मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

T20 World Cup IND vs AFG : जिंकले एकदाचे! टीम इंडियाचा अफगाणिस्तानवर दणदणीत विजय

T20 World Cup IND vs AFG : जिंकले एकदाचे! टीम इंडियाचा अफगाणिस्तानवर दणदणीत विजय

टी-20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) अखेर टीम इंडियाचा पहिला विजय झाला आहे. अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारताचा (India vs Afghanistan) 66 रनने विजय झाला आहे.

टी-20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) अखेर टीम इंडियाचा पहिला विजय झाला आहे. अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारताचा (India vs Afghanistan) 66 रनने विजय झाला आहे.

टी-20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) अखेर टीम इंडियाचा पहिला विजय झाला आहे. अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारताचा (India vs Afghanistan) 66 रनने विजय झाला आहे.

  • Published by:  Shreyas

अबु धाबी, 3 नोव्हेंबर : टी-20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) अखेर टीम इंडियाचा पहिला विजय झाला आहे. अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारताचा (India vs Afghanistan) 66 रनने विजय झाला आहे. भारताने दिलेल्या 211 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना अफगाणिस्तानला 20 ओव्हरमध्ये 7 विकेट गमावून 144 रन करता आल्या. या विजयामुळे भारताच्या सेमी फायनलला पोहोचण्याच्या आशा अजूनही कायम आहेत. भारताकडून या सामन्यात मोहम्मद शमीला सर्वाधिक 3 विकेट मिळाल्या, तर आर अश्विनला 2 विकेट घेण्यात यश आलं. जसप्रीत बुमराह आणि रविंद्र जडेजालाही प्रत्येकी 1-1 विकेट मिळाली. अफगाणिस्तानकडून करीम जन्नतने 22 बॉलमध्ये नाबाद 42 आणि कर्णधार मोहम्मद नबीने सर्वाधिक 35 रन केले.

त्याआधी भारताने 20 ओव्हरमध्ये तब्बल 210 रन केले आहेत. रोहित शर्मा 74 रन आणि केएल राहुल 69 रन करून आऊट झाले. या दोन्ही ओपनरनी 14.4 ओव्हरमध्ये 140 रनची पार्टनरशीप केली. यानंतर ऋषभ पंत आणि हार्दिक पांड्या यांनी अफगाणिस्तानच्या बॉलिंगवर आक्रमण केलं. हार्दिक पांड्याने 13 बॉलमध्ये नाबाद 35 रन आणि ऋषभ पंतने 13 बॉलमध्ये नाबाद 27 रनची खेळी केली. यंदाच्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये पहिल्यांदाच एखाद्या टीमला 200 रनचा टप्पा ओलांडता आला आहे.

अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात टीम इंडियाचा (India vs Afghanistan) कर्णधार विराट कोहलीला (Virat Kohli) टॉस जिंकण्यात पुन्हा एकदा अपयश आलं आहे. अफगाणिस्तानचा कर्णधार मोहम्मद नबीने (Mohammad Nabi) टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय घेतला. या सामन्यासाठी भारतीय टीममध्ये दोन बदल करण्यात आले. ईशान किशनला वगळून सूर्यकुमार यादवचं टीममध्ये पुनरागमन झालं आहे. तर वरुण चक्रवर्तीऐवजी आर.अश्विनला संधी देण्यात आली.

टी-20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाची कामगिरी अत्यंत खराब झाली. पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या सामन्यात भारताचा 10 विकेटने पराभव झाला, यानंतर न्यूझीलंडने टीम इंडियाचा 8 विकेटने पराभव केला. या दोन पराभवांमुळे टीम इंडियाचं सेमी फायनलला पोहोचण्याचं स्वप्न धूसर झालं आहे. भारताला आता नामिबिया आणि स्कॉटलंडचा मोठ्या फरकाने पराभव करावा लागणार आहे. सोबतच उरलेल्या सामन्यांमध्ये न्यूझीलंडचा पराभवही होणं गरजेचं आहे. पाकिस्तानची टीम आधीच सेमी फायनलमध्ये पोहोचली आहे.

न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात टीम इंडियाने बॅटिंग ऑर्डरमध्ये मोठे बदल केले होते. टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक 4 शतकं करणाऱ्या रोहित शर्माला ओपनिंगला न पाठवता तिसऱ्या क्रमांकावर पाठवण्यात आलं होतं. तर केएल राहुलसोबत इशान किशन ओपनिंगला आला होता. रोहितला तिसऱ्या क्रमांकावर पाठवण्याच्या निर्णयावर जोरदार टीका करण्यात आली होती. अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात मात्र केएल राहुल आणि रोहित शर्मा ओपनिंगला आले.

भारतीय टीम

रोहित शर्मा, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, विराट कोहली, ऋषभ पंत, हार्दिक पांड्या, रविंद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, आर.अश्विन, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह

अफगाणिस्तानची टीम

हझरतुल्लाह झझई, मोहम्मद शहजाद, रहमतुल्लाह गुरबाझ, नजीबुल्लाह झादरान, मोहम्मद नबी, गुलबदीन नईब, करीम जन्नत, नवीन उल हक, हमीद हसन

First published:

Tags: Afghanistan, T20 world cup, Team india, Virat kohli