• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • T20 World Cup : AFG vs NZ मॅचआधी भारतीयांनी बदललं नाव, सेहवागला आठवला आमीर खान!

T20 World Cup : AFG vs NZ मॅचआधी भारतीयांनी बदललं नाव, सेहवागला आठवला आमीर खान!

टी-20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) अफगाणिस्तान आणि न्यूझीलंड (Afghanistan vs New Zealand) यांच्यातला सामना टीम इंडियासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. या सामन्यात अफगाणिस्तानचा विजय व्हावा, यासाठी टीम इंडियाचे (Team India) खेळाडू आणि चाहते प्रार्थना करत आहेत.

 • Share this:
  मुंबई, 7 नोव्हेंबर : टी-20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) अफगाणिस्तान आणि न्यूझीलंड (Afghanistan vs New Zealand) यांच्यातला सामना टीम इंडियासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. या सामन्यात अफगाणिस्तानचा विजय व्हावा, यासाठी टीम इंडियाचे (Team India) खेळाडू आणि चाहते प्रार्थना करत आहेत. कारण या सामन्यात अफगाणिस्तानचा विजय झाला तर टीम इंडियाला सेमी फायनलमध्ये पोहोचण्याची संधी आहे. पण जर किवी टीमने अफगाणिस्तानला हरवलं तर भारताचं सेमी फायनलला पोहोचण्याचं स्वप्न संपुष्टात येईल. अफगाणिस्तानच्या विजयासाठी भारतीय चाहते सोशल मीडियावर प्रार्थना करत आहेत, एवढच नाही तर त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटचं नाव अफगाणिस्तानी खेळाडूंच्या नावाने ठेवलं आहे. भारताचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागने (Virender Sehwag) अफगाणिस्तान-न्यूझीलंड मॅचवर मजेदार मीम शेयर केलं आहे. यामध्ये त्याने आमीर खानच्या लगान चित्रपटाचा फोटो शेयर केला आहे. भारतीय क्रिकेट चाहत्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर अफगाणिस्तानी खेळाडूंची आडनावं लावली आहे. अफगाणिस्तान टीमला पाठिंबा देण्यासाठी अनेकांनी आपली ट्विटरवरची नावं बदलली आहेत. चाहत्यांनी ठेवलेल्या आडनावांमध्ये मुजीब उर रहमान, हजरतुल्लाह झझई, नजीबुल्लाह जादरान आणि राशिद खान या अफगाणिस्तानी खेळाडूंचा समावेश आहे. यानंतर काही ट्विटर प्रोफाईल निशान उर रहमान झाल्या आहेत, तर रोहित जामगरा रोहितुल्लाह झझई झाला आहे. दुसऱ्या ग्रुपमध्ये असलेल्या टीम इंडियाचा नेट रनरेट इतर टीमपेक्षा सरस आहे, त्यामुळे अफगाणिस्तानचा विजय झाला आणि सोमवारी भारताने नामिबियाला हरवलं तर भारताचा सेमी फायनलचा मार्ग सोपा होईल. यंदाच्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाची सुरुवात खराब झाली. पाकिस्तानविरुद्ध 10 विकेटने पराभव झाल्यानंतर न्यूझीलंडविरुद्धचा सामना भारताने 8 विकेटने गमावला. यानंतर अफगाणिस्तानविरुद्ध भारताचा 66 रननी आणि स्कॉटलंडविरुद्ध 8 विकेटने विजय झाला. शेवटच्या दोन विजयांमुळे टीमच्या नेट रनरेटला मोठा फायदा झाला असला तरी पहिले दोन पराभव भारताच्या चांगलेच जिव्हारी लागले.
  Published by:Shreyas
  First published: