Home /News /sport /

T20 World Cup: पाकिस्तान फायनलमध्ये जाण्यापूर्वीच अख्तरची बडबड सुरू, न्यूझीलंडला दिला इशारा

T20 World Cup: पाकिस्तान फायनलमध्ये जाण्यापूर्वीच अख्तरची बडबड सुरू, न्यूझीलंडला दिला इशारा

पाकिस्तान टी20 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये (T20 World Cup 2021) दाखल होण्यापूर्वीच माजी फास्ट बॉलर शोएब अख्तरनं (Shoaib Akhtar) न्यूझीलंडला इशारा दिला आहे.

    मुंबई, 11 नोव्हेंबर: पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया (Pakistan vs Australia) यांच्यात टी20 वर्ल्ड कपमधील  दुसरी सेमी फायनल होणार आहे.  पाकिस्ताननं या स्पर्धेत दमदार कामगिरी केलीय. सर्व मॅच जिंकत त्यांनी सेमी फायनलमध्ये प्रवेश केलाय. तर दुसरिकडं ऑस्ट्रेलियानंही या स्पर्धेत फक्त एक पराभव स्विकारत सेमी फायनल गाठली आहे. गुरुवारच्या मॅचमध्ये पाकिस्तानचं पारडं जड असलं तरी ऑस्ट्रेलियाला कमी लेखून चालणार नाही. आयसीसी स्पर्धांमधील नॉक आऊट मॅचमध्ये कामगिरी उंचावण्याचा त्यांचा इतिहास आहे. पाकिस्तान फायनलमध्ये दाखल होण्यापूर्वीच माजी फास्ट बॉलर शोएब अख्तरनं (Shoaib Akhtar) न्यूझीलंडला इशारा दिला आहे. फायनल मॅचमध्ये पाकिस्तानचा सामना करताना न्यूझीलंडवर मानसिक दबाव असेल, असा दावा त्यानं केला आहे. या वर्ल्ड कपमधील सुपर 12 च्या लढतीत पाकिस्ताननं न्यूझीलंडचा पराभव केला होता. त्या मॅचचा संदर्भ देत त्यानं हा दावा केला आहे. पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात फायनल मॅच व्हावी, अशी इच्छाही त्यानं व्यक्त केली. अख्तरनं यावेळी पहिल्या सेमी फायनलमधील इंग्लंडच्या डावपेचांवरही टीका केली. इंग्लंडचा कॅप्टन इयन मॉर्गन किंवा लियम लिविंगस्टोननं बॅटींग ऑर्डरमध्ये वरच्या क्रमांकावर यायला हवं होतं, असं मत त्यानं व्यक्त केलं. त्याचबरोबर केन विल्यमसनच्या खेळावरही त्यानं नाराजी व्यक्त केली. मॉर्गन आणि विल्यमसन हे दोघंही चांगले कॅप्टन आहेत. पण त्यांनी बॅटींग साधारण केली. विल्यमसनंच काम हे अँकरचं आहे. त्यामुळे त्यानं जास्तीत जास्त क्रिझवर थांबायला पाहिजे. तो मैदानात असेपर्यंत समोरच्या टीमला धोका असतो, असं मत अख्तरनं व्यक्त केलं. 167 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना किवी टीमची अवस्था बिकट झाली होती. 13 रनवरच न्यूझीलंडने मार्टिन गप्टील (Martin Guptill) आणि केन विलियमसनच्या (Kane Williamson) विकेट गमावल्या होत्या, पण डॅरेल मिचेलने (Darell Mitchell) डेवॉन कॉनवेसोबत (Devon Conway) पार्टनरशीप करून न्यूझीलंडला सावरलं. मिचेल 47 बॉलमध्ये 72 रनवर नाबाद राहिला, तर कॉनवे 46 रनवर आऊट झाला. कॉनवेची विकेट गेल्यानंतर इंग्लंडची टीम पुनरागमन करेल असं वाटत होतं, पण जेम्स नीशमने (James Neesham) आक्रमण केलं. नीशमने 11 बॉलमध्ये 27 रन केले, यामध्ये 3 फोर आणि एका सिक्सचा समावेश होता. PAK vs AUS LIVE Streaming: T20 वर्ल्ड कपमधील दुसरी सेमी फायनल कधी आणि कुठे पाहता येणार? त्यापूर्वी  मोईन अलीच्या अर्धशतकामुळे इंग्लंडला 4 आऊट 166 पर्यंत मजल मारता आली. मोईन अलीने 37 बॉलमध्ये नाबाद 51 रन केले. मोईनच्या या खेळीमध्ये 3 फोर आणि 2 सिक्सचा समावेश होता. याशिवाय डेव्हिड मलाननेही 41 रन केल्या. न्यूझीलंडकडून टीम साऊदी, एडम मिल्ने, ईश सोढी आणि एडम मिल्ने यांना प्रत्येकी 1-1 विकेट घेण्यात यश आलं
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: New zealand, Pakistan, Shoaib akhtar, T20 world cup

    पुढील बातम्या