मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /WI vs SL : हेटमायरची चिवट झुंज वाया, श्रीलंकेचा वेस्ट इंडीजवर शानदार विजय

WI vs SL : हेटमायरची चिवट झुंज वाया, श्रीलंकेचा वेस्ट इंडीजवर शानदार विजय

हेटमायरने धडाकेबाज 81 रन्सची खेळी केली पण टीमला विजय मिळवून देऊ शकली नाही. लंकनं टीमने 20 रन्सने विंडीज टीमला पराभूत केले.

हेटमायरने धडाकेबाज 81 रन्सची खेळी केली पण टीमला विजय मिळवून देऊ शकली नाही. लंकनं टीमने 20 रन्सने विंडीज टीमला पराभूत केले.

हेटमायरने धडाकेबाज 81 रन्सची खेळी केली पण टीमला विजय मिळवून देऊ शकली नाही. लंकनं टीमने 20 रन्सने विंडीज टीमला पराभूत केले.

दुबई, 04 नोव्हेंबर : टी 20 वर्ल्ड कपच्या (T20 World Cup 2021 ) सुपर-12 सामन्याची चुरस आता आणखी वाढली आहे. अबुधाबीमध्ये  आज श्रीलंकेच्या (Sri Lanka) टीमने वेस्टइंडीज (West Indies) संघाचा चांगलाच डंका वाजवत विजय मिळवला आहे. विंडीजकडून हेटमायरने धडाकेबाज 81 रन्सची खेळी केली पण टीमला विजय मिळवून देऊ शकली नाही. लंकनं टीमने 20 रन्सने विंडीज टीमला पराभूत केले.

अबुधाबीमधील शेख जायेद स्टेडियमवर वेस्ट इंडीज आणि श्रीलंकेत सामना रंगला होता.  190 रन्सचं टार्गेट घेऊन मैदानात उतरलेल्या विंडीज संघाची लंकेनं सेनेनं पार वाट लावून टाकली. सलामीला आलेला ख्रिस गेल अवघा १ रन्स करून माघारी परतला. त्यापाठोपाठ एविन लुइस सुद्धा ८ रन्स करून आऊट झाला. निकोलस पुरनने टीमची बाजू सावरत ४६ रन्सची शानदार इनिंग पेश केली पण अर्धशतक करू शकला नाही. त्यानंतर आंद्रे रसेल, कॅप्टन कायरन पोलार्ड, जेसन होल्डर झटपट बाद झाले. पोलार्डला तर भोपाळ सुद्धा फोडता आला नाही.

36 तासात 5 हत्या; यमुना एक्सप्रेस-वेच्या किनाऱ्यावर आणखी 2 महिलांचे मृतदेह

मात्र, दुसरीकडे मधल्या फळीतला हुकमी एक्का असलेल्या शिमरन हेटमायरने चिवट झुंज दिली. हेटमायरने अर्धशतक झळकवले. 39 बॉल्समध्ये त्याने ६ चौकार आणि १ सिक्स लावून ५० रन्स पूर्ण केले. त्याला इतर कोणत्याही खेळाडूने हवी तशी साथ दिली नाही. इवेन ब्रावो अवघे २ रन्स करून माघारी परतला. हेटमायरने शेवटपर्यंत लढत दिली, पण त्याची झुंज अपयशी ठरली. हेटमायरने ८१ रन्सची धडाकेबाज नाबाद खेळी केली. पण,वेस्ट इंडिजचा डाव 8 विकेटवर 169 धावांवर संपला. लंकेनं २० रन्सने विजय मिळवला.

लंकनं टीमकडून बिनुरा फर्नान्डो, चामिका करुणारत्ने  वानिन्दु हसरंगाने प्रत्येकी २ विकेट मिळवल्या. तर दसुन शनाका आणि दुशमंथा चमीराने प्रत्येकी १ विकेट मिळवल्या.

बॉम्ब फुटणार का? भुजबळांनी दिला देवेंद्र फडणवीसांना आराम करण्याचा सल्ला

त्याआधी वेस्टइंडीज टीमचा कॅप्टन कायरन पोलार्ड (Kieron Pollards) ने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला. पण, पोलार्डचा निर्णय हा त्यांच्यावरच उलटला. श्रीलंकेनं निर्धारित 20 ओव्हरमध्ये 3 विकेट देऊन 189 रन्सचा डोंगर उभा केला. पाथुम निसांका आणि चरित असालंकाने धडाकेबाज अर्धशतक ठोकले. पाथुमने 41 बॉल्समध्ये 51 रन्स तर असालंकाने 68 रन्सची शानदार इनिंग पेश केली. तसंच, अलावा कुसल परेराने 29 आणि कॅप्टन दासुन शनाकाने नाबाद 25 रन्स करून धावसंख्या आणखी वाढवली. लंकेच्या टीमने निर्धारित २० ओव्हरसमध्ये 189 रन्सचा टप्पा गाठला.

First published: