मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /T20 World Cup : इंग्लंडचा श्रीलंकेवर दणदणीत विजय, मॉर्गनने मोडला धोनीचा विक्रम

T20 World Cup : इंग्लंडचा श्रीलंकेवर दणदणीत विजय, मॉर्गनने मोडला धोनीचा विक्रम

टी-20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) इंग्लंडची धमाकेदार कामगिरी सुरूच आहे. श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात इंग्लंडचा (England vs Sri Lanka) 26 रननी दणदणीत विजय झाला आहे.

टी-20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) इंग्लंडची धमाकेदार कामगिरी सुरूच आहे. श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात इंग्लंडचा (England vs Sri Lanka) 26 रननी दणदणीत विजय झाला आहे.

टी-20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) इंग्लंडची धमाकेदार कामगिरी सुरूच आहे. श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात इंग्लंडचा (England vs Sri Lanka) 26 रननी दणदणीत विजय झाला आहे.

शारजाह, 1 नोव्हेंबर : टी-20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) इंग्लंडची धमाकेदार कामगिरी सुरूच आहे. श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात इंग्लंडचा (England vs Sri Lanka) 26 रननी दणदणीत विजय झाला आहे. इंग्लंडने दिलेल्या 164 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेचा 19 ओव्हरमध्ये 137 रनवर ऑल आऊट झाला. मोईन अली, आदिल रशीद आणि क्रिस जॉर्डन यांना प्रत्येकी 2-2 विकेट मिळाल्या, तर क्रिस वोक्स आणि लियाम लिव्हिंगस्टोन यांना 1-1 विकेट घेण्यात यश आलं. श्रीलंकेकडून वानिंदु हसरंगाने सर्वाधिक 34 रन केले.

या सामन्यात श्रीलंकेने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला. यानंतर इंग्लंडने जॉस बटलरच्या (Jos Buttler) शतकाच्या जोरावर 20 ओव्हरमध्ये 4 विकेट गमावून 163 रनपर्यंत मजल मारली. जॉस बटलरने 67 बॉलमध्ये नाबाद 101 रन केले. बटलरच्या या खेळीमध्ये 6 फोर आणि 6 सिक्सचा समावेश होता. इंग्लंडची अवस्था 35/3 अशी झाली होती, पण बटलरने कर्णधार इयन मॉर्गनच्या मदतीने श्रीलंकेवर आक्रमण सुरूच ठेवलं.

यंदाच्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये बटलर जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. जॉस बटलरने याआधी ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या सामन्यातही 32 बॉलमध्ये नाबाद 71 रन केले होते. कांगारूंविरुद्ध बटलरने 5 फोर आणि 5 सिक्स लगावल्या होत्या. बांगलादेशविरुद्ध बटलरने 18 रन केले, तर वेस्ट इंडिजविरुद्ध तो 24 रनवर नाबाद राहिला.

जॉस बटलरचं टी-20 आंतरराष्ट्रीयमधलं हे पहिलंच शतक आहे. श्रीलंकेकडून वानिंदु हसरंगाने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या, तर दुष्मंता चमिराला एक विकेट घेण्यात यश आलं. स्पिनरना मदत करणाऱ्या शारजाहच्या खेळपट्टीवर श्रीलंकेच्या स्पिनरनी इंग्लंडच्या बॅटिंगला रोखून धरलं, पण बटलरने श्रीलंकेच्या फास्ट बॉलर्सवर हल्ला चढवला. श्रीलंकेच्या फास्ट बॉलर्सनी 12 ओव्हरमध्ये 128 रन देऊन एक विकेट मिळवली, तर स्पिनर्सनी 8 ओव्हरमध्ये फक्त 34 रन देत तीन विकेट पटकावल्या.

मॉर्गनने केला विक्रम

इंग्लंडचा कर्णधार इयन मॉर्गनने (Eoin Morgan) या सामन्यात विक्रमाला गवसणी घातली. मॉर्गन आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये सर्वाधिक विजय मिळवणारा कर्णधार झाला आहे. इयन मॉर्गनने 68 आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यांमध्ये 43 विजय मिळवले. अफगाणिस्तानचा असगर अफगाणने 52 मॅचमध्ये 42 आणि एमएस धोनीने (MS Dhoni) 72 मॅचमध्ये 42 विजय मिळवले. या यादीत पाकिस्तानचा सरफराज अहमद चौथ्या आणि विराट कोहली पाचव्या क्रमांकावर आहे. सरफराज आणि विराट कोहलीने प्रत्येकी 29-29 सामने जिंकले.

इंग्लंड सेमी फायनलमध्ये

श्रीलंकेविरुद्धच्या या विजयासोबतच इंग्लंडचं सेमी फायनलचं तिकीटही निश्चित झालं आहे. सुपर-12 च्या पहिल्या ग्रुपमध्ये असलेल्या इंग्लंडने 4 पैकी 4 सामने जिंकले आहेत. ग्रुप स्टेजमधला इंग्लंडचा आता एकच सामना शिल्लक आहे.

First published:

Tags: England, T20 world cup