मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

T20 World Cup : 2016 ला स्टोक्स तर 2021 ला हा खेळाडू ठरला व्हिलन, दुसऱ्यांदा इंग्लंडला 'नॉक आऊट' पंच!

T20 World Cup : 2016 ला स्टोक्स तर 2021 ला हा खेळाडू ठरला व्हिलन, दुसऱ्यांदा इंग्लंडला 'नॉक आऊट' पंच!

टी-20 वर्ल्ड कपच्या (T20 World Cup Semi Final) सेमी फायनलमध्ये न्यूझीलंडने इंग्लंडवर (England vs New Zealand) रोमांचक विजय मिळवला आहे. यानंतर इंग्लंडच्या 2016 वर्ल्ड कपच्या कटू आठवणी पुन्हा एकदा जाग्या झाल्या.

  • Published by:  Shreyas

अबु धाबी, 10 नोव्हेंबर : टी-20 वर्ल्ड कपच्या (T20 World Cup Semi Final) सेमी फायनलमध्ये न्यूझीलंडने इंग्लंडवर (England vs New Zealand) रोमांचक विजय मिळवला आहे. इंग्लंडने दिलेल्या 167 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडची सुरुवात अत्यंत खराब झाली होती. 13 रनवरच न्यूझीलंडने मार्टिन गप्टील (Martin Guptill) आणि केन विलियमसनच्या (Kane Williamson) विकेट गमावल्या होत्या, पण डॅरेल मिचेल (Darell Mitchell) आणि डेवॉन कॉनवे (Devon Conway) यांनी न्यूझीलंडचा डाव सावरला. या दोघांमध्ये 82 रनची पार्टनरशीप झाली, पण लियाम लिव्हिंगस्टोनच्या बॉलिंगवर बटलरने कॉनवेला 46 रनवर स्टम्पिंग केलं. कॉनवेची विकेट घेतल्यानंतर इंग्लंड सामन्यात पुनरागमन करेल, असं वाटत होतं पण जेम्स नीशमने आक्रमण करायला सुरुवात केली.

शेवटच्या 4 ओव्हरमध्ये न्यूझीलंडला विजयासाठी 57 रनची गरज होती, तेव्हा 17 वी ओव्हर टाकायला क्रिस जॉर्डन (Chris Jordan) बॉलिंगला आला. पहिल्या 2 ओव्हरमध्ये जॉर्डनने फक्त 10 रन दिले होते, पण त्याच्या याच ओव्हरने मॅचचं चित्र पलटलं. जॉर्डनच्या या ओव्हरला तब्बल 23 रन आले. नीशमने (James Neesham) या ओव्हरमध्ये दोन सिक्स आणि एक फोर मारली, सोबतच त्याने एकदा दोन रन आणि अखेरच्या बॉलला एक रन काढली. जॉर्डनने या ओव्हरमध्ये दोन वाईड आणि एका बॉलला दोन लेग बाईजच्या रन दिल्या.

यानंतर लगेचच आदिल रशिदच्या (Adil Rashid) पुढच्या ओव्हरमध्ये दुसऱ्याच बॉलला नीशमने एक सिक्स मारली आणि एक रन काढून मिचेलला स्ट्राईक दिला. पुढच्याच बॉलला मिचेलने सिक्स मारत आपलं अर्धशतक पूर्ण केलं. आदिल रशीदच्या या ओव्हरला 14 रन आल्या. जेम्स नीशम 245.45 च्या स्ट्राईक रेटने 11 बॉलमध्ये 27 रन करून आऊट झाला, त्याच्या या खेळीत 3 सिक्स आणि एका फोरचा समावेश होता. तर डॅरेल मिचेल 47 बॉलमध्ये 72 रनवर नाबाद राहिला. मिचेलने 4 फोर आणि 4 सिक्स लगावले.

2016 वर्ल्ड कपची आठवण

इंग्लंडच्या क्रिस जॉर्डनच्या या बॉलिंगमुळे इंग्लंडला पुन्हा एकदा 2016 टी-20 वर्ल्ड कपच्या आठवणी जाग्या झाल्या. यंदा क्रिस जॉर्डन इंग्लंडसाठी व्हिलन ठरला, तर तेव्हा वेस्ट इंडिजविरुद्धच्या फायनलमध्ये बेन स्टोक्स व्हिलन ठरला होता. 2016 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये अखेरच्या ओव्हरमध्ये वेस्ट इंडिजला विजयासाठी 19 रनची गरज होती, तेव्हा बेन स्टोक्स बॉलिंगला आला. यानंतर स्ट्राईकवर असलेल्या कार्लोस ब्रॅथवेटने स्टोक्सला लागोपाठ 4 बॉल 4 सिक्स मारले आणि वेस्ट इंडिजला दुसऱ्यांदा चॅम्पियन बनवलं.

First published:

Tags: T20 world cup