Home /News /sport /

T20 World Cup : भारताविरुद्ध विजय मिळवून देताना बाबरची आई व्हॅन्टिलेटरवर, वडिलांनी सांगितला हृदयद्रावक प्रसंग

T20 World Cup : भारताविरुद्ध विजय मिळवून देताना बाबरची आई व्हॅन्टिलेटरवर, वडिलांनी सांगितला हृदयद्रावक प्रसंग

बाबर आझमच्या (Babar Azam) नेतृत्वात पाकिस्तानची टीम यंदाच्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) धमाकेदार कामगिरी करत आहे.

  दुबई, 30 ऑक्टोबर : बाबर आझमच्या (Babar Azam) नेतृत्वात पाकिस्तानची टीम यंदाच्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) धमाकेदार कामगिरी करत आहे. सुरुवातीच्या तिन्ही सामन्यांमध्ये विजय मिळवत पाकिस्तानच्या टीमचा सेमी फायनलचा प्रवेश निश्चित झाला आहे. भारताविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात (India vs Pakistan) बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान यांनी नाबाद अर्धशतकं करत पाकिस्तानला 10 विकेटने जिंकवलं. वर्ल्ड कप इतिहासातला पाकिस्तानचा भारताविरुद्धचा हा पहिलाच विजय होता. बाबर आझम जेव्हा भारताविरुद्धच्या सामन्यात पाकिस्तानला जिंकवत होता तेव्हा त्याची आई व्हॅन्टिलेटरवर होती. बाबर आझमचे वडील आझम सिद्दीकी यांनी सोशल मीडियावर हा हृदयद्रावक प्रसंग सांगितला. 'काही गोष्टींबाबत आता माझ्या देशवासियांना सांगण्याची गरज आहे. तीन विजयांबाबत तुमचं सगळ्याचं अभिनंदन. आमच्या कुटुंबासाठी ही मोठी परीक्षा होती. ज्या दिवशी भारताविरुद्ध मॅच होती तेव्हा बाबरची आई व्हॅन्टिलेटरवर होती. बाबर कमकुवत नाही व्हायला पाहिजे होता, आता सगळं ठीक आहे. तिन्ही मॅचवेळी तो चिंतेत होता,' असं बाबरचे वडील म्हणाले.
  बाबर आझमने आतापर्यंत खेळलेल्या 3 मॅचपैकी 2 मॅचमध्ये अर्धशतकं केली आहेत. भारताविरुद्ध बाबरने नाबाद 68 रनची खेळी केली, तर न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या मॅचमध्ये तो फक्त 9 रन करून आऊट झाला. अफगाणिस्तानविरुद्धच्या मॅचमध्ये बाबरने 51 रन केले. पाकिस्तानने याआधी 2009 साली टी-20 वर्ल्ड कप जिंकला होता. पाकिस्तानचे उरलेले सामने आता स्कॉटलंड आणि नामिबिया या कमजोर टीमविरुद्ध आहेत. या दोन्ही सामन्यांमध्ये पाकिस्तानचा विजय झाला तर ते दुसऱ्या ग्रुपमध्ये पहिल्या क्रमांकावर राहतील. T20 World Cup Final मध्ये पोहोचणार या दोन टीम? बेन स्टोक्सची भविष्यवाणी
  Published by:Shreyas
  First published:

  Tags: Babar azam, India vs Pakistan, T20 world cup

  पुढील बातम्या