• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • T20 World Cup : करियर संपलं, 3 टी-20 शतकं ठोकणारा किवी क्रिकेटपटू झाला इमोशनल

T20 World Cup : करियर संपलं, 3 टी-20 शतकं ठोकणारा किवी क्रिकेटपटू झाला इमोशनल

कॉलिन मुन्रोची न्यूझीलंड टीममधून वगळलं

कॉलिन मुन्रोची न्यूझीलंड टीममधून वगळलं

न्यूझीलंडने टी-20 वर्ल्ड कपसाठी (New Zealand Squad for T20 World Cup) टीमची घोषणा केली आहे. न्यूझीलंडने केलेल्या या टीम निवडीवर अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे, कारण न्यूझीलंडने टीममध्ये 4 मोठ्या मॅच विनरना जागा दिली नाही. यामध्ये आक्रमक ओपनर कॉलिन मुन्रोचाही (Colin Munro) समावेश आहे.

 • Share this:
  मुंबई, 10 ऑगस्ट : न्यूझीलंडने टी-20 वर्ल्ड कपसाठी (New Zealand Squad for T20 World Cup)  टीमची घोषणा केली आहे. न्यूझीलंडने केलेल्या या टीम निवडीवर अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे, कारण न्यूझीलंडने टीममध्ये 4 मोठ्या मॅच विनरना जागा दिली नाही. यामध्ये आक्रमक ओपनर कॉलिन मुन्रोचाही (Colin Munro) समावेश आहे. टीममध्ये स्थान न मिळाल्यामुळे मुन्रोने नाराजी व्यक्त केली आहे. माझं आंतरराष्ट्रीय कारकिर्द आता संपली आहे, अशी भावुक प्रतिक्रिया मुन्रोने दिली आहे. कॉलिन मुन्रोने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर हा इमोशनल मेसेज लिहिला आहे. 'टी-20 वर्ल्ड कपच्या टीममध्ये स्थान न मिळाल्यामुळे दु:खी आहे. वर्ल्ड कप खेळणं माझं लक्ष्य होतं. न्यूझीलंडसाठी मी अखेरची मॅच खेळलो, असं वाटत आहे,' असं मुन्रो त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर म्हणाला. कॉलिन मुन्रो रोहित शर्मानंतर टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकं करणारा खेळाडू आहे. मुन्रोच्या नावावर आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये 3 शतकं आहेत. ओपनर असलेल्या मुन्रोने न्यूझीलंडला अनेक मॅच जिंकवल्या, पण त्याची टी-20 वर्ल्ड कपसाठीच्या टीममध्ये निवड झाली नाही. मुन्रोने न्यूझीलंडसाठी 65 टी-20 मॅचमध्ये 31.35 च्या सरासरीने 1,724 रन केले. मुन्रोच्या नावावर 3 शतकं आणि 11 अर्धशतकं आहेत. त्याचा स्ट्राईक रेटही तब्बल 156 पेक्षा जास्त आहे. मुन्रोशिवाय रॉस टेलर, कॉलिन डिग्रॅण्डहोम आणि फिन एलन यांनाही टी-20 वर्ल्ड कपमध्ये संधी देण्यात आलेली नाही. टी-20 वर्ल्ड कपसाठी न्यूझीलंडची टीम केन विलियमसन, टॉड एस्टल, ट्रेन्ट बोल्ट, मार्क कॅम्पमन, डेवॉन कॉनवे, लॉकी फर्ग्युसन, मार्टीन गप्टील, काईल जेमिसन, डॅरेल मिचल, जिम्मी नीशम, ग्लेन फिलिप्स, मिचेल सॅन्टनर, टीम सायफर्ट, इश सोदी, टीम साऊदी, एडम मिल्ने
  Published by:Shreyas
  First published: