Home /News /sport /

ICC T20 World Cup 2021 Schedule: पाहा सर्व सामन्यांच्या तारखा, कोण कधी भिडणार

ICC T20 World Cup 2021 Schedule: पाहा सर्व सामन्यांच्या तारखा, कोण कधी भिडणार

आयसीसीने 17 ऑक्टोबर 2021 पासून टी 20 विश्वचषक 2021 चे आयोजन केले आहे. अंतिम सामना 14 नोव्हेंबर 2021 रोजी UAE मध्ये होईल. Coronavirus च्या पार्श्वभूमीवर या वर्षी तरी टी-20 स्पर्धा व्यवस्थित पार पडतील, अशी अपेक्षा आहे.

  नवी दिल्ली, 16 सप्टेंबर : 2021 ची पुरुष क्रिकेट T-20 विश्वचषक (T20 World Cup) संयुक्त अरब अमिराती आणि ओमान येथे खेळवण्यात येणार आहे. भारतात होणारी ही स्पर्धा कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेमुळं हलवण्याचा निर्णय बीसीसीआय व आयसीसीनं घेतला. 17 ऑक्टोबरला स्पर्धेला सुरुवात होणार असून 14 नोव्हेंबरला अंतिम सामना खेळवण्यात येईल, असे आयसीसीनं जाहीर केलं आहे. त्यानुसार आता या स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर झालं आहे. टी 20 विश्वचषक 2021 चे वेळापत्रक आल्यानंतर प्रेक्षकांमध्ये मोठे उत्साहाचे वातावरण आहे. टी 20 वर्ल्ड कपचे स्पर्धेच्या वेळापत्रकाची प्रेक्षकांना बऱ्याच काळापासून प्रतीक्षा होती. आयसीसीने 17 ऑक्टोबर 2021 पासून टी 20 विश्वचषक 2021 चे आयोजन केले आहे. आयसीसीने म्हटले आहे की अंतिम सामना 14 नोव्हेंबर 2021 रोजी यूएईमध्ये होईल. अपेक्षित आहे की या वर्षी टी-20 स्पर्धा व्यवस्थित पार पडतील, स्पर्धा रद्द करण्याची गरज पडणार नाही. गेल्या वर्षीचा टी -20 विश्वचषक रद्द झाल्यामुळं प्रेक्षक आतुरतेने या स्पर्धेची वाट पाहत आहेत. या वर्षीच्या टी-20 स्पर्धेतील सर्व प्राथमिक फेरीचे सामने ओमान शहरात होणार आहेत. आयसीसी पुरुषांच्या टी-20 विश्वचषकाचे आयोजन करण्यासाठीची सर्व तयारी जवळपास पूर्ण झाली आहे. T20 World Cup: अश्विनच्या समावेशाबाबत गावसकरांचा धक्कादायक दावा, म्हणाले... टी -20 विश्वचषक याआधी भारतात आयोजित केला जाणार होता. परंतु देशातील कोविड 19 रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे आता सर्व सामने यूएईमध्ये होणार आहेत. बीएसीआयची यूएईमध्ये यजमान म्हणून निवड झाली आहे. आतापर्यंत कोणत्याही देशाच्या कोणत्याही संघाने भारताने यजमान होण्यास आक्षेप घेतलेला नाही. सामने 17 ऑक्टोबर 2021 पासून सुरू होतील. सध्या अंतिम सामन्याची तारीख 14 नोव्हेंबर 2021 देण्यात आली आहे. (ICC T20 World Cup) वेळापत्रक जाहीर केलं आहे. स्पर्धेची सुरुवात 17 ऑक्टोबरपासून होईल, तर 14 नोव्हेंबरला फायनल खेळवली जाईल. 17 ऑक्टोबरपासून पहिल्या राऊंडच्या मॅच खेळवल्या जातील. यामध्ये 8 टीमना ग्रुप ए आणि ग्रुप बीमध्ये ठेवण्यात आलं आहे. दोन्ही ग्रुपच्या प्रत्येकी टॉप-2 अशा एकूण 4 टीम सुपर-12 मध्ये प्रवेश करतील. T20 World Cup: 'रात्रीतून असं काय घडलं....', धोनीच्या निवडीवर जडेजाचा सवाल सुपर-12 चे सामने 23 ऑक्टोबरपासून (ICC T20 World Cup 2021 Schedule) सुपर-12 चे सामने 23 ऑक्टोबरपासून सुरू होतील. सुपर-12 मध्येही ग्रुप 1 आणि ग्रुप 2 असे दोन ग्रुप करण्यात आले आहेत. ग्रुप-1 च्या मॅच 23 ऑक्टोबरपासून तर ग्रुप-2 च्या मॅच 24 ऑक्टोबरपासून होतील. भारतीय टीमला ग्रुप-2 मध्ये ठेवण्यात आलं आहे. पहिल्याच दिवशी भारत-पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यात सामना रंगेल. ग्रुप-1 (ICC T20 World Cup Group A 2021 Schedule) इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज यांच्यासह ग्रुप-एचा विजेता आणि ग्रुप-बीचा उपविजेता
   DateMatchTimeVenue
   123 ऑक्टोबरऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका,दुपारी 3.30 वाजताअबू धाबी
  2 23 ऑक्टोबर इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडिज संध्याकाळी 7.30 वाजता दुबई
  3 24 ऑक्टोबर ए1 विरुद्ध बी 2 दुपारी 3.30 वाजता, शारजा
  4 26 ऑक्टोबर दक्षिण आफ्रिका विरुद्ध वेस्ट इंडिज, दुपारी 3.30 वाजता, दुबई
  5 27 ऑक्टोबर  इंग्लंड विरुद्ध बी 2 दुपारी 3.30 वाजताअबू धाबी
  6 28 ऑक्टोबर ऑस्ट्रेलिया विरुद्ध ए1 संध्याकाळी 7.30 वाजता दुबई
  7 29 ऑक्टोबर  वेस्ट इंडिज विरुद्ध बी 2 दुपारी 3.30 वाजताशारजा
  830 ऑक्टोबर दक्षिण आफ्रिका विरुद्ध ए 1 दुपारी 3.30 वाजताशारजा
  9 30 ऑक्टोबर इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया संध्याकाळी 7.30 वाजता दुबई
  10 1 नोव्हेंबर  इंग्लंड विरुद्ध ए 1 संध्याकाळी 7.30 वाजता शारजा
  112 नोव्हेंबरदक्षिण आफ्रिका विरुद्ध बी 2दुपारी 3.30 वाजताअबू धाबी
  124 नोव्हेंबरऑस्ट्रेलिया विरुद्ध बी 2दुपारी 3.30 वाजतादुबई
  136 नोव्हेंबर ,ऑस्ट्रेलिया विरुद्ध वेस्ट इंडिजदुपारी 3.30 वाजता अबू धाबी
  146 नोव्हेंबर इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका संध्याकाळी 7.30 वाजता शारजा
  15
  ग्रुप 2 चे वेळापत्रक (ICC T20 World Cup Group B 2021 Schedule) ग्रुप-2 भारत, पाकिस्तान, न्यूझीलंड, अफगाणिस्तान, ग्रुप Aचा उपविजेता आणि ग्रुप Bचा विजेता
   DateMatchTimeVenue
   124 ऑक्टोबरभारत विरुद्ध पाकिस्तानसंध्याकाळी 7.30 वाजता दुबई
  2 25 ऑक्टोबरअफगाणिस्तान विरुद्ध बी 1 संध्याकाळी 7.30 वाजताशारजा
  3 26 ऑक्टोबरपाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड संध्याकाळी 7.30 वाजतादुपारी शारजा
  4 27 ऑक्टोबरबी 1 विरुद्ध ए 2 संध्याकाळी 7.30 वाजता दुबई
  5 29 ऑक्टोबर अफगाणिस्तान विरुद्ध पाकिस्तानसंध्याकाळी 7.30 वाजतादुबई
  6 31 ऑक्टोबरअफगाणिस्तान विरुद्ध ए 2दुपारी 3.30 वाजताअबू धाबी
  7 31 ऑक्टोबरभारत विरुद्ध न्यूझीलंड संध्याकाळी 7.30 वाजतादुबई
  82 नोव्हेंबरपाकिस्तान विरुद्ध ए 2संध्याकाळी 7.30 वाजताअबू धाबी
  93 नोव्हेंबरन्यूझीलंड विरुद्ध बी 1 संध्याकाळी 7.30 वाजता दुबई
  10 3 नोव्हेंबर भारत विरुद्ध अफगाणिस्तान  संध्याकाळी 7.30 वाजताअबू धाबी
  115 नोव्हेंबरन्यूझीलंड विरुद्ध ए 2संध्याकाळी 7.30 वाजताशारजा
  127 नोव्हेंबरभारत विरुद्ध बी 1संध्याकाळी 7.30 वाजतादुबई
  137 नोव्हेंबर ,न्यूझीलंड विरुद्ध अफगाणिस्तानदुपारी 3.30 वाजता अबू धाबी
  148 नोव्हेंबरपाकिस्तान विरुद्ध बी 1 संध्याकाळी 7.30 वाजता शारजा
  15 भारत विरुद्ध A 2 संध्याकाळी 7.30 वाजता दुबई
  T20 World Cup 2021: टीम इंडियात मुंबई इंडियन्सचा दबदबा, कॅप्टनसह 6 जणांचा समावेश ICC T20 World Cup2021 नॉक आऊट सामन्यांचं वेळापत्रक टी-20 वर्ल्ड कप 2021 च्या नियमांनुसार प्रत्येक ग्रुपच्या टॉप-2 टीम सेमी फायनलमध्ये प्रवेश मिळवतील. त्यामुळे ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेला चांगली कामगिरी करणं भाग आहे, कारण इंग्लंड आणि वेस्ट इंडिजसारख्या मजबूत टीम त्यांना पराभूत करून सेमी फायनलमध्ये प्रवेश करू शकतात. 10 नोव्हेंबर – सेमी फायनल 1,  अबू धाबी 11 नोव्हेंबर – सेमी फायनल 2,  दुबई 14 नोव्हेंबर – फायनल,  दुबई ग्रुप-2 मध्ये भारत खेळणार 5 मॅच (Team India Schedule For T-20 World Cup) ग्रुप-2 मध्ये विराट कोहलीच्या नेतृत्वात टीम इंडिया 5 मॅच खेळेल. भारताचा दुसरा मुकाबला 31 ऑक्टोबरला न्यूझीलंडविरुद्ध, तिसरा 3 नोव्हेंबरला अफगाणिस्तानविरुद्ध, चौथा सामना 5 नोव्हेंबरला ग्रुप बीच्या विजेत्या टीमसोबत आणि पाचवा सामना 8 नोव्हेंबरला ग्रुप ए च्या उपविजेत्या टीमसोबत होईल. टीम निवडीवर विराटची नाही तर रोहितची छाप, 'या' 3 निवडीमुळे झालं स्पष्ट T20 World Cup साठी भारतीय टीम (India 15 member squad for t20 world 2021) विराट कोहली, रोहित शर्मा, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, इशान किशन, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, राहुल चहर, आर. अश्विन, अक्षर पटेल, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी राखीव खेळाडू : श्रेयस अय्यर, शार्दुल ठाकूर, दीपक चहर T20 World Cup साठी ऑस्ट्रेलियाची टीम :  (Australia 15 member squad for t20 world 2021) आरोन फिंच (कॅप्टन), अ‍ॅस्टन अगर, जोश हेजलवूड, जोश इंग्लिस, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, केन रिचर्डसन, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क, मार्कस स्टॉईनिस, मिचेल स्विप्सन, मॅथ्यू वेड, डेव्हिड वॉर्नर आणि अ‍ॅडम झम्पा राखीव खेळाडू : डॅन ख्रिस्टीन, नॅथन एलिस, डेवियन सॅम्स T20 वर्ल्ड कपसाठी पाकिस्तानची टीम :  (Pakistan 15 member squad for t20 world 2021) बाबर आझम (कॅप्टन), मोहम्‍मद रिजवान, आसिफ अली, खुशहिदल शाह, मोहम्‍मद हफीज, शोएब मकसूद, आजम खान, इमाद वसीम, मोहम्‍मद नवाज, मोहम्‍मद वसीम, शाहदाब खान, हसन अली, हॅरीस राऊफ, मोहम्‍मद हसनैन आणि  शाहिन अफ्रिदी. राखीव खेळाडू : फखर जमां, उस्‍मान कादिर, शाहनवाज दानी T20 World Cup 2021 : विराट नाही तर या खेळाडूमुळे अश्विनचं 4 वर्षांनी कमबॅक! T-20 वर्ल्ड कपसाठी न्यूझीलंडची टीम (New Zealand 15 member squad for t20 world 2021) केन विलियमसन, टॉड एस्टल, ट्रेन्ट बोल्ट, मार्क कॅम्पमन, डेवॉन कॉनवे, लॉकी फर्ग्युसन, मार्टीन गप्टील, काईल जेमिसन, डॅरेल मिचल, जिम्मी नीशम, ग्लेन फिलिप्स, मिचेल सॅन्टनर, टीम सायफर्ट, इश सोदी, टीम साऊदी, एडम मिल्ने
  Published by:News18 Desk
  First published:

  Tags: BCCI, Icc, T20 world cup

  पुढील बातम्या