टी-20 वर्ड कपसाठी टीम इंडियाचे 10 खेळाडू निश्चित! फक्त एका खेळाडूची जागा बाकी

टी-20 वर्ड कपसाठी टीम इंडियाचे 10 खेळाडू निश्चित! फक्त एका खेळाडूची जागा बाकी

असा असेल भारताला टी-20 वर्ल्ड कप संघ. एका जागेसाठी 4 दावेदार.

  • Share this:

हैदराबाद, 07 डिसेंबर : पुढच्या वर्षी ऑस्ट्रेलियात टी-20 वर्ल्ड कप होणार आहे. या वर्ल्ड कपसाठी भारतीय संघ सध्या संघ बांधणीवरती भर देत आहे. बांगलादेश आणि आता वेस्ट इंडिजविरुद्ध टी-20 मालिकेत चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना वर्ल्ड कपमध्ये संधी मिळू शकेल. मात्र विराटनं वर्ल्ड कपसाठी 10 खेळाडू निश्चित झाल्याचे संकेत देत, फक्त एक जागा शिल्लक असल्याचे सांगितले.

वेस्ट इंडिज विरोधात सध्या होत असलेल्या टी-20 मालिकेत भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, दीपक चाहर यांनी संघात जागा मिळाली आहे. जसप्रीम बुमराह सध्या दुखापत ग्रस्त असल्यामुळं त्याला विश्रांती देण्यात आली आहे. मात्र टी-20 वर्ल्ड कपपर्यंत बुमराह फिट होऊन कमबॅक करू शकतो. त्यामुळं वर्ल्ड कपमध्ये वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार आणि मोहम्मद शमी यांची जागा निश्चित झाली आहे. त्यामुळं आता संघ फक्त एका खेळाडूची जागा बाकी आहे. याचे संकेत कर्णधार विराट कोहलीनं पत्रकारांशी बोलताना दिले होते.

वाचा-VIDEO : ‘…आणि टीम इंडियानं जिंकला सामना’, राहुलनं सांगितला विराटचा मास्टरप्लॅन

'वेगवान गोलंदाजीत अनेक पर्याय असणे चांगले'

वेगवान गोलंदाजी विभागात अनेक पर्यायांच्या उपस्थितीवर कोहली म्हणाला की, कर्णधार म्हणून त्याच्यासाठी ते चांगले आहे. कोहली म्हणाला, "असे नाही की ही आमच्यासाठी समस्या आहे. मला वाटते भुवी (भुवनेश्वर) आणि (जसप्रीत) बुमराह हे अनुभवी खेळाडू आहेत. टी -20 क्रिकेटमध्ये त्याच्या कामगिरीमध्ये बरीच सुसंगतता आहे. दीपक (चाहर) देखील चांगली गोलंदाजी करत आहे.

वाचा-गोलंदाजांची विश्वविक्रमी धुलाई! 40 षटकांत एकट्याने 585 धावा काढून रचला इतिहास

‘शमीचा फॉर्म ऑस्ट्रेलियामध्ये फायद्याचा'

विराटनं यावेळी टी-20मध्ये पुनरागमन करत असलेल्या मोहम्मद शमीच्या फॉर्मबाबतही सांगितले. विराटनं, 'मोहम्मद शमी पुनरागमन करीत आहे आणि तो चांगली गोलंदाजी करीत आहे. जर तो लयीत आला आणि टी -20 क्रिकेटसाठी आवश्यक असलेल्या गोष्टींवर काम करत असेल तर ऑस्ट्रेलियासारख्या ठिकाणी, तो खूप उपयुक्त ठरेल, विशेषत: नवीन बॉलसह विकेट मिळविण्याच्या क्षमतेमुळे. त्याच्याकडे यॉर्कर टाकण्यासाठी पुरेसा वेग आहे', असे सांगितले.

वाचा-विराटने त्याची डायरी भरमैदानात फाडली अन् तो बघतच राहिला, VIDEO VIRAL

शमी-भुवीच्या आगमनाने भारतीय गोलंदाजीची ताकद वाढविली

टी -२० स्वरूपात भुवनेश्वर कुमार आणि मोहम्मद शमीच्या पुनरागमनानंतर भारतीय वेगवान गोलंदाजीचा हल्ला खूपच मजबूत दिसत आहे. शमीने 2017मध्ये शेवटचा टी -२० आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता, तर भुवनेश्वर फिट झाल्यामुळे पुनरागमन करीत आहेत. भुवनेश्वरने यावर्षी ऑगस्टमध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध अखेरचा टी -२० आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. फलंदाजीबाबत बोलायचे झाल्यास संघात विशेष काही बदल होतील असे वाटत नाही.

Published by: Priyanka Gawde
First published: December 7, 2019, 2:56 PM IST
Tags:

ताज्या बातम्या