क्रिकेट चाहत्यांसाठी आणखी एक पर्वणी, भारतात रंगणार टी-ट्वेण्टी वर्ल्डकपचा थरार

क्रिकेट चाहत्यांसाठी आणखी एक पर्वणी, भारतात रंगणार टी-ट्वेण्टी वर्ल्डकपचा थरार

आयपीएलच्या घोषणेनंतर आता टी-ट्वेण्टी वर्ल्ड कपबाबतही घोषणा करण्यात आली आहे.

  • Share this:

मुंबई, 7 ऑगस्ट : कोरोना संकटामुळे इतर क्षेत्रांप्रमाणे क्रीडाजगतावरही मोठा परिणाम झाला आहे. अनेक मोठ्या स्पर्धा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. मात्र त्यानंतर आता पुन्हा एकदा क्रिकेट (Cricket) चाहत्यांना दिलासा मिळाला आहे. कारण आयपीएलच्या घोषणेनंतर आता टी-ट्वेण्टी वर्ल्ड कपबाबतही (T20 World Cup 2021) घोषणा करण्यात आली आहे.

पुढील वर्षी म्हणजे 2021 मध्ये भारतात टी-ट्वेण्टीचा वर्ल्डकप खेळवण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. मागील टी-ट्वेण्टी वर्ल्डकप 2016 झाला होता. त्यानंतर 2020 मध्ये ही स्पर्धा होणार होती. मात्र कोरोना व्हायरस थैमानाच्या पार्श्वभूमीवर ही स्पर्धा यंदा होऊ शकणार नाही.

दुसरीकडे, पुढच्या टी-ट्वेण्टी वर्ल्डकपचीही घोषणा करण्यात आली असून हा वर्ल्डकप ऑस्ट्रेलियामध्ये 2022 साली खेळवण्यात येणार आहे.

तसंच महिला वर्ल्डकपची स्पर्धाही पुढे ढकलण्यात आली असून फेब्रुवारी 2021 ऐवजी हा वर्ल्डकप 2022 मध्ये होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

IPL बाबत याआधीच मिळाली आनंदाची बातमी

भारतातील लोकप्रिय क्रिकेट लीग अर्थात IPL चा यंदाचा सीझन लांबणीवर पडला. मात्र काही दिवसांपूर्वीच आयपीएलच्या तारखांची अधिकृत माहिती देण्यात आली असून आयपीएलचा यंदाचा सीझन 19 सप्टेंबर रोजी सुरू होणार असून 10 नोव्हेंबरला अंतिम सामना खेळवण्यात येणार आहे.

जगभरातील क्रिकेटप्रेमींसाठी पर्वणी असेलली इंडियन प्रिमिअर लीग (IPL) ही स्पर्धा यंदा कोरोनाच्या संकटामुळे पुढे ढकलण्यात आली. मात्र भारतातील कोरोनाचे संकट आणखीनच गडद झाले असल्याने IPL होणार की नाही, अशी शंका उपस्थित करण्यात येत होती. मात्र यंदा ही स्पर्धा होणार असल्याचं निश्चित झालं आहे.

Published by: Akshay Shitole
First published: August 7, 2020, 8:29 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading