 2013 चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर कोणतीच आयसीसी स्पर्धा जिंकता आली नाही. आता यंदाच्या वर्षाचा टी-20 वर्ल्ड कप (T20 World Cup) युएई आणि ओमानमध्ये होणार आहे. या स्पर्धेत एकूण 16 टीम उतरणार आहेत. टी-20 वर्ल्ड कपचं हे 7 वं पर्व असणार आहे. वेस्ट इंडिजची टीम टी-20 वर्ल्ड कपची गतविजेती आहे. तसंच सर्वाधिक 2 वेळा त्यांनाच टी-20 वर्ल्ड कप जिंकता आला आहे. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आपल्या नेतृत्वात पहिली आयसीसी ट्रॉफी जिंकू इच्छित आहे. टी-20 वर्ल्ड कपसाठी टीमची निवड करणं निवड समितीसाठी डोकेदुखी ठरणार आहे. भारतीय टीमचे माजी निवड समिती सदस्य साबा करीम (Saba Karim) यांनी वर्ल्ड कपसाठी कोणत्या खेळाडूंची निवड होईल हे सांगितलं आहे. साबा करीम इंडिया न्यूजशी बोलत होते. आश्चर्यकारक म्हणजे त्यांनी शिखर धवन (Shikhar Dhawan) याच्यासह आणखी काही दिग्गजांना टीमबाहेर ठेवलं आहे. श्रीलंकेविरुद्धच्या सीरिजमध्ये शिखर धवन टीमचा कर्णधार होता. 'अनेक खेळाडू चांगली कामगिरी करूनही श्रीलंकेतल्या टी-20 सीरिजमध्ये खेळू शकले नाहीत, कारण ते इंग्लंडमध्ये होते. टी-20 वर्ल्ड कप युएईमध्ये होणार आहे, त्यामुळे वॉशिंग्टन सुंदर ऑलराऊंडर म्हणून टीममध्ये असेल,' असं साबा करीम म्हणाले. वॉशिंग्टन सुंदर (Washington Sundar) दुखापतीमुळे इंग्लंड सीरिजमधून बाहेर झाला आहे. T20 World Cup : हर्षा भोगलेंनी निवडली टीम इंडिया, 'कॅप्टन'लाच दिला डच्चू साबा करीम यांनी युझवेंद्र चहलऐवजी (Yuzvendra Chahal) राहुल चहरला टीममध्ये संधी दिली आहे. युझवेंद्र चहल टी-20 आंतरराष्ट्रीयमध्ये भारताचा सर्वाधिक विकेट घेणारा खेळाडू आहे. तसंच साबा करीम यांनी मोहम्मद शमी (Mohammad Shami) आणि पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) याचीही त्यांच्या वर्ल्ड कपसाठीच्या टीममध्ये निवड केली नाही. धवनची श्रीलंकेतली कामगिरी निराशाजनक झाली, त्यामुळे ओपनर म्हणून रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि केएल राहुल (KL Rahul) यांनी खेळावं, असं साबा करीम यांना वाटत आहे. साबा करीम यांची टीम विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, केएल राहुल, श्रेयस अय्यर, ईशान किशन, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, हार्दिक पांड्या, वॉशिंगटन सुंदर, टी नटराजन, जसप्रीत बुमराह, रवींद्र जडेजा, राहुल चाहर, दीपक चहर, भुवनेश्वर कुमार
  Published by:Shreyas
  First published: