• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • T20 World Cup Final : लागोपाठ दुसऱ्या फायनलमध्ये विलियमसनचा धमाका, नव्या 'कॅप्टन कूल'ने केला वर्ल्ड रेकॉर्ड

T20 World Cup Final : लागोपाठ दुसऱ्या फायनलमध्ये विलियमसनचा धमाका, नव्या 'कॅप्टन कूल'ने केला वर्ल्ड रेकॉर्ड

केन विलियमसनने (Kane Williamson) टी-20 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये (T20 World Cup Final) धमाकेदार खेळी करून न्यूझीलंडला (Australia vs New Zealand) मजबूत स्थितीमध्ये पोहोचवलं.

 • Share this:
  दुबई, 14 नोव्हेंबर : केन विलियमसनने (Kane Williamson) टी-20 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये (T20 World Cup Final) धमाकेदार खेळी करून न्यूझीलंडला (Australia vs New Zealand) मजबूत स्थितीमध्ये पोहोचवलं. न्यूझीलंडच्या कर्णधाराने 48 बॉलमध्ये 85 रनची खेळी केली, यात 10 फोर आणि 3 सिक्सचा समावेश होता. विलियमसनच्या या आक्रमक बॅटिंगमुळे न्यूझीलंडने 4 विकेट गमावून 172 रन केले. टी-20 वर्ल्ड कप फायनल इतिहासातला हा सर्वाधिक स्कोअर आहे. याआधी 2016 साली वेस्ट इंडिजने इंग्लंडविरुद्ध 161 रन केले होते. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांना आतापर्यंत एकदाही टी-20 वर्ल्ड कप जिंकता आलेला नाही. केन विलियमसन टी-20 वर्ल्ड कप फायनलमध्ये सर्वाधिक रन करणारा कॅप्टनही झाला आहे. याआधी 2009 साली श्रीलंकेच्या कुमार संगकाराने फायनलमध्ये पाकिस्तानविरुद्ध नाबाद 64 रनची खेळी केली होती. विलियमसनचं या टी-20 वर्ल्ड कपमधलं हे पहिलं अर्धशतक आहे. याआधी त्याने अफगाणिस्तानविरुद्ध नाबाद 40 रनची खेळी केली होती. न्यूझीलंडने आतापर्यंत वनडे वर्ल्ड कपही जिंकला नाही, तर ऑस्ट्रेलियाला 5 वेळा वनडे वर्ल्ड कप जिंकता आला आहे. फायनलमध्ये न्यूझीलंडची सुरुवात खूप संथ झाली होती. पहिल्या 10 ओव्हरमध्ये किवी टीमचा स्कोअर एक विकेट गमावून 57 रन झाला होता. अखेरच्या 10 ओव्हरमध्ये त्यांनी 115 रन केल्या. मार्टिन गप्टीलने 28 रन केले. मिचेल स्टार्कने 4 ओव्हरमध्ये 60 रन दिले.
  Published by:Shreyas
  First published: