Home /News /sport /

T20 World Cup 2022 : टीम इंडियाला दिलासा, सगळ्यात मोठा धोका टळला!

T20 World Cup 2022 : टीम इंडियाला दिलासा, सगळ्यात मोठा धोका टळला!

यावर्षी ऑस्ट्रेलियात ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कपच्या वेळापत्रकाची (ICC T20 World Cup 2022 Full Schedule) आयसीसीने घोषणा केली आहे.

    मुंबई, 21 जानेवारी : यावर्षी ऑस्ट्रेलियात ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कपच्या वेळापत्रकाची (ICC T20 World Cup 2022 Full Schedule) आयसीसीने घोषणा केली आहे. 16 ऑक्टोबर ते 13 नोव्हेंबरदरम्यान ही स्पर्धा होईल. पहिले 6 दिवस म्हणजेच 16 ऑक्टोबर ते 21 ऑक्टोबरदरम्यान पहिल्या राऊंडचे सामने होतील. यात श्रीलंका आणि वेस्ट इंडिजला खेळावं लागणार आहे. यानंतर 22 ऑक्टोबरपासून सुपर-12 स्टेजच्या सामन्यांना सुरूवात होईल. सुपर-12 चा पहिलाच सामना 2021 टी-20 वर्ल्ड कप फायनल खेळणाऱ्या ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंड यांच्यात असेल. सुपर-12साठी टीमना दोन ग्रुपमध्ये विभागण्यात आलं आहे. ग्रुप-1 मध्ये इंग्लंड, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तान आहे. तर ग्रुप-2 मध्ये भारत, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेश आहे. या 8 टीम शिवाय आणखी 4 टीम पहिल्या राऊंडनंतर क्वालिफाय होतील. भारताचे सगळे सामने मेलबर्न, सिडनी, पर्थ आणि ऍडलेडमध्ये होणार आहेत. दुसरीकडे भारताचा पहिलाच सामना पाकिस्तानविरुद्ध (IND vs PAK T20 World cup 2022) 23 ऑक्टोबरला पाकिस्तानविरुद्ध होणार आहे. मेलबर्नमध्ये हा महामुकाबला रंगणार आहे. दुसरा सामना 27 ऑक्टोबरला ग्रुप-ए च्या रनर अप टीमविरुद्ध सिडनीला. 30 ऑक्टोबरला तिसरा सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पर्थमध्ये होईल. तर 2 नोव्हेंबरला ऍडलेडमध्ये भारत-बांगलादेश यांच्यात टक्कर होईल. भारत सुपर-12ची आपली अखेरची मॅच 6 नोव्हेंबरला मेलबर्नमध्ये ग्रुप-बीच्या रनर अप टीमविरुद्ध खेळेल. टीम इंडियाला दिलासा टी-20 वर्ल्ड कपच्या वेळापत्रकाची (T20 World cup 2022) घोषणा होताच टीम इंडियाचा सगळ्यात मोठा धोका टळला आहे. आयसीसी ट्रॉफीमध्ये न्यूझीलंडविरुद्धची भारताची (India vs New Zealand) कामगिरी निराशाजनक राहिली आहे. टी-20 वर्ल्ड कपमध्ये भारताला एकदाही न्यूझीलंडविरुद्ध विजय मिळवता आलेला नाही. 2007, 2016 आणि 2021 टी-20 वर्ल्ड कपमध्ये न्यूझीलंडने भारताचा पराभव केला. याशिवाय 2019 वनडे वर्ल्ड कप सेमी फायनल आणि 2021 वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलमध्येही (WTC Final) न्यूझीलंडने भारताला धूळ चारली. आयसीसी ट्रॉफीमध्ये न्यूझीलंडविरुद्ध भारताचा अखेरचा विजय 2003 वनडे वर्ल्ड कपमध्ये झाला होता. पाकिस्तानचा बदला घ्यायची संधी 2021 साली झालेल्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानने पहिल्यांदाच भारताचा (IND vs PAK) पराभव केला होता. पाकिस्तानने तो सामना 10 विकेटने जिंकला होता. पहिल्यांदाच पाकिस्तानने भारताचा वर्ल्ड कप सामन्यात पराभव केला होता. टी-20 वर्ल्ड कपमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात 6 सामने झाले, यातल्या 5 मध्ये भारताचा विजय झाला. 2007 टी-20 वर्ल्ड कपमध्ये भारताने पाकिस्तानचा दोनदा पराभव केला, एकदा लीग स्टेज आणि एकदा फायनल. यानंतर 2012, 2014 आणि 2016 सालीही भारताने पाकिस्तानला धूळ चारली. मागच्या वर्षी मात्र पहिल्यांदाच पाकिस्तानला विजय मिळवता आला.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: India vs Pakistan, New zealand, T20 world cup, Team india

    पुढील बातम्या