Home /News /sport /

T20 World Cup मध्ये 'या' खेळाडूंवर असणार सर्वांचे लक्ष; गाजवले होते IPLचे मैदान

T20 World Cup मध्ये 'या' खेळाडूंवर असणार सर्वांचे लक्ष; गाजवले होते IPLचे मैदान

T20 World Cup

T20 World Cup

टी -20 वर्ल्डकप स्पर्धा सुरू होण्यापूर्वी आयपीएल 2021 (IPL2021) स्पर्धेचा थरार पाहायला मिळाला होता. या स्पर्धेत अनेक खेळाडूंनी आपल्या कमालीच्या खेळीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. आता हेच खेळडू टी -20 वर्ल्डकपचे मैदान गाजवतात का हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

पुढे वाचा ...
  नवी दिल्ली, 22 ऑक्टोबर: क्रिकेट जगतात सध्या टी -20 वर्ल्डकपचे (T20 World Cup) वारे वाहू लागले आहे. यूएई आणि ओमानमध्ये सुरु असलेली ही स्पर्धा सुरू होण्यापूर्वी आयपीएल 2021 (IPL2021) स्पर्धेचा थरार पाहायला मिळाला होता. या स्पर्धेत अनेक खेळाडूंनी आपल्या कमालीच्या खेळीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. आता हेच खेळडू टी -20 वर्ल्डकपचे मैदान गाजवतात का हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. टी -20 वर्ल्डकपसाठी टीम इंडियाचा संघ जाहिर झाला असून संघात निवड करण्यात आलेले वरूण चक्रवर्ती, केएल राहुल, रिषभ पंत, शार्दुल ठाकूर यांची निवड करण्यात आली आहे  तर केकेआरला अंतिम फेरीत पोहचवण्यात लॉकी फर्ग्युसन पहिल्यांदाच टी -20 वर्ल्डकप स्पर्धेत न्यूझीलंड संघाचे प्रतिनिधित्व करणार आहे

  वरूण चक्रवर्ती

  मिस्ट्री गोलंदाज’ म्हणून ओळखला जाणारा वरून वरून चक्रवर्ती ६ वेगवेगळ्या प्रकारचे चेंडू टाकू शकतो. त्याने आयपीएल 2021 स्पर्धेत कोलकाता नाईट रायडर्स संघाचे प्रतिनिधित्व केले होते. तसेच ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध झालेल्या सराव सामन्यात तो साजेशी कामगिरी करण्यात अपयशी ठरला असला तरीदेखील त्याने आयपीएल 2021 स्पर्धेत अप्रतिम कामगिरी केली होती. त्याने या हंगामात एकूण 17 सामने खेळले. ज्यामध्ये त्याला 18 गडी बाद करण्यात यश आले आहे.

  केएल राहुल

  पंजाब किंग्स संघाचा कर्णधार केएल राहुल आयपीएल 2021 चा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज राहिला होता. परंतु अंतिम अंतिम सामन्यात ऋतुराज गायकवाड आणि फाफ डू प्लेसिसने त्याला मागे टाकले आहे. आयपीएल 2021 स्पर्धेत त्याने तुफान फटकेबाजी करत 600 पेक्षा अधिक धावा केल्या. त्याने 13 सामन्यात 636 धावा केल्या. तसेच आयसीसी टी -20 विश्वचषक स्पर्धेच्या सराव सामन्यांमध्ये देखील केएल राहुलने अप्रतिम फलंदाजी केली होती. त्यामुळे या स्पर्धेत देखील त्याच्याकडून चांगल्या खेळीची अपेक्षा असणार आहे.

  रिषभ पंत

  रिषभ पंत आयपीएल 2021 स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत १० व्या स्थानी आहे. त्याने 16 डावात 419धावा केल्या होत्या. त्याला दिल्ली कॅपिटल्स संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली होती. ही जबाबदारी त्याने योग्यरीत्या पार पाडली होती. आता तो पहिल्यांदाच टी -20 विश्वचषक स्पर्धा खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे. त्यामुळे सर्वांच्या नजरा त्याच्या बॅटिगकडे वळल्या आहेत.

  शार्दुल ठाकूर

  शेवटच्या क्षणी शार्दुल ठाकूरला भारतीय संघात संधी देण्यात आली. सुरुवातीला त्याची निवड राखीव खेळाडू म्हणून करण्यात आली होती. परंतु शेवटच्या क्षणी अक्षर पटेलच्या जागी शार्दुल ठाकूरला संघात स्थान देण्यात आले. तर अक्षर पटेलला राखीव खेळाडू म्हणून संधी देण्यात आली. त्याने आयपीएल २०२१ स्पर्धेच्या १६ सामन्यात एकूण २१ गडी बाद केले होते. आता हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे की, या संधीचा तो कसा फायदा घेतो?

  लॉकी फर्ग्युसन

  कोलकाता नाईट रायडर्स संघाला आयपीएल 2021 स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहचवण्यात लॉकी फर्ग्युसनने अमूल्य योगदान दिले आहे. त्याने 8 सामन्यात 13 गडी बाद केले होते. लॉकी फर्ग्युसन पहिल्यांदाच टी -20 वर्ल्डकप स्पर्धेत न्यूझीलंड संघाचे प्रतिनिधित्व करणार आहे.
  Published by:Dhanshri Otari
  First published:

  Tags: Kl rahul, Rishabh pant, Shardul Thakur, T20 cricket, T20 league, T20 world cup, Team india

  पुढील बातम्या