• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • AFG vs NZ सामन्यापूर्वी, बिग बींच्या 'त्या' ट्विटने वेधले सर्वांचे लक्ष

AFG vs NZ सामन्यापूर्वी, बिग बींच्या 'त्या' ट्विटने वेधले सर्वांचे लक्ष

Amitabh Bachchan

Amitabh Bachchan

टी-२० वर्ल्डकपमध्ये (T20 Worldcup) सध्या भारताच्या आशा या अफगाणिस्तान आणि न्यूझीलंड (AFG vs NZ) यांच्यात होणाऱ्या सामन्यावर अवलंबून आहेत.

 • Share this:
  नवी दिल्ली, 7 नोव्हेंबर: रविवारी होणारा अफगाणिस्तान विरुद्ध न्यूझीलंड (AFG vs NZ) हा सामना टीम इंडियाच्या भवित्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. या सामन्यात, अफगाणिस्तानने न्यूझीलंडचा पराभव करणे गरजेजे आहे. कारण, टीम इंडियाच सेमीफायनलचे (India in semifinal) तिकीट अफगाणिस्तानच्या हातात आहे. दरम्यान, बॉलिवूड अभिनेते आणि ‘महानायक’ अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी ट्वीट करत सर्वांचे लक्ष वेधले आहे. त्यांनी ट्विट करत टीम इंडियाला पाठिंबा दिला आहे. तसेच भारतीयांना खास संदेशदेखील दिला आहे. स्कॉटलंडविरुद्धच्या सामन्यात टीम इंडियानं मोठा विजय मिळवला. मात्र, सेमीफायनलमध्ये पोहचण्याचे टीम इंडियाचे तिकीट अफगाणिस्तानच्या हातात आहे. अफगाणिस्तान विरुद्ध न्यूझीलंड (AFG vs NZ) हा सामना रविवारी होणार असून अफगाणिस्तानच्या विजयात भारताचा विजय आणि पराभवात भारताचा पराभव अशी स्थिती सध्या निर्माण झाली आहे. यासर्वांवर भाष्य करत अमिताभ बच्चन यांना आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. “टी 4088- उद्या वर्ल्ड कपमध्ये होणाऱ्या न्यूझीलंड वि. अफगाणिस्तान सामन्याच्या निकालाची पर्वा न करता.. हे आठवणीत ठेवा की, आपण (भारतीय संघ) टी20 वर्ल्ड कपच्या इतिहासातील सर्वात मोठी धावसंख्या केली आहे; केएल राहुलने स्पर्धेतील सर्वात वेगवान अर्धशतक झळकावले आहे; आणि आपण विरोधी संघाला विक्रमी 6.3 षटकांमध्ये पराभूत केले आहे,” असे अमिताभ यांनी ट्वीटमध्ये लिहिले आहे. थोडक्यात अमिताभ यांनी भारतवासींना भारतीय संघातील खेळाडूंच्या टी20 वर्ल्ड कपमधील प्रदर्शनाचा विसर न पडू देता त्यांच्या प्रयत्नांचे कौतुक करण्याचा उपदेश दिला आहे. कारण यापूर्वी पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारताचा पराभव झाल्यानंतर कर्णधार विराट कोहलीसहित संपूर्ण संघावर मोठ्या प्रमाणात टीका झाली होती. त्यातही मोहम्मद शमीला तर अनेकांनी धर्मावरुन टीका केली होती. स्कॉटलंडला मात दिल्यानंतर भारत 2 विजयांसह 4 गुण घेऊन तिसऱ्या स्थानावर गेला आहे. नेट-रनरेटच्या जोरावर भारताने अफगाणिस्तानला मागे टाकलं आहे. तसं पाहायाला गेलं तर भारताचा रनरेट पाकिस्तान आणि न्यूझीलंडपेक्षाही अधिक आहे. पण पाकिस्तान 4 पैकी 4 सामने जिंकत याआधीच पुढील फेरीत पोहोचला आहे. न्यूझीलंडनेही 3 सामने जिंकल्याने तो भारताच्या पुढे आहे. त्यामुळे न्यूझीलंडचा संघ जर त्यांचा सुपर 12 मधील शेवटचा सामना अफगाणिस्ताविरुद्ध पराभूत झाला तर तो केवळ 3 विजयासंह गुणतालिकेत राहिल. ज्यानंतर भारतही नामिबीयाला नमवून न्यूझीलंड इतकेच विजय मिळवून गुणतालिकेत असेल. अशावेळी अफगाणिस्तान, भारत आणि न्यूझीलंड तिन्ही संघ तीन विजयांसह गुणतालिकेत असल्यास उत्तर रनरेटच्या जोरावर टीम इंडिया पुढील फेरीत जाईल. पण या सर्वासाठी मूळात अफगाणिस्तानने न्यूझीलंडला मात देणे गरजेचे आहे.
  Published by:Dhanshri Otari
  First published: