मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

T20 World Cup : धोनीवर हसणाऱ्या मुशफिकुर रहीमला 5 वर्षांनी मिळालं तसंच प्रत्युत्तर

T20 World Cup : धोनीवर हसणाऱ्या मुशफिकुर रहीमला 5 वर्षांनी मिळालं तसंच प्रत्युत्तर

टी-20 वर्ल्ड कप 2021 ला (T20 World Cup) रविवारपासून ओमान आणि युएईमध्ये सुरुवात झाली आहे. बांगलादेशचा पहिल्याच सामन्यात स्कॉटलंडने (Bangladesh vs Scotland) पराभव केला.

  • Published by:  Shreyas

मुंबई, 18 ऑक्टोबर : टी-20 वर्ल्ड कप 2021 ला (T20 World Cup) रविवारपासून ओमान आणि युएईमध्ये सुरुवात झाली आहे. बांगलादेशचा पहिल्याच सामन्यात स्कॉटलंडने (Bangladesh vs Scotland) पराभव केला. पहिले बॅटिंग करत स्कॉटलंडने बांगलादेशला विजयासाठी 141 रनचं आव्हान दिलं, पण लिटन दास, सौम्य सरकार, शाकिब अल हसन, मुशफिकुर रहीम यांच्यासारखे खेळाडू असूनही बांगलादेशचा 6 रनने पराभव झाला. या पराभवानंतर सोशल मीडियावर बांगलादेशच्या टीमवर निशाणा साधण्यात आला.

Amazon Driver ते World Cup Star: स्कॉटलंडच्या ऑल राऊंडरचा आहे थक्क करणारा प्रवास

चाहत्यांनी मुशफिकुर रहीमला (Mushfiqur Rahim) भारत आणि वेस्ट इंडिज (India vs West Indies) यांच्यात 2016 साली झालेल्या टी-20 वर्ल्ड कप सेमी फायनलची (T20 World Cup Semi Final) आठवण करून दिली. 2016 टी-20 वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये वेस्ट इंडिजने टीम इंडियाचा पराभव केला होता. या मॅचनंतर रहीमने एक फोटो शेयर केला होता. 'भारताचा सेमी फायनलमध्ये पराभव झाला, ही आनंदाची गोष्ट आहे. आता मला चांगली झोप लागेल,' असं ट्वीट मुशफिकुरने केलं होतं.

बांगलादेशचा स्कॉटलंडविरुद्ध पराभव झाल्यानंतर चाहत्यांनी मुशफिकुरच्या जुन्या ट्वीटचे स्क्रीनशॉट सोशल मीडियावर शेयर केले आणि त्याला त्याच भाषेत प्रत्युत्तर दिलं. बांगलादेश सुरुवातीच्या राऊंडमध्येच स्कॉटलंडकडून हरली, अशा प्रतिक्रिया चाहत्यांनी दिल्या.

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात मार्च 2016 साली झालेल्या टी-20 वर्ल्ड कप सेमी फायनलमध्ये एमएस धोनीच्या (MS Dhoni) नेतृत्वातल्या टीम इंडियाचा 7 विकेटने पराभव झाला होता. या पराभवानंतर धोनीच्या चेहऱ्यावर दु:ख दिसत होतं. मुशफिकुर रहीमने हाच फोटो ट्वीट करत आनंद व्यक्त केला होता.

T20 World Cup मध्ये पहिल्याच दिवशी मोठा Upset, ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंडला हरवणाऱ्या बांगलादेशला धक्का

First published:

Tags: Bangladesh cricket team, MS Dhoni, T20 world cup