मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

क्रिकेटप्रेमींसाठी गुडन्यूज! 2 घातक बॉलर्स फिट पण जडेजाचा निकाल लागेना, या दिवशी ठरणार टीम

क्रिकेटप्रेमींसाठी गुडन्यूज! 2 घातक बॉलर्स फिट पण जडेजाचा निकाल लागेना, या दिवशी ठरणार टीम

टीम इंडिया

टीम इंडिया

आशिया कपमधून टीम इंडिया बाहेर गेली आहे. आता लक्ष्य टी २० वर्ल्ड कप जिंकण्याचं आहे. त्याआधी टीम इंडियाला ऑस्ट्रेलिया विरुद्ध सीरिज खेळायची आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Kranti Kanetkar

मुंबई : आशिया कपमधून टीम इंडिया बाहेर गेली आहे. आता लक्ष्य टी २० वर्ल्ड कप जिंकण्याचं आहे. त्याआधी टीम इंडियाला ऑस्ट्रेलिया विरुद्ध सीरिज खेळायची आहे. तर दोन सराव सामने देखील खेळायचे आहेत. आशिया कपपासून टीम इंडियातील ५ खेळाडूंना गंभीर दुखापत झाल्याने ते टी २० वर्ल्ड कप खेळणार की नाही अशी चर्चा सुरू होती. रोहित शर्मा आणि कोच द्रविडची चिंता थोडी कमी झाली आहे. कारण टीम इंडियाचे दोन खेळाडू फिट झाले आहेत.

टीम इंडियाचा वेगवान बॉलर जसप्रीत बुमराह फिटनेस टेस्टमध्ये पास झाला. हर्षलनेही ही परीक्षा यशस्वीपणे दिली आहे. त्यामुळे दोन्ही खेळाडू आता टीममध्ये खेळण्यासाठी तयार आहेत. टी २० वर्ल्ड कपसाठी टीम निवडताना हे दोन्ही खेळाडू उपलब्ध असणार आहेत.

रविंद्र जडेजाच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया झाली आहे. तो काही आठवडे मैदानापासून बाहेर राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे तो टी २० वर्ल्ड कपमधून देखील बाहेर जाण्याची शक्यता आहे. याबाबत बीसीसीआयने अजून अधिकृत माहिती दिली नाही.

View this post on Instagram

A post shared by jasprit bumrah (@jaspritb1)

हेही वाचा- शरद पवार विरुद्ध फडणवीस पुन्हा रंगणार सामना? मिलिंद नार्वेकरही शर्यतीत

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार टी २० वर्ल्ड कपसाठी १५ आणि १६ सप्टेंबर रोजी टीम इंडियाची निवड केली जाऊ शकते. १६ ऑक्टोबरपासून टी २० वर्ल्ड कपसाठी सामने खेळवण्यात येणार आहेत. तर १३ नोव्हेंबर रोजी अंतिम सामना खेळवण्यात येईल. यंदा १६ टीम या स्पर्धेत भाग घेणार आहेत.

First published:

Tags: Rohit sharma, T20 world cup 2022, Team india