• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • T20 World Cup 2021 : टीम इंडियातून डच्चू, चहलचा निवड समितीवर निशाणा

T20 World Cup 2021 : टीम इंडियातून डच्चू, चहलचा निवड समितीवर निशाणा

चहलला टीममध्ये स्थान न मिळाल्यामुळे अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं, कारण तो टी-20 मध्ये सर्वाधिक विकेट घेणारा भारतीय खेळाडू आहे. याशिवाय विराट कोहलीचाही (Virat Kohli favorite player) तो फेवरेट आहे.

 • Share this:
  मुंबई, 17 सप्टेंबर : टी-20 वर्ल्ड कपसाठी भारतीय टीममध्ये (T20 World Cup Team India) पाच स्पिनरना संधी देण्यात आली आहे, पण लेग स्पिनर युझवेंद्र चहलला (Yuzvendra Chahal) बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. चहलला टीममध्ये स्थान न मिळाल्यामुळे अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं, कारण तो टी-20 मध्ये सर्वाधिक विकेट घेणारा भारतीय खेळाडू आहे. याशिवाय विराट कोहलीचाही (Virat Kohli favorite player) तो फेवरेट आहे. चहलऐवजी भारतीय टीममध्ये राहुल चहरला (Rahul Chahar) संधी देण्यात आली. राहुल चहर आयपीएलमध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वातल्या मुंबई इंडियन्सकडून खेळतो. टीममध्ये निवड न झाल्यानंतर आता एका आठवड्याने चहलने ट्वीटरवरून निवड समितीवर निशाणा साधला आहे. वर्ल्ड कपसाठी भारतीय टीमची निवड झाल्यानंतर निवड समिती अध्यक्ष चेतन शर्मा (Selection committe chairman Chetan Sharma) यांनी राहुल चहरला टीममध्ये का घेतलं, याचं कारण सांगितलं. 'आम्हाला असा लेग स्पिनर पाहिजे होता, जो जलद बॉल टाकू शकतो. आम्ही चहरला चांगल्या गतीने बॉलिंग करताना बघितलं. जलद बॉल टाकल्यामुळे बॉलरला खेळपट्टीवरून चांगली ग्रिप मिळते. चहल आणि चहर या दोघांच्या नावावर आम्ही खूप विचार केला, अखेर राहुलच्या नावावर सहमती तयार झाली,' असं चेतन शर्मा म्हणाले होते. मुंबई इंडियन्स होणार नवं सत्ताकेंद्र, 2 दिग्गज सांभाळणार टीम इंडियाची जबाबदारी! चेतन शर्मा यांच्याशिवाय माजी भारतीय क्रिकेटपटू आकाश चोप्रा (Aakash Chopra) याच्यामतेही युएईमध्ये जलद स्पिनर प्रभाव टाकू शकतील. आयपीएल आणि टी-20 वर्ल्ड कप युएईमध्ये होणार आहेत, त्यामुळे आकाश चोप्राने आयपीएलच्या (IPL) 30 मॅचच्या आधारावर विश्लेषण केलं. यात त्याने 4 सल्ले दिले, यावर चहलने मजेशीर उत्तर दिलं. 'आयपीएल 2020 च्या पहिल्या 30 मॅच बघितल्यानंतर काही गोष्टी समोर आल्या. यावेळीही बहुतेक गोष्टी तशाच असतील. 1 टॉस जिंकून पहिले बॅटिंग करा. 2 मध्यम गती बॉलरऐवजी फास्ट बॉलरची निवड करा. 3 पॉवरप्ले ओव्हरमध्ये सांभाळून बॅटिंग करा. 4 जलद स्पिनर्स प्रभावित ठरू शकतील,' असं आकाश चोप्रा त्याच्या ट्वीटमध्ये म्हणाला. 6 महिन्यांपासून सुरु होता विराट आणि BCCI यांच्यातील संघर्ष, वाचा Inside Story चहलने आकाश चोप्राच्या या ट्वीटवर प्रतिक्रिया दिली. जलद स्पिनर, भावा? असं म्हणत चहलने हसण्याच्या स्माईली टाकल्या. वर्ल्ड कपसाठी भारतीय टीम विराट कोहली, रोहित शर्मा, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, इशान किशन, ऋषभ पंत, हार्दिक पांड्या, रविंद्र जडेजा, राहुल चहर, आर.अश्विन, अक्षर पटेल, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी राखीव खेळाडू श्रेयस अय्यर, शार्दुल ठाकूर, दीपक चहर
  First published: