शारजाह, 1 नोव्हेंबर : इंग्लंडच्या जॉस बटलरने (Jos Buttler) यंदाच्या टी-20 वर्ल्ड कपमधलं (T20 World Cup) पहिलं शतक झळकावलं आहे. श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात (England vs Sri Lanka) जॉस बटलरने 67 बॉलमध्ये नाबाद 101 रन केले. बटलरच्या या खेळीमध्ये 6 फोर आणि 6 सिक्सचा समावेश होता. बटलरच्या या वादळी शतकामुळे इंग्लंडने श्रीलंकेला विजयासाठी 164 रनचं आव्हान दिलं. या सामन्यात श्रीलंकेने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला, यानंतर इंग्लंडला सुरुवातीलाच धक्के लागले. इंग्लंडची अवस्था 35/3 अशी झाली होती, पण बटलरने कर्णधार इयन मॉर्गनच्या मदतीने श्रीलंकेवर आक्रमण सुरूच ठेवलं.
यंदाच्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये बटलर जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. जॉस बटलरने याआधी ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या सामन्यातही 32 बॉलमध्ये नाबाद 71 रन केले होते. कांगारूंविरुद्ध बटलरने 5 फोर आणि 5 सिक्स लगावल्या होत्या. बांगलादेशविरुद्ध बटलरने 18 रन केले, तर वेस्ट इंडिजविरुद्ध तो 24 रनवर नाबाद राहिला.
Brilliant Buttler 👏 The England opener delivers the first century of the ICC Men's #T20WorldCup 2021.#ENGvSL pic.twitter.com/XsLkKWq0gW
— T20 World Cup (@T20WorldCup) November 1, 2021
जॉस बटलरचं टी-20 आंतरराष्ट्रीयमधलं हे पहिलंच शतक आहे. श्रीलंकेकडून वानिंदु हसरंगाने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या, तर दुष्मंता चमिराला एक विकेट घेण्यात यश आलं. स्पिनरना मदत करणाऱ्या शारजाहच्या खेळपट्टीवर श्रीलंकेच्या स्पिनरनी इंग्लंडच्या बॅटिंगला रोखून धरलं, पण बटलरने श्रीलंकेच्या फास्ट बॉलर्सवर हल्ला चढवला. श्रीलंकेच्या फास्ट बॉलर्सनी 12 ओव्हरमध्ये 128 रन देऊन एक विकेट मिळवली, तर स्पिनर्सनी 8 ओव्हरमध्ये फक्त 34 रन देत तीन विकेट पटकावल्या.
टी-20 वर्ल्ड कपच्या सुपर-12 स्टेजमध्ये इंग्लंडची टीम दुसऱ्या ग्रुपमध्ये आहे. तीन पैकी तीन सामने जिंकल्यामुळे पॉईंट्स टेबलमध्ये इंग्लंड पहिल्या क्रमांकावर आहे, त्यामुळे इंग्लंडचं सेमी फायनलमध्ये पोहोचणं जवळपास निश्चित आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: T20 world cup