मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /T20 World Cup : दिग्गज कॅप्टनची अफगाणिस्तानवर बहिष्काराची धमकी, ICC वरही टीका

T20 World Cup : दिग्गज कॅप्टनची अफगाणिस्तानवर बहिष्काराची धमकी, ICC वरही टीका

ऑस्ट्रेलियन टेस्ट टीमचा कर्णधार टीम पेन (Tim Paine) याने टी-20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) अफगाणिस्तानच्या (Afghanistan) खेळण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.

ऑस्ट्रेलियन टेस्ट टीमचा कर्णधार टीम पेन (Tim Paine) याने टी-20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) अफगाणिस्तानच्या (Afghanistan) खेळण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.

ऑस्ट्रेलियन टेस्ट टीमचा कर्णधार टीम पेन (Tim Paine) याने टी-20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) अफगाणिस्तानच्या (Afghanistan) खेळण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.

मुंबई, 10 सप्टेंबर : ऑस्ट्रेलियन टेस्ट टीमचा कर्णधार टीम पेन (Tim Paine) याने टी-20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) अफगाणिस्तानच्या (Afghanistan) खेळण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. तालिबानने (Taliban) अफगाणिस्तानच्या महिलांना (Afghanistan Women Cricket Team) खेळण्यावर बंदी घातली आहे, त्यामुळे टी-20 वर्ल्ड कपमध्ये अनेक टीम अफगाणिस्तानविरुद्ध खेळण्यावर बहिष्कार घालतील, अशी धमकी टीम पेनने दिली. याचसोबत पेनने आयसीसीवरही (ICC) टीका केली आहे.

तालिबानने अफगाणिस्तानच्या महिलांवर क्रिकेट खेळायला बंदी घातली, यानंतर अजूनही आयसीसीने यावर कोणतीही भूमिका घेतलेली नाही. अफगाणिस्तानची टीम 17 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये सहभागी होणार आहे. आयसीसीच्या नियमांनुसार टेस्ट क्रिकेटचा दर्जा मिळालेल्या देशाची महिला क्रिकेट टीम असणं बंधनकारक आहे. तालिबानने महिला क्रिकेटवर बंदी घातल्यामुळे अफगाणिस्तानचा टेस्ट क्रिकेटचा दर्जा संकटात सापडला आहे.

ऑस्ट्रेलियाच्या टेस्ट टीमचा कर्णधार टीम पेन यालाही ही गोष्ट खटकत आहे. तालिबानने महिला क्रिकेटपटूंवर घातलेली बंदी उठवली नाही, तर नोव्हेंबर महिन्यात होबार्टमध्ये होणारी अफगाणिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया ही टेस्ट रद्द केली जाईल, असं क्रिकेट ऑस्ट्रेलियाने (Cricket Australia) सांगितलं आहे.

'टी-20 वर्ल्ड कप सुरू व्हायला फक्त एक महिना शिल्लक आहे. अफगाणिस्तान क्रिकेट टीम या स्पर्धेचा भाग आहे, ही हैराण करणारी गोष्ट आहे. ऑस्ट्रेलियन खेळाडू बोर्डासोबत आहेत. जर गोष्टी अशाच राहिल्या तर याचा परिणाम टी-20 वर्ल्ड कपवरही होऊ शकतो. आयसीसीने या प्रकरणावर अजून कोणतीच भूमिका घेतलेली नाही,' असं पेन सेन स्पोर्ट्स रेडियोशी बोलताना म्हणाला.

ऑस्ट्रेलियाच नाही तर इतर देशही टी-20 वर्ल्ड कपमध्ये अफगाणिस्तानच्या सहभागाबाबत प्रश्न उपस्थित करू शकतात. काही टीम अफगाणिस्तानविरुद्ध खेळायला नकारही देऊ शकतात, असं टीम पेनला वाटतं.

दुसरीकडे राशिद खान याने अफगाणिस्तानच्या टी-20 टीमचं कर्णधारपद सोडलं आहे. टीमची निवड झाल्यानंतर अवघ्या काही वेळातच राशिदने हा निर्णय घेतला. टीम निवडताना आपल्यासोबत कोणतीही चर्चा झाली नसल्यामुळे, आपण कर्णधारपद सोडत आहोत, असं राशिद खानने सांगितलं.

First published:
top videos

    Tags: Afghanistan, Australia, T20 world cup, Taliban