मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

T20 World Cup 2021 : चहलला टीम इंडियातून डच्चू, पत्नी धनश्रीचा निशाणा नेमका कोणावर?

T20 World Cup 2021 : चहलला टीम इंडियातून डच्चू, पत्नी धनश्रीचा निशाणा नेमका कोणावर?

टी-20 वर्ल्ड कपसाठीच्या भारतीय टीमची (T20 World Cup Team India) बुधवारी घोषणा करण्यात आली. मागची चार वर्ष टीम इंडियाकडून खेळणाऱ्या युझवेंद्र चहलला (Yuzvendra Chahal) या टीममधून डच्चू देण्यात आला.

  • Published by:  Shreyas

मुंबई, 9 सप्टेंबर : टी-20 वर्ल्ड कपसाठीच्या भारतीय टीमची (T20 World Cup Team India) बुधवारी घोषणा करण्यात आली. मागची चार वर्ष टीम इंडियाकडून खेळणाऱ्या युझवेंद्र चहलला (Yuzvendra Chahal) या टीममधून डच्चू देण्यात आला, तर आर.अश्विनचं (R Ashwin) टीम इंडियात पुनरागमन झालं आहे. 15 सदस्यांच्या या टीममध्ये 5 स्पिनरना स्थान देण्यात आलं आहे, पण यात युझवेंद्र चहलचा समावेश नसल्यामुळे अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. युझवेंद्र चहलने याबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिली नसली तरी त्याची पत्नी धनश्री वर्माने (Dhanashree Verma) आपल्या इन्स्टा स्टोरी लिहीली आहे. यातून तिने चहलची निवड झाली नसल्याबाबत नाराजी अप्रत्यक्षपणे व्यक्त केली आहे.

'आई म्हणते, ही वेळही निघून जाईल. ताठ मानेने जगा, कारण कौशल्य आणि चांगली कर्म नेहमीच साथ देतात. देव कायमच महान असतो,' असं धनश्री तिच्या पोस्टमध्ये म्हणाली आहे.

34 वर्षांच्या आर.अश्विनने आपली अखेरची टी-20 आंतरराष्ट्रीय मॅच जुलै 2017 साली वेस्ट इंडिजविरुद्ध किंग्सटनमध्ये खेळली होती. बऱ्याच काळापासून तो मर्यादित ओव्हरच्या क्रिकेटपासून लांब होता. युझवेंद्र चहलसोबतच शिखर धवन आणि पृथ्वी शॉ यांनाही टीममध्ये स्थान देण्यात आलेलं नाही.

युएईतली खेळपट्टी स्पिन बॉलरना मदत करण्याची शक्यता आहे, त्यामुळे भारतीय टीममध्ये 5 स्पिन बॉलरना संधी देण्यात आली आहे. युझवेंद्र चहलऐवजी राहुल चहरला टीममध्ये निवडण्यात आलं आहे. चहलऐवजी चहरला संधी देण्यात आली कारण आम्हाला लेग स्पिन जलद टाकणारा बॉलर हवा होता, असं निवड समिती अध्यक्ष चेतन शर्मा यांनी सांगितलं.

भारतीय टीम

विराट कोहली, रोहित शर्मा, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, इशान किशन, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, राहुल चहर, आर. अश्विन, अक्षर पटेल, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी

राखीव खेळाडू : श्रेयस अय्यर, शार्दुल ठाकूर, दीपक चहर

First published:

Tags: T20 world cup, Team india, Yuzvendra Chahal