• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • T20 World Cup : Shocking! NZ vs AFG मॅचआधी पिच क्युरेटरचा मृत्यू, हॉटेल रूममध्ये आढळला मृतदेह

T20 World Cup : Shocking! NZ vs AFG मॅचआधी पिच क्युरेटरचा मृत्यू, हॉटेल रूममध्ये आढळला मृतदेह

टी-20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) न्यूझीलंड आणि अफगाणिस्तान (New Zealand vs Afghanistan) सामन्याआधी झालेल्या खळबळजनक प्रकाराचं वृत्त समोर येत आहे.

 • Share this:
  मुंबई, 7 नोव्हेंबर : टी-20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) न्यूझीलंड आणि अफगाणिस्तान (New Zealand vs Afghanistan) सामन्याआधी झालेल्या खळबळजनक प्रकाराचं वृत्त समोर येत आहे. अबु धाबीमध्ये सुरू होणाऱ्या या सामन्याआधीच इथले पिच क्युरेटर मोहन सिंग (Pitch Curator Mohan Singh Death) यांचा मृतदेह हॉटेल रूममध्ये आढळून आला आहे. युएई क्रिकेट असोसिएशनने दिलेल्य माहितीनुसार 45 वर्षांचे मोहन सिंग नैराश्येमध्ये होते. न्यूझीलंड आणि अफगाणिस्तान यांच्यातल्या सामन्याआधी पिचचं सर्वेक्षण करून मोहन सिंग हॉटेल रूममध्ये गेले, यानंतर त्यांचा मृतदेह हॉटेल रूममध्ये लटकलेल्या अवस्थेत आढळला. अबू धाबी क्रिकेट असोसिएशन आणि आयसीसीने मोहन सिंग यांना श्रद्धांजली वाहिली आहे, पण त्यांच्या मृत्यूचं कारण अजूनही सांगण्यात आलेलं नाही. मोहन सिंग यांची पत्नी आणि मुलगी लवकरच अबू धाबीला पोहोचणार आहेत. 'आमचे मुख्य पिच क्युरेटर मोहन सिंग यांच्या निधनाचं वृत्त सांगताना आम्हाला अतिशय दु:ख होत आहे. मोहन अबु धाबीमध्ये 15 वर्ष होते. या काळात अबु धाबीला क्रिकेटचं यशस्वी ठिकाण करण्यात त्यांनी मोलाची भूमिका निभावली,' असं अबु धाबी क्रिकेट असोसिएशनने त्यांच्या प्रसिद्धी पत्रकात म्हणलं आहे. 'आज सकाळी मोहन सिंग खेळपट्टी बघण्यासाठी आले, त्यांनी तयारीविषयी आमच्यासोबत चर्चा केली आणि मग हॉटेलमध्ये निघून गेले. यानंतर ते परत स्टेडियममध्ये आले नाहीत, त्यामुळे काही जण त्यांना पाहण्यासाठी हॉटेलमध्ये गेले तेव्हा त्यांचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळला,' असं स्पर्धेच्या अधिकाऱ्याने पीटीआयशी बोलताना सांगितलं. मोहन सिंग यांच्या मृत्यूचं कारण स्थानिक पोलिसांच्या तपासानंतरच कळेल, अशी प्रतिक्रिया या अधिकाऱ्याने दिली. मोहन सिंग यांनी बीसीसीआयचे माजी मुख्य क्युरेटर दलजीत सिंग यांच्यासोबत बराच काळ काम केलं. दलजीत आणि मोहन सिंग मोहालीच्या खेळपट्टीवर एकत्र काम करायचे, यानंतर 2000 सालच्या सुरुवातीला मोहन सिंग युएईला रवाना झाले.
  Published by:Shreyas
  First published: