मुंबई, 7 नोव्हेंबर: यूएई आणि ओमानमध्ये सुरू असलेला टी20 वर्ल्ड कप (T20 World Cup 2021) आता शेवटच्या टप्प्यात आला आहे. त्याचवेळी पुढील टी20 वर्ल्ड कपचे (T20 World Cup 2022) वेध सुरू झाले आहेत. क्रिकेट फॅन्सना पुढील वर्ल्ड कप स्पर्धेची फार प्रतीक्षा करावी लागणार नाही. ऑस्ट्रेलियामध्ये पुढच्या वर्षी पुढील वर्ल्ड कप होणार आहे. पुढील वर्ल्ड कप स्पर्धेत थेट पात्र होणाऱ्या टीमची घोषणा आयसीसीनं केली आहे. त्यामध्ये दोन माजी वर्ल्ड चॅम्पियन टीमचा समावेश नाही. त्यामुळे त्यांच्यावर आता पात्रता फेरीत खेळण्याची नामुश्की ओढावली आहे.
आयसीसीनं पुढील वर्ल्ड कपसाठी थेट पात्र होण्यासाठीची अंतिम तारीख 15 नोव्हेंबर निश्चित केली होती. आयसीसी टी20 रँकिंगमधील टॉप 8 टीमना मुख्य फेरीत थेट प्रवेश मिळाला आहे. त्यानुसार ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, पाकिस्तान, भारत, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, अफगाणिस्तान आणि बांगलादेश या टीमना थेट प्रवेश मिळाला आहे.
दोन वेळा ही स्पर्धा जिंकणारी वेस्ट इंडिज आणि 2014 साली ही स्पर्धा जिंकणाऱ्या श्रीलंका टीमला पात्रता फेरीत खेळावं लागणार आहे. बांगलादेशला या वर्ल्ड कपमध्ये एकही मॅच जिंकता आली नाही, तरीही ती टीम पुढील वर्ल्ड कपसाठी थेट पात्र झाली आहे.
The eight teams who will go directly into the Super 12s of the next men's #T20WorldCup in 2022 have been confirmed!
👉 https://t.co/607hF9nQEc pic.twitter.com/hZSIKlaXkC — ESPNcricinfo (@ESPNcricinfo) November 6, 2021
श्रीलंकेला या वर्ल्ड कपमध्येही पात्रता फेरी खेळूनच प्रवेश मिळाला आहे. पण वेस्ट इंडिजला या वर्ल्ड कपमधील सुमार कामगिरीचा मोठा फटका बसला. अनेक मॅचविनर खेळाडूंचा समावेश असलेल्या या टीमला या वर्ल्ड कपमध्ये 5 पैकी फक्त 1 मॅच जिंकता आली. त्यामुळे त्यांची टॉप आठच्या बाहेर घसरण झाली आहे. त्यामुळे आता वेस्ट इंडिजला पात्रता फेरी खेळावी लागणार आहे.
NZ vs AFG: अफगाणिस्तानवर संपूर्ण देशाची आशा, ट्विटरवर मजेदार Memes Viral
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Sri lanka, T20 world cup, West indies