मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

T20 World Cup : Semi Final नाही गल्ली क्रिकेट! हफीजची दोन टप्पे बॉलिंग, वॉर्नरचा खणखणीत सिक्स, VIDEO

T20 World Cup : Semi Final नाही गल्ली क्रिकेट! हफीजची दोन टप्पे बॉलिंग, वॉर्नरचा खणखणीत सिक्स, VIDEO

टी-20 वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये (T20 World Cup Semi Final) पाकिस्तानने ऑस्ट्रेलियाला (Australia vs Pakistan) 177 रनचं मोठं आव्हान दिलं. या सामन्यात डेव्हिड वॉर्नरने (David Warner Six) मोहम्मद हफीजला (Mohammad Hafeez) मारलेल्या सिक्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  Shreyas
दुबई, 11 नोव्हेंबर : टी-20 वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये (T20 World Cup Semi Final) पाकिस्तानने ऑस्ट्रेलियाला (Australia vs Pakistan) 177 रनचं मोठं आव्हान दिलं. या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची सुरूवात अत्यंत खराब झाली. कर्णधार एरॉन फिंच पहिल्याच बॉलला शाहिन आफ्रिदीच्या बॉलिंगवर आऊट झाला, पण डेव्हिड वॉर्नरने (David Warner) मिचेल मार्शच्या सोबतीने किल्ला लढवला. या सामन्यात वॉर्नरने मारलेल्या सिक्सची जोरदार चर्चा सुरू आहे. वॉर्नरने मारलेल्या या खणखणीत सिक्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने आठवी ओव्हर ऑफ स्पिनर मोहम्मद हफीजला (Mohammad Hafeez) दिली, पण पहिलाच बॉल हफीजने दोन टप्पे टाकला. या बॉल बॅटपर्यंत येईपर्यंत वॉर्नर थांबला आणि त्याने जोरदार सिक्स मारली. हफीजच्या या ओव्हरमध्ये ऑस्ट्रेलियाने 13 रन काढले. 30 बॉलमध्ये 49 रन करून वॉर्नर आऊट झाला. त्याच्या या खेळीमध्ये 3 फोर आणि 3 सिक्सचा समावेश होता. शादाब खानच्या बॉलिंगवर वॉर्नर कट मारायला गेला, पण विकेट कीपर मोहम्मद रिझवानने कॅच पकडत त्याला पॅव्हेलियनमध्ये पाठवलं. फखर झमानने (Fakhar Zaman) केलेल्या फटकेबाजीमुळे पाकिस्तानने टी-20 वर्ल्ड कपच्या (T20 World Cup Semi Final सेमी फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाला (Australia vs Pakistan) 177 रनचं आव्हन दिलं आहे. फखर झमानने 32 बॉलमध्ये नाबाद 55 रन केले, यामध्ये 3 फोर आणि 4 सिक्सचा समावेश होता. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार एरॉन फिंच याने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला, यानंतर बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान यांनी पाकिस्तानला चांगली सुरुवात करून दिली. या दोघांनी 10 ओव्हरमध्ये 71 रनची पार्टनरशीप केली. बाबर आझम 39 रन तर मोहम्मद रिझवान 67 रन करून आऊट झाले. ऑस्ट्रेलियाकडून मिचेल स्टार्कने 2 विकेट घेतल्या, तर पॅट कमिन्स आणि एडम झम्पाला प्रत्येकी 1-1 विकेट मिळाली.
First published:

Tags: T20 world cup

पुढील बातम्या