मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

T20 World Cup: विराट कोहलीचे 'हे' सहकारी घडवणार इतिहास, पाहा कशी आहे टीम इंडिया

T20 World Cup: विराट कोहलीचे 'हे' सहकारी घडवणार इतिहास, पाहा कशी आहे टीम इंडिया

आयसीसी स्पर्धेत गेल्या आठ वर्षांपासून हुलकावणी देणारं विजेतेपद पटकावण्यासाठी टीम इंडिया सज्ज झाली आहे. कॅप्टन विराट कोहलीच्या (Virat Kohli) नेतृत्त्वाखाली होणारी ही शेवटची टी20 स्पर्धा आहे.

आयसीसी स्पर्धेत गेल्या आठ वर्षांपासून हुलकावणी देणारं विजेतेपद पटकावण्यासाठी टीम इंडिया सज्ज झाली आहे. कॅप्टन विराट कोहलीच्या (Virat Kohli) नेतृत्त्वाखाली होणारी ही शेवटची टी20 स्पर्धा आहे.

आयसीसी स्पर्धेत गेल्या आठ वर्षांपासून हुलकावणी देणारं विजेतेपद पटकावण्यासाठी टीम इंडिया सज्ज झाली आहे. कॅप्टन विराट कोहलीच्या (Virat Kohli) नेतृत्त्वाखाली होणारी ही शेवटची टी20 स्पर्धा आहे.

    मुंबई, 17 ऑक्टोबर: आयसीसी स्पर्धेत गेल्या आठ वर्षांपासून हुलकावणी देणारं विजेतेपद पटकावण्यासाठी टीम इंडिया सज्ज झाली आहे. कॅप्टन विराट कोहलीच्या (Virat Kohli) नेतृत्त्वाखाली होणारी ही शेवटची टी20 स्पर्धा आहे. त्यामुळे हा टी20 वर्ल्ड कप (T20 World Cup 2021) जिंकून कॅप्टनला विजयी निरोप देण्याचा टीम इंडियाचा निर्धार आहे. हा वर्ल्ड कप नियोजित वेळापत्रकानुसार भारतामध्ये होणार होता. पण, भारतामधील कोरोनाचा धोका लक्षात घेऊन यूएईमध्ये हलवण्यात आला. मात्र या स्पर्धेचं यजमानपद हे भारतीय क्रिकेट नियामक बोर्डाकडंच (BCCI) आहे. या वर्ल्ड कपसाठी निवडण्यात आलेली टीम इंडिया कशी आहे ते पाहूया... ओपनिंग : रोहित शर्मा (Rohit Sharma) भारतीय इनिंगची सुरुवात करणार हे नक्की आहे. इंग्लंड दौऱ्यात चांगली कामगिरी केलेल्या रोहितनं 2019 साली झालेल्या वर्ल्ड कपमध्ये 5 शतक झळकावली होती. या वर्ल्ड कपमध्येही टीम इंडियाला रोहितकडून तशाच कामगिरीची अपेक्षा असेल. रोहितच्या जोडीला अनुभवी केएल राहुल (KL Rahul) आणि तरुण विकेट किपर-बॅटर इशान किशन (Ishan Kishan) हे दोन पर्याय आहेत. राहुलनं आयपीएल स्पर्धेत सातत्यपूर्ण कामगिरी करत 626 रन केले होते. तर इशान किशननं मुंबई इंडियन्सच्या शेवटच्या दोन मॅचमध्ये आक्रमक अर्धशतक झळकावलं होतं. मिडल ऑर्डर : टीम इंडियाच्या मिडल ऑर्डरमध्ये कॅप्टन विराट कोहली (Virat Kohli), विकेट किपर बॅटर ऋषभ पंत (Rishabh Pant) आणि सूर्यकुमार यादव हे तीन जण आहेत. या तिघांकडंही टी20 क्रिकेटचा मोठा अनुभव असून प्रत्येकामध्ये मॅच फिरवण्याची क्षमता आहे. टी20 क्रिकेटमधील मधल्या ओव्हरमध्ये रनरेट कमी होऊ न देणं आणि शेवटच्या ओव्हर्समध्ये फटकेबाजी करुन चांगला स्कोअर उभारण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे. ऑT20 World Cup Schedule: पाकिस्ताविरुद्धच नाही तर टीम इंडियाची प्रत्येक मॅच आहे खास, पाहा संपूर्ण वेळापत्रक ऑल राऊंडर्स : हार्दिक पांड्या (Hardik Pandya), रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) आणि शार्दुल ठाकूर (Shardul Thakur) हे तीन ऑल राऊंडर्स टीममध्ये आहेत. यापैकी हार्दिक पांड्याचा फॉर्म आणि फिटनेस हा टीम इंडियाच्या काळजीचा विषय आहे. तो वर्ल्ड कपमध्ये बॉलिंग करण्याची शक्यता कमी असल्यानं शार्दुल ठाकूरचा शेवटच्या क्षमी टीममध्ये समावेश करण्यात आला आहे.  शार्दुल सध्या चांगल्या फॉर्मात असून चेन्नई सुपर किंग्सच्या (Chennai Super Kings) आयपीएल विजेतेपदात त्याचा मोलाचा वाटा होता. टीम इंडियाचा तिसरा ऑल राऊंडर रविंद्र जडेजाही सध्या फॉर्मात असून त्यानं या वर्षभरात सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. फास्ट बॉलर्स : जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah), मोहम्मद शमी (Mohammed Shami) आणि भुवनेश्वर कुमार (Bhuvneshwar Kumar) हे तीन अनुभवी फास्ट बॉलर्स टीम इंडियाकडं आहेत. भारतीय टीमला वर्ल्ड कप जिंकायचा असेल तर या तिघांनाही त्यांच्या लौकिकानुसार खेळ करावा लागेल. स्पिनर्स : अनुभवी ऑफ स्पिनर आर. अश्विन (R. Ashwin), लेग स्पिनर राहुल चहर (Rahul Chahar) आणि मिस्ट्री स्पिनर वरुण चक्रवर्ती (Varun Chakravarthy) हे तीन स्पिनर्स टीम इंडियाकडं आहेत. अश्विन आणि चहर हे दोघे फारसे फॉर्मात नसल्यानं वरुण चक्रवर्तीवर आगामी वर्ल्ड कपमध्ये मोठी जबाबदारी असेल. यूएईत रंगणार T20 World Cup चा थरार; एका क्लिकवर जाणून घ्या संपूर्ण स्पर्धेचं वेळापत्रक टी 20 वर्ल्ड कपसाठी भारतीय टीम विराट कोहली, रोहित शर्मा, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, इशान किशन, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, राहुल चहर, आर. अश्विन, शार्दुल ठाकूर, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार आणि मोहम्मद शमी राखीव खेळाडू : श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, दीपक चहर
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Cricket news, T20 world cup, Team india

    पुढील बातम्या