मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IND vs NZ '...तर आई मला खूप ओरडेल', असे का म्हणाला? किवींचा खेळाडू सोढी

IND vs NZ '...तर आई मला खूप ओरडेल', असे का म्हणाला? किवींचा खेळाडू सोढी

Ish Sodhi

Ish Sodhi

न्यूझीलंडचा लेगस्पिनर ईश सोढीला (Ish Sodhi) एका पत्रकाराने हिंदीत उत्तर देण्यास सांगितले, त्याने मजेशीर उत्तर दिले.

दुबई, 1 नोव्हेंबर: आयसीसीकडून (ICC) आयोजित करण्यात येणाऱ्या स्पर्धांमध्ये टीम इंडियाविरुद्ध न्यूझीलंडने (IND vs NZ) आपली विजया घौडदौड कायम ठेवली. सुपर-12 स्टेजच्या मुकाबल्यात न्यूझीलंडने टीम इंडियाचा (India vs New Zealand) 8 विकेटने पराभव केला. या विजयानंतर दोन्ही संघातील अनेक खेळाडूंनी माध्यामांशी संवाद साधला. दरम्यान, न्यूझीलंडचा लेग स्पिनर ईश सोढीचा (Ish Sodhi) एक भन्नाट किस्सा सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

इतर खेळाडूंसोबत सामन्यानंतर घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत न्यूझीलंडचा लेग स्पिनर ईश सोढी पत्रकार परिषदेत उपस्थित होता. यावेळी त्याच्यासोबत भन्नट किस्सा घडला. त्याने विचारलेल्या प्रश्नावर दिलेले उत्तर पाहून सर्वत्र एकच हशा पिकला.

वेगळ्या परिस्थितीत आणि खेळपट्ट्यांशी जुळवून घेण्याबद्दल ईश सोढीला प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाचं उत्तर हिंदीत देऊ शकतोस का, असे पत्रकाराने विचारले.

सोढीला हिंदीत उत्तर देण्यास सांगितलं असता, तो म्हणाला, 'इथे बसलेल्या प्रत्येकाचं माझ्या हिंदीवर लक्ष असेल सर. माझी आईदेखील मला पाहत असेल आणि मी जरादेखील चुकीचं काही बोललो तर ती मला खूप ओरडेल. त्यामुळे यावेळी मी इंग्रजीत उत्तर देतो. पण माझं हिंदी सुधारेल अशी आशा व्यक्त करतो,' असे भन्नाट उत्तर सोढीने दिले. त्याच्या या उत्तराचा किस्सा सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

सोढीची शानदार गोलंदाजी

रविवारी झालेल्या सामन्यात ईश सोढीनं भारताविरुद्ध प्रभावी गोलंदाजी केली. त्याने 4 षटकांत 17 धावा देत दोघांना माघारी पाठवलं. त्यासाठी सोढीला सामनावीर पुरस्कारानं गौरवण्यात आले. सोढीने विराट कोहली आणि रोहित शर्माला बाद केलं. त्याच्या गोलंदाजीमुळे भारतीय संघ अडचणीत आला.

कोण आहे स्पिनर ईश सोढी?

ईश सोढीचा जन्म 31 ऑक्टोबर 1992 रोजी लुधियाना, पंजाब, भारत येथे झाला. इंदरबीर सिंग सोधी असे त्याचे पूर्ण नाव आहे. सोढी वयाच्या अवघ्या चौथ्या वर्षी कुटुंबासह न्यूझीलंडला आले होते. त्याचे कुटुंब न्यूझीलंडमधील दक्षिण ऑकलंड येथे स्थायिक झाले होते.

सोढी हा लेगब्रेक गोलंदाज तसेच उजव्या हाताचा फलंदाज आहे. न्यूझीलंड व्यतिरिक्त, सोधी हा अॅडलेड स्ट्रायकर्स, ऑकलंड अंडर-17, ऑकलंड अंडर-19, जमैका तल्लावाह, न्यूझीलंड ए, न्यूझीलंड अंडर-19, नॉर्दर्न डिस्ट्रिक्ट्स, राजस्थान रॉयल्सचा भाग आहे.

त्याने 2013 साली न्यूझीलंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. हा कसोटी सामना होता. त्याने आतापर्यंत 17 कसोटी सामन्यात 41 बळी घेतले आहेत.

First published:

Tags: T20 cricket, T20 league, T20 world cup