मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /T20 World Cup : 'हमारा गुजरात...' जडेजाचं नाव घेऊन पाकिस्तानी क्रिकेटपटूचा गुजरातवर 'दावा'

T20 World Cup : 'हमारा गुजरात...' जडेजाचं नाव घेऊन पाकिस्तानी क्रिकेटपटूचा गुजरातवर 'दावा'

टी-20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) शुक्रवारी भारताने स्कॉटलंडला (India vs Scotland) दारूण पराभव केला. सेमी फायनलची आशा कायम ठेवण्यासाठी टीम इंडियाला हा सामना मोठ्या फरकाने जिंकणं गरजेचं होतं.

टी-20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) शुक्रवारी भारताने स्कॉटलंडला (India vs Scotland) दारूण पराभव केला. सेमी फायनलची आशा कायम ठेवण्यासाठी टीम इंडियाला हा सामना मोठ्या फरकाने जिंकणं गरजेचं होतं.

टी-20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) शुक्रवारी भारताने स्कॉटलंडला (India vs Scotland) दारूण पराभव केला. सेमी फायनलची आशा कायम ठेवण्यासाठी टीम इंडियाला हा सामना मोठ्या फरकाने जिंकणं गरजेचं होतं.

मुंबई, 6 नोव्हेंबर : टी-20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) शुक्रवारी भारताने स्कॉटलंडला (India vs Scotland) दारूण पराभव केला. सेमी फायनलची आशा कायम ठेवण्यासाठी टीम इंडियाला हा सामना मोठ्या फरकाने जिंकणं गरजेचं होतं. 39 बॉलमध्येच आव्हानाचा पाठलाग केल्यामुळे भारताचा नेट रनरेटही सुधारला आहे. पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू दानिश कनेरियालाही (Danish Kaneria) भारताच्या या विजयानंतर आनंद झाला आहे. रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) आणि जसप्रीत बुमराहचं (Jasprit Bumrah) नाव घेऊन कनेरियाने 'हमारा गुजरात का शेर छा गया,' असं वक्तव्य केलं.

दानिश कनेरिया जडेजाला आमच्या गुजरातचा (Gujrat) शेर असं का म्हणाला? याबाबत तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल. कनेरिया पाकिस्तानकडून खेळणारा दुसरा हिंदू क्रिकेटपटू आहे. याआधी विकेट कीपर बॅटर अनिल दलपत (Anil Daplat) पाकिस्तानकडून खेळलेले पहिले हिंदू क्रिकेटपटू होते. कनेरिया अनिल दलपत यांचा चुलत भाऊ आहे. कनेरियाचे पूर्वज गुजरातच्या सूरतचे रहिवासी होते. फाळणीआधी कनेरियाचं कुटुंब कराचीमध्ये स्थायिक झालं. कनेरियाचा जन्मही कराचीमध्येच झाला, पण गुजरातबद्दल त्याला खास लगाव आहे. दानिश कनेरिया गुजरातीही बोलतो.

'भारताच्या सामन्यानंतर आता माझं लक्ष अफगाणिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यातल्या सामन्यावर आहे. अफगाणिस्तानचे स्पिनर न्यूझीलंडला त्रास देऊ शकतात आणि टीम इंडिया सेमी फायनलमध्ये प्रवेश मिळवू शकते,' असा विश्वास दानिश कनेरियाला आहे. न्यूझीलंडच्या खात्यात सध्या 6 पॉईंट्स आहेत. जर न्यूझीलंडने अफगाणिस्तानचा पराभव केला आणि भारताने नामिबियाला हरवलं तर विराटची टीम सेमी फायनलमध्ये प्रवेश करेल.

जडेजाचा धमाका

मोहम्मद शमी (Mohammad Shami) आणि रवींद्र जडेजा यांच्या उत्कृष्ट बॉलिंगमुळे भारताने स्कॉटलंडचा 17.4 ओव्हरमध्ये 85 रनवर ऑल आऊट केला. शमी आणि जडेजाने 15-15 रन देऊन प्रत्येकी 3-3 विकेट घेतल्या, तर जसप्रीत बुमराहला दोन विकेट मिळाल्या.

स्कॉटलंडविरुद्धच्या विजयानंतर आपण आनंदी असल्याची प्रतिक्रिया टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने दिली. पाकिस्तान आणि न्यूझीलंडविरुद्ध आम्हाला चांगल्या ओव्हर मिळाल्या नाहीत, याबाबत विराटने खेद व्यक्त केला. स्कॉटलंडआधी भारताने अफगाणिस्तानचा 66 रनने पराभव केला होता. पाकिस्तान आणि न्यूझीलंडविरुद्ध पराभव झाल्यामुळे भारताच्या अपेक्षा आता अफगाणिस्तानवर अवलंबून आहेत.

First published:

Tags: Jasprit bumrah, Ravindra jadeja, T20 world cup, Team india