मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /T20 World Cup : फक्त ही दोन कामं झाली तर टीम इंडिया पोहोचणार सेमी फायनलमध्ये!

T20 World Cup : फक्त ही दोन कामं झाली तर टीम इंडिया पोहोचणार सेमी फायनलमध्ये!

टी-20 वर्ल्ड कपच्या (T20 World Cup) ग्रुप-2 मधून पाकिस्तानने (Pakistan) सेमी फायनलमधलं आपलं स्थान पक्कं केलं आहे, पण या ग्रुपमधली सेमी फायनलला जाणारी दुसरी टीम कोण, याबाबतचा सस्पेन्स अजूनही कायम आहे. भारत (Team India), न्यूझीलंड (New Zealand) आणि अफगाणिस्तान (Afghanistan) या तिन्ही टीममध्ये रेस आहे.

पुढे वाचा ...

दुबई, 5 नोव्हेंबर : टी-20 वर्ल्ड कपच्या (T20 World Cup) ग्रुप-2 मधून पाकिस्तानने (Pakistan) सेमी फायनलमधलं आपलं स्थान पक्कं केलं आहे, पण या ग्रुपमधली सेमी फायनलला जाणारी दुसरी टीम कोण, याबाबतचा सस्पेन्स अजूनही कायम आहे. भारत (Team India), न्यूझीलंड (New Zealand) आणि अफगाणिस्तान (Afghanistan) या तिन्ही टीममध्ये सेमी फायनलला पोहोचण्याची स्पर्धा आहे. तिन्ही टीममध्ये टीम इंडियाचा मार्ग जास्त खडतर आहे, तर अफगाणिस्तानच्या मार्गातही काटे आहेत. ग्रुप-2मध्ये न्यूझीलंडचा सेमी फायनलमध्ये पोहोचण्याचा मार्ग सोपा दिसत आहे. भारत आणि न्यूझीलंडच्या प्रत्येकी 3-3 मॅच झाल्या आहेत, तर अफगाणिस्तान चार मॅच खेळला आहे. या ग्रुपमधल्या दोन गोष्टी बाजूने गेल्या तर टीम इंडिया सेमी फायनलला पोहोचू शकते.

दोन्ही मॅचमध्ये मोठा विजय

टीम इंडियाचे उरलेले सामने स्कॉटलंड (Scotland) आणि नामिबियाविरुद्ध (Namibia) आहेत. भारताचा पाकिस्तानविरुद्ध 10 विकेटने आणि न्यूझीलंडविरुद्ध 8 विकेटने पराभव झाला. या दोन्ही मोठ्या पराभवामुळे टीम इंडियाचा नेट रनरेट खराब झाला, पण अफगाणिस्तानविरुद्ध 66 रनने विजय झाल्यामुळे भारताचा नेट रनरेट सुधारला. असं असलं तरी टीम इंडियाला उरलेले सामने मोठ्या फरकाने जिंकावे लागणार आहेत. भारताने पहिले बॅटिंग केली तर त्यांना कमीत कमी 60-70 रनने विजय मिळवावा लागेल. तसंच आव्हानाचा पाठलाग कमीत कमी विकेट गमावून आणि कमीत ओव्हरमध्ये करावा लागेल.

न्यूझीलंड-अफगाणिस्तान मॅचवर नजर

न्यूझीलंडचा आजचा सामना नामिबियाविरुद्ध आहे. जर किवी टीम नामिबियाविरुद्ध पराभूत झाली तर भारत आणि न्यूझीलंड यांच्या खात्यात प्रत्येकी दोन-दोन पराभव असतील, त्यामुळे भारताचा मार्ग थोडा सोपा होऊ शकतो. न्यूझीलंडचा नामिबियाविरुद्ध विजय झाला, तर मात्र भारताच्या आशा अफगाणिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यातल्या मॅचवर टिकून राहतील. अफगाणिस्तानने न्यूझीलंडला हरवलं आणि भारताने उरलेल्या दोन्ही मॅच जिंकल्या, तर तिन्ही टीमच्या खात्यात प्रत्येकी 6-6 पॉईंट्स असतील, त्यामुळे ज्या टीमचा नेट रनरेट चांगला असेल त्यांचा सेमी फायनलमध्ये प्रवेश होईल.

First published:
top videos

    Tags: Afghanistan, New zealand, T20 world cup, Team india