मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /T20 World Cup : इंग्लंडने बांगलादेशचा धुव्वा उडवला, रॉयने 14 ओव्हरमध्येच संपवली मॅच

T20 World Cup : इंग्लंडने बांगलादेशचा धुव्वा उडवला, रॉयने 14 ओव्हरमध्येच संपवली मॅच

यंदाच्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये इंग्लंडची धमाकेदार कामगिरी सुरूच आहे. बलाढ्या वेस्ट इंडिजचा 6 विकेटने पराभव केल्यानंतर आता इंग्लंडने बांगलादेशला (England vs Bangladesh) 8 विकेटने धूळ चारली आहे.

यंदाच्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये इंग्लंडची धमाकेदार कामगिरी सुरूच आहे. बलाढ्या वेस्ट इंडिजचा 6 विकेटने पराभव केल्यानंतर आता इंग्लंडने बांगलादेशला (England vs Bangladesh) 8 विकेटने धूळ चारली आहे.

यंदाच्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये इंग्लंडची धमाकेदार कामगिरी सुरूच आहे. बलाढ्या वेस्ट इंडिजचा 6 विकेटने पराभव केल्यानंतर आता इंग्लंडने बांगलादेशला (England vs Bangladesh) 8 विकेटने धूळ चारली आहे.

अबु धाबी, 27 ऑक्टोबर : यंदाच्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये इंग्लंडची धमाकेदार कामगिरी सुरूच आहे. बलाढ्या वेस्ट इंडिजचा 6 विकेटने पराभव केल्यानंतर आता इंग्लंडने बांगलादेशला (England vs Bangladesh) 8 विकेटने धूळ चारली आहे. बांगलादेशने दिलेलं 125 रनचं आव्हान इंग्लंडने फक्त 14.1 ओव्हरमध्येच 2 विकेट गमावून पूर्ण केलं. जेसन रॉयने (Jason Roy) 38 बॉलमध्ये 61 रनची खेळी केली, त्याच्या या खेळीमध्ये 5 फोर आणि 3 सिक्सचा समावेश होता. डेव्हिड मलानने नाबाद 28, जॉस बटलरने 18 आणि जॉनी बेयरस्टोने नाबाद 8 रनची खेळी केली. बांगलादेशकडून शोरीफूल इस्लाम आणि नसूम अहमद याला प्रत्येकी 1-1 विकेट मिळाली.

या मॅचमध्ये बांगलादेशने टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला, पण त्यांनी 20 ओव्हरमध्ये 9 विकेट गमावून फक्त 124 रन केले. इंग्लंडच्या टायमल मिल्सने (Tymal Mills) सर्वाधिक 3 विकेट घेतल्या. लियाम लिव्हिंगस्टोन आणि मोईन अली यांना प्रत्येकी 2-2 विकेट मिळाल्या आणि क्रिस वोक्सला एक विकेट घेण्यात यश आलं.

सलग दोन विजय मिळाल्यामुळे इंग्लंडची टीम पहिल्या ग्रुपच्या पॉईंट्स टेबलमध्ये आता पहिल्या क्रमांकावर पोहोचली आहे. यासह त्यांचा नेट रनरेटही तब्बल +3.614 एवढा झाला आहे. इंग्लंडचे उरलेले सामने आता श्रीलंका, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणार आहेत. टी-20 वर्ल्ड कपच्या सुपर-12 स्टेजमध्ये 6-6 टीमचे दोन ग्रुप करण्यात आले आहेत. दोन्ही ग्रुपमधल्या टॉप-2 टीम सेमी फायनलमध्ये प्रवेश करणार आहेत.

इंग्लंडची टीम (England Squad)

इऑन मॉर्गन (कॅप्टन), मोईन अली. जॉनी बेयरस्टो, सॅम बिलिंग्ज, जॉस बटलर, टॉम करन, ख्रिस जॉर्डन, लियाम लिव्हिंगस्टोन, डेव्हिड मलान, टायमल मिल्स, आदिल रशीद, जेसन रॉय, डेव्हिड विली, क्रिस वोक्स, मार्क वूड

इंग्लंडचं वेळापत्रक (England Schedule)

23 ऑक्टोबर- वेस्ट इंडिजविरुद्ध 6 विकेटने विजय

27 ऑक्टोबर- बांगलादेशविरुद्ध 8 विकेटने विजय

30 ऑक्टोबर- इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया- संध्याकाळी 7.30 वाजता

1 नोव्हेंबर- इंग्लंड विरुद्ध क्वालिफायर श्रीलंका- संध्याकाळी 7.30 वाजता

6 नोव्हेंबर- इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका- संध्याकाळी 7.30 वाजता

First published:

Tags: Bangladesh, England, T20 world cup