मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

क्रिकेटला Olympic मध्ये सामील करण्यासाठी मास्टर प्लान, T20 World Cup या दोन देशांमध्ये!

क्रिकेटला Olympic मध्ये सामील करण्यासाठी मास्टर प्लान, T20 World Cup या दोन देशांमध्ये!

टी-20 क्रिकेटचा ऑलिम्पिकमध्ये (T20 Cricket in Olympic) प्रवेश व्हावा, यासाठी आयसीसीने (ICC) पहिलं पाऊल उचललं आहे. याचाच भाग म्हणून 2024 चा टी-20 वर्ल्ड कप (T20 World Cup) अमेरिकेमध्ये (USA) होण्याची शक्यता आहे.

  • Published by:  Shreyas

सिडनी, 14 नोव्हेंबर : टी-20 क्रिकेटचा ऑलिम्पिकमध्ये (T20 Cricket in Olympic) प्रवेश व्हावा, यासाठी आयसीसीने (ICC) पहिलं पाऊल उचललं आहे. याचाच भाग म्हणून 2024 चा टी-20 वर्ल्ड कप (T20 World Cup) अमेरिकेमध्ये (USA) होण्याची शक्यता आहे. 2028 लॉस एन्जेलिस ऑलिम्पिकमध्ये (Los Angeles Olympics) क्रिकेटचा प्रवेश व्हावा, यासाठी आयसीसी हा निर्णय घेऊ शकतं. यासाठी आयसीसी टी-20 वर्ल्ड कपचं आयोजन अमेरिका क्रिकेट आणि क्रिकेट वेस्ट इंडिजला देऊ शकतं, म्हणजे 2024 चा वर्ल्ड कप या दोन देशांमध्ये होऊ शकतो. अमेरिका सध्या आयसीसीचा असोसिएट सदस्य आहे.

सिडनी मॉर्निंग हेराल्डने दिलेल्या वृत्तानुसार 'आयसीसी स्पर्धांच्या पुढच्या ठिकाणांचा निर्णय लवकरच घेतला जाणार आहे. क्रिकेटला ग्लोबल फोकस देण्यासाठी अमेरिकेमध्ये टी-20 वर्ल्ड कप होऊ शकतो.' जर असं झालं तर 2014 साली बांगलादेशमध्ये झालेल्या टी-20 वर्ल्ड कपनंतर ही पहिली मोठी स्पर्धा असेल, ज्याचं आयोजन भारत, इंग्लंड किंवा ऑस्ट्रेलिया करणार नाही.

2024 साली 20 टीम खेळणार

आयसीसी बऱ्याच काळापासून उभरत्या देशांना मोठ्या स्पर्धांचं आयोजन देण्याचा विचार करत आहे. 2024 टी-20 वर्ल्ड कपमध्ये 20 टीम खेळण्याची शक्यता आहे. 2021 आणि 2022 च्या स्पर्धांमध्ये 16 टीम 45 मॅच खेळणार आहेत, पण 2024 मध्ये ही संख्या 55 मॅच होईल. आयसीसी 2024 ते 2031 मध्ये अनेक जागतिक स्पर्धांचं आयोजन करणार आहे. याची सुरुवात 2024 टी-20 वर्ल्ड कपने होणार आहे.

लॉस एन्जेलिस 2028 मध्ये तर 2032 साली ब्रिस्बेनमध्ये ऑलिम्पिक स्पर्धा होणार आहे, त्यामुळे या दोन्ही स्पर्धांमध्ये क्रिकेट असावं, याचा आयसीसीचा प्रयत्न आहे. 2015 ते 2023 पर्यंत आयसीसीच्या मोठ्या स्पर्धांचं आयोजन भारत, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियामध्येच झालं आहे.

First published:

Tags: T20 world cup