Home /News /sport /

T20 World Cup : 13 रन करणारा खेळणार वर्ल्ड कप, पाकिस्तानला 40 वर्षांच्या खेळाडूवर विश्वास

T20 World Cup : 13 रन करणारा खेळणार वर्ल्ड कप, पाकिस्तानला 40 वर्षांच्या खेळाडूवर विश्वास

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (Pakistan Cricket) टी-20 वर्ल्ड कपसाठी (T20 World Cup) 15 सदस्यांच्या टीमची घोषणा केली आहे, पण या टीमच्या निवडीवरच आता टीका होऊ लागली आहे.

    कराची, 7 सप्टेंबर : पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (Pakistan Cricket) टी-20 वर्ल्ड कपसाठी (T20 World Cup) 15 सदस्यांच्या टीमची घोषणा केली आहे, पण या टीमच्या निवडीवरच आता टीका होऊ लागली आहे. टीम निवड झाल्यानंतर काही तासांमध्येच मुख्य प्रशिक्षक मिसबाह उल हक (Misbah Ul Haq) आणि बॉलिंग प्रशिक्षक वकार युनूस (Waqar Younis) यांनी तडकाफडकी राजीनामा दिला. वर्ल्ड कपसाठी पाकिस्तानी टीममध्ये शोएब मलिक (Shoaib Malik) आणि माजी कर्णधार सरफराज अहमद (Sarfaraz Ahmed) यांना टीममध्ये स्थान देण्यात आलेलं नाही, पण मागच्या दोन वर्षात फक्त 13 रन करणारा आसिफ अली (Asif Ali) आणि 40 वर्षांच्या मोहम्मद हफीजला (Mohammad Hafeez) टीममध्ये निवडण्यात आलं आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्ड कायमच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे वादात अडकलेलं असतं. पाकिस्तानच्या माध्यमांमधल्या वृत्तानुसार मिसबाह उल हकने राजीनामा दिला, कारण त्याच्या माहितीशिवायच निवड समिती प्रमुख मोहम्मद वसीम यांनी टी-20 वर्ल्ड कपसाठीची टीम निवडली. 1 जानेवारी 2020 पासून आसिफ अली पाकिस्तानकडून 4 टी-20 मॅच खेळला, यात त्याने 13 रन केले. या कालावधीमध्ये त्याचा सर्वोत्तम स्कोअर 7 रन एवढा होता. टी-20 आंतरराष्ट्रीय करियरमध्ये आसिफ अलीने 29 मॅचमध्ये एकही अर्धशतक केलेलं नाही. 16 च्या सरासरीने त्याला 344 रन करता आल्या, यात त्याचा स्ट्राईक रेटही 124 एवढाच आहे, त्यामुळे आसिफ अलीच्या निवडीवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. शोएब मलिकला डावललं पाकिस्तानचा ऑलराऊंडर असलेल्या 39 वर्षांच्या शोएब मलिकला (Shoaib Malik) टीममधून डावलण्यात आलं आहे. कर्णधार बाबर आझमला (Babar Azam) मलिक टीममध्ये हवा होता, पण निवड समितीने मलिकचं वय जास्त असल्याचं सांगितलं. निवड समितीने मात्र 40 वर्ष आणि 325 दिवसांच्या मोहम्मद हफीजला संधी दिली आहे. मागच्या दोन वर्षात हफीजने टी-20 आंतरराष्ट्रीयमध्ये चांगली कामगिरी केली. 24 मॅचमध्ये 37 च्या सरासरीने त्याने 521 रन केले, यात 4 अर्धशतकांचा समावेश आहे. तर शोएब मलिकला फक्त 2 इनिंगमध्ये बॅटिंगची संधी मिळाली. यात त्याने एका अर्धशतकाच्या मदतीने 72 च्या सरासरीने 72 रन केले. हफीजने या कालावधीमध्ये 6 विकेटही मिळवल्या. खुशदीलचा स्ट्राईक रेटही कमी वर्ल्ड कपच्या टीममध्ये पाकिस्तानने 26 वर्षांच्या खुशदिल शाहलाही (Khushdil Shah) निवडलं आहे. खुशदीलने 9 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांनमध्ये 130 रन केले, त्याचा स्ट्राईक रेटही फक्त 109 चा आहे. डावखुरी स्पिन बॉलिंग करणाऱ्या खुशदीलला एकही विकेट घेता आली नाही. टी-20 वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानचा पहिला सामना 24 ऑक्टोबरला भारताविरुद्ध होणार आहे. पाकिस्तानची टीम बाबर आझम (कर्णधार), मोहम्‍मद रिझवान, आसिफ अली, खुशदील शाह, मोहम्‍मद हफीज, शोएब मकसूद, आझम खान, इमाद वसीम, मोहम्‍मद नवाझ, मोहम्‍मद वसीम, शाहदाब खान, हसन अली, हारिस राऊफ, मोहम्‍मद हसनैन, शाहीन आफ्रिदी राखीव खेळाडू : फखर जमान, उस्‍मान कादीर, शाहनवाज दानी
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Pakistan, T20 world cup

    पुढील बातम्या