मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

T20 World Cup आधी इंग्लंडला मोठा झटका, स्टोक्स-आर्चरनंतर आणखी एक स्टार खेळाडू आऊट

T20 World Cup आधी इंग्लंडला मोठा झटका, स्टोक्स-आर्चरनंतर आणखी एक स्टार खेळाडू आऊट

इंग्लंडच्या टीमला टी-20 वर्ल्ड कपआधी (T20 World Cup) मोठा धक्का लागला आहे. ऑलराऊंडर सॅम करन (Sam Curran) पाठीच्या दुखापतीमुळे वर्ल्ड कपमधून बाहेर झाला आहे.

  • Published by:  Shreyas

दुबई, 5 ऑक्टोबर : इंग्लंडच्या टीमला टी-20 वर्ल्ड कपआधी (T20 World Cup) मोठा धक्का लागला आहे. ऑलराऊंडर सॅम करन (Sam Curran) पाठीच्या दुखापतीमुळे वर्ल्ड कपमधून बाहेर झाला आहे. करन आयपीएल 2021 मध्ये (IPL 2021) चेन्नई सुपर किंग्सकडून (CSK) खेळतो. शनिवारी राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या मॅचदरम्यान करनने पाठीच्या दुखण्याबाबतची तक्रार केली होती.

इंग्लंड क्रिकेट टीमसाठी हा मोठा धक्का आहे, कारण आधीच ऑल राऊंडर बेन स्टोक्स (Ben Stokes) आणि फास्ट बॉलर जोफ्रा आर्चर (Jofra Archer) आधीच टी-20 वर्ल्ड मधून बाहेर आहेत. पाठीच्या दुखापतीची तक्रार केल्यानंतर करनचं स्कॅनिंग करण्यात आलं, यात त्याला दुखापत झाल्याचं स्पष्ट झालं. ईसीबीची मेडिकल टीम आता त्याच्यावर उपचार करणार आहे. दुखापतीमुळे करन आयपीएल अर्धवट सोडून इंग्लंडला रवाना झाला आहे. सॅम करनऐवजी त्याचा भाऊ टॉम करनला (Tom Curran) इंग्लंडच्या टीममध्ये स्थान देण्यात आलं आहे.

17 ऑक्टोबरपासून ओमान आणि युएईमध्ये टी-20 वर्ल्ड कपला सुरुवात होणार आहे. 2010 साली इंग्लंडने टी-20 वर्ल्ड कप जिंकला होता.

इंग्लंडची टीम

इयन मॉर्गन, मोईन अली, जॉनी बेयरस्टो, सॅम बिलिंग्स, जॉस बटलर, टॉम करन, क्रिस जॉर्डन, लियाम लिव्हिंगस्टोन, डेव्हिड मलान, टायमल मिल्स, आदिल रशीद, जेसन रॉय, डेव्हिड विली, क्रिस वोक्स, मार्क वूड

राखीव खेळाडू

लियाम डॉसन, जेम्स विन्स

First published:

Tags: England, T20 world cup