• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • माही अन् विराटची जोडी पाहून चाहते म्हणाले, 'क्रिकेटमधील सर्वात पवित्र नाते'

माही अन् विराटची जोडी पाहून चाहते म्हणाले, 'क्रिकेटमधील सर्वात पवित्र नाते'

MS Dhoni And irat Kohli

MS Dhoni And irat Kohli

काल भारत आणि इंग्लंडदरम्यान वॉर्मअम मॅच (Warm Up Match) खेळवण्यात आली. दरम्यान या सामन्यापूर्वीचा एक सुंदर फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतं आहे.

 • Share this:
  दुबई, 18 ऑक्टोबर : युएई (UAE) मध्ये १७ ऑक्टोबरपासून आयसीसी टी-ट्वेंटी क्रिकेट वर्ल्ड कपची (T 20 world cup) शानदार सुरुवात झाली आहे.  हा वर्ल्डकप भारताच्या दृष्टीने खास असणार आहे. कारण, भारतीय संघाला आजी-माजी अशा दोन-दोन कर्णधारांची साथ मिळणार आहे. काल भारत आणि इंग्लंडदरम्यान वॉर्मअम मॅच (Warm Up Match) खेळवण्यात आली. दरम्यान या सामन्यापूर्वीचा एक सुंदर फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतं आहे. सध्या लीग स्टेजमधील सामन्यांसोबतच काही वॉर्मअप सामने देखील खेळवले जात आहेत. भारताच्या पहिल्या वॉर्मअप सामन्यापूर्वी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आणि महेंद्रसिंह धोनी(MS Dhoni) यांची केमेस्ट्री दिसून आली. दोघांचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. एमएस धोनी ज्यावेळी भारतीय संघाचा कर्णधार होता, त्यावेळी विराट कोहली संघाचा उपकर्णधार होता. या दोघांमध्ये नेहमीच काही ना काही चर्चा सुरू असायची. असेच काहीसे चित्र या सामन्यापूर्वी देखील पाहायला मिळाले. विराट कोहली मैदानावर जितका आक्रमक आहे तितकाच मैदानाच्या बाहेर तो खोडकर आहे. व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये विराट कोहली आपल्या बोटाने एमएस धोनीच्या हाताला स्पर्श करताना दिसून येत आहे. हे पाहून असं वाटतंय की, विराट कोहली चेक करतोय की, हे स्वप्नं तर नाहीये ना? की एमएस धोनी परतला आहे. बीसीसीआयने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केलेल्या या फोटोवर चाहते देखील आपल्या प्रतिक्रीया देताना दिसून येत आहेत. एका युजरने हा फोटो ट्विट करत लिहिले की, “क्रिकेटमधील सर्वात पवित्र नाते- विराट कोहली आणि एमएस धोनी” तर रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर देखील हे फोटो शेअर करण्यात आले आहेत. हा तो फोटो आहे जो आम्हाला पाहायला आवडला. तर “हलक्या मनाची संभाषणे अशीच असतात..” अशी खास कॅप्शन बीसीसीआयने शेअर केलेल्या फोटोला दिली आहे. भारतीय संघाचा विचार केला तर, सोमवारी (18 ऑक्टोबर) दुबईतील आयसीसी ॲकॅडमी ग्राउंडवर इंग्लंडसोबत भारतानं आपली वॉर्मअप मॅच खेळली. इंग्लंडच्या संघानं अगोदर बॅटिंग करत भारतासमोर 188 रन्सच टारगेट ठेवलं होतं. भारतानं तीन विकेट गमावून एकोणिसाव्या ओव्हरमध्येच हे टारगेट चेस केलं. केएल राहुलनं 51 रन केले तर ईशान किशननं 70 रन्सची धुवांधार खेळी केली. एकूणचं भारतीय संघानं वर्ल्डकप मोहिमेची विजयी सुरुवात केली आहे
  First published: