दुबई, 20 ऑक्टोबर : टी-20 वर्ल्ड कपच्या (T20 World Cup) सराव सामन्यातला सगळ्यात मोठा उलटफेर बघायला मिळाला आहे. अफगाणिस्तानच्या टीमने दोन वेळा वर्ल्ड कप जिंकलेल्या वेस्ट इंडिजचा (Afghanistan vs West Indies Practice Match) तब्बल 56 रननी पराभव केला आहे. अफगाणिस्तानने दिलेलं 190 रनचं आव्हान पार करताना वेस्ट इंडिजला 20 ओव्हरमध्ये 5 विकेट गमावून फक्त 133 रन करता आल्या. रोस्टन चेसने सर्वाधिक 54 रन केले, तर निकोलस पूरनने 35 रनची खेळी केली. अफगाणिस्तानकडून कर्णधार मोहम्मद नबीला (Mohammad Nabi) सर्वाधिक 3 विकेट मिळाल्या, तर नवीन उल हक आणि करीम जन्नत यांना प्रत्येकी 1-1 विकेट घेण्यात यश आलं.
या सामन्यामध्ये अफगाणिस्तानने टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला आणि 20 ओव्हरमध्ये 189/5 या स्कोअरपर्यंत मजल मारली. हजरतुल्लाह झझई आणि मोहम्मद शहजाद या दोन ओपनरनी 8.5 ओव्हरमध्ये 90 रनची पार्टनरशीप केली. झझईने 56 आणि शहजादने 54 रन केले, तर गुरबाजने 33 आणि नजीबुल्लाहने 23 रनचं योगदान दिलं. वेस्ट इंडिजकडून ओबेड मॅकोयला सर्वाधिक 2 विकेट मिळाल्या, तर रामपॉल हेडन वॉल्श आणि आंद्रे रसेल यांना प्रत्येकी एक-एक विकेट घेता आली.
वेस्ट इंडिजची टीम या वर्ल्ड कपमधली सगळ्यात यशस्वी टीम समजली जात आहे, पण दोन्ही सराव सामन्यांमध्ये त्यांना पराभवाचा धक्का बसला आहे. याआधी पाकिस्तानविरुद्धच्या सराव सामन्यातही त्यांचा पराभव झाला होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Afghanistan, T20 world cup, West indies