मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

T20 World Cup : ज्याला टीममधून काढलं त्याने 48 दिवसांमध्येच घेतला विलियमसनचा बदला!

T20 World Cup : ज्याला टीममधून काढलं त्याने 48 दिवसांमध्येच घेतला विलियमसनचा बदला!

टी-20 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये (T20 World Cup Final) ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडला (Australia vs New Zealand) धूळ चारली आहे, त्यामुळे केन विलियमसनचं (Kane Williamson) वर्ल्ड कप जिंकण्याचं स्वप्न पुन्हा भंगलं आहे.

  • Published by:  Shreyas

दुबई, 14 फेब्रुवारी : टी-20 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये (T20 World Cup Final) ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडला (Australia vs New Zealand) धूळ चारली आहे. ऑस्ट्रेलियाने पहिल्यांदाच टी-20 वर्ल्ड कपवर कब्जा केला आहे. याआधी कांगारूंनी सर्वाधिक 5 वेळा वनडे वर्ल्ड कप जिंकला होता. आता त्यांच्या खात्यात 6 वर्ल्ड कप आहेत. न्यूझीलंडने दिलेल्या 173 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची सुरुवात खराब झाली होती. एरॉन फिंच (Aron Finch) फक्त 5 रन करून आऊट झाला, पण यानंतर डेव्हिड वॉर्नर (David Warner) आणि मिचेल मार्शच्या (Mitchell Marsh) जोडीने न्यूझीलंडच्या बॉलिंगवर आक्रमण केलं. मिचेल मार्श 50 बॉलमध्ये 77 रनवर नाबाद राहिला, त्याच्या या खेळीमध्ये 6 फोर आणि 4 सिक्सचा समावेश होता. तर डेव्हिड वॉर्नरने 38 बॉलमध्ये 53 रन केले. वॉर्नरने 4 फोर आणि 3 सिक्स लगावले.

टी-20 वर्ल्ड कपच्या सुरुवातीला डेव्हिड वॉर्नरचा फॉर्म ऑस्ट्रेलियासाठी चिंतेचा विषय होता, कारण आयपीएलमध्ये (IPL 2021) वॉर्नर संघर्ष करत होता. एवढच नाही तर त्याला टीममधूनही बाहेर करण्यात आलं होतं. वॉर्नरच्या खराब फॉर्ममुळे त्याला सनरायजर्स हैदराबादच्या (SRH) कॅप्टन्सीवरून डच्चू देण्यात आला. यानंतर केन विलियमसनला (Kane Williamson) टीमचं नेतृत्व देण्यात आलं. वॉर्नरच्या खराब फॉर्ममुळे अखेर केन विलियमसनने वॉर्नरला हैदराबादच्या टीममधून बाहेर केलं. वॉर्नरने मात्र अवघ्या काही दिवसांमध्येच याचा बदला घेतला आणि केन विलियमसनचं स्वप्न पुन्हा एकदा भंगलं.

डेव्हिड वॉर्नर आयपीएलमध्ये सनरायजर्स हैदराबादकडून अखेरचा सामना 25 सप्टेंबर 2021 ला खेळला. यानंतर 27 सप्टेंबरला राजस्थानविरुद्धच्या सामन्यापासून त्याला टीममधून बाहेर करण्यात आलं. यानंतर वॉर्नर हैदराबादच्या ड्रेसिंग रूममध्येही दिसला नाही. अखेरच्या काही सामन्यांमध्ये तर वॉर्नर स्टेडियममध्ये बसून हैदराबादच्या टीमची जर्सी घालून दिसला होता. आयपीएलच्या पुढच्या मोसमात आपण नव्या टीमसोबत आयपीएल खेळणार असल्याचं वॉर्नरने आधीच स्पष्ट केलं आहे.

First published:

Tags: T20 world cup